सोलापूर रेल्वे स्थानकातून प्रवासी सेवेसाठी सहा विशेष रेल्वेगाड्यांना मुदतवाढ

सोलापूर रेल्वे स्थानकातून प्रवासी सेवेसाठी सहा विशेष रेल्वेगाड्यांना मुदतवाढ
सोलापूर (प्रतिनिधी): मध्य रेल्वे प्रशासनाकडून प्रवाशांच्या वाढत्या गर्दीचा व मागणीचा विचार करून सहा विशेष रेल्वेगाड्या सोडण्याचा निर्णय घेतला असून या गाड्यांच्या कालावधीचा विस्तार करण्यात आला आहे.
गाडी क्रमांक 01436 लोकमान्य टिळक टर्मिनस – सोलापूर ही साप्ताहिक विशेष गाडी, जी पूर्वी 01 सप्टेंबरपर्यंत धावणार होती, ती आता 08 ऑक्टोबर ते 31 डिसेंबरपर्यंत वाढवली आहे. या गाडीच्या एकूण 13 फेर्या होतील. गाडी क्रमांक 01435 सोलापूर – लोकमान्य टिळक टर्मिनस ही साप्ताहिक विशेष गाडी, जी पूर्वी 30 सप्टेंबरपर्यंत धावणार होती, ती आता 07 ऑक्टोबर ते 30 डिसेंबरपर्यंत धावणार आहे. याचेही 13 फेर्या होतील.
गाडी क्रमांक 01461 सोलापूर – दौंड ही अनारक्षित दैनंदिन विशेष गाडी, जी पूर्वी 30 सप्टेंबरपर्यंत होती, ती आता 01 ऑक्टोबरपासून 31 डिसेंबर या दरम्यान धावेल. या गाडीचे 92 फेर्या होणार आहेत. गाडी क्रमांक 01462 दौंड – सोलापूर ही अनारक्षित दैनंदिन विशेष गाडी 30 सप्टेंबरपर्यंत होती, ती आता 31 डिसेंबरपर्यंत असेल. याही गाडीचे एकूण 92 फेर्या होतील.
गाडी क्रमांक 01465 सोलापूर – कलबुर्गी ही अनारक्षित दैनंदिन विशेष गाडी, जी पूर्वी 30 सप्टेंबरपर्यंत होती, ती आता 31 डिसेंबरपर्यंत सेवेत असेल. या विशेष गाडीचे एकूण 92 फेर्या होणार आहेत.
गाडी क्रमांक 01466 कलबुर्गी – सोलापूर अनारक्षित दैनंदिन विशेष गाडी, जी पूर्वी 30 सप्टेंबरपर्यंत होती, ती आता 31 डिसेंबरपर्यंत सेवा देईल. याचेही 92 फेर्या होतील.
गाडी क्रमांक 01023 पुणे – छत्रपती शाहू महाराज टर्मिनस कोल्हापूर ही दैनंदिन विशेष गाडी, जी पूर्वी 30 सप्टेंबरपर्यंत होती, ती 31 डिसेंबरपर्यंत वाढविण्यात आली आहे. याचेही 92 फेर्या होणार आहेत.
गाडी क्रमांक 01024 छत्रपती शाहू महाराज टर्मिनस कोल्हापूर- पुणे ही दैनंदिन विशेष गाडी 30 सप्टेंबरपर्यंत होती, ती आता 31 डिसेंबर दरम्यान वाढविण्यात आल्याने याचे 92 फेर्या होणार आहेत.
गाडी क्रमांक 01487 पुणे – हरंगुळ ही दैनंदिन विशेष गाडी 30 सप्टेंबरपर्यंत होती, ती आता 31 डिसेंबर या दरम्यान वाढवली आहे. ही गाडी 92 फेरी करणार आहे. गाडी क्रमांक 01488 हरंगुळ – पुणे ही दैनंदिन विशेष गाडी 30 सप्टेंबर होती, ती आता 31 डिसेंबरपर्यंत असेल. याचेही 92 फेर्या होतील.
गाडी क्रमांक 01437 सोलापूर – धर्मावरम ही विशेष गाडी 02 ऑक्टोबरपर्यंत होती, ती 27 नोव्हेंबरपर्यंत वाढवली आहे. गाडी क्रमांक 01438 धर्मावरम – सोलापूर ही विशेष गाडी जी 03 ऑक्टोबरपर्यंत होती, ती अनकापल्ले येथून 11 ऑक्टोबर ते 29 नोव्हेंबर दरम्यान वाढवली आहे.