सह्याद्री फार्मसी कॉलेजमध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहादुर शास्त्री यांची जयंती उत्साहात साजरी

सह्याद्री फार्मसी कॉलेजमध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहादुर शास्त्री यांची जयंती उत्साहात साजरी
सांगोला (प्रतिनिधी): राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती २ ऑक्टोबर रोजी देशभरात साजरी केली जाते. सत्य आणि अहिंसेचे पुजारी असणारे महात्मा गांधीजीं यांनी जगाला अहिंसेचा मंत्र दिला.या अहिंसेच्याच बळावर भारताला स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्या महात्मा गांधीजींच्या विचारांच्या मार्गाने आजही लाखो लोक जातात, अशा महान राष्ट्रपित्याची व भारत देशाचे दुसरे पंतप्रधान श्री.लालबहादुर शास्त्री यांची जयंती सह्याद्री फार्मसी कॉलेज मेथवडे महाविद्यालयात उत्साहात साजरी करण्यात आली. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ.दिलीपकुमार इंगवले, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.मनोजकुमार पाटील यांच्या हस्ते व सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी यांच्या उपस्थितीत, राष्ट्रपिता महात्मा गांधी व श्री.लालबहादुर शास्त्री यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण व दीपप्रजवलंन करण्यात आले. २ ऑक्टोबर हा दिवस आंतराष्ट्रीय अहिंसा दिन म्हणून साजरा करतात या दिनाचे औचित्य साधून सर्व उपस्थिताना अहिंसेची तसेच स्वछतेची शपथ उपस्थितांना दिली.