सामाजिक

जिल्ह्यात महापुराने महावितरणचे 24 कोटींचे नुकसान

पूरपरिस्थितीत महावितरण विभागाची कामगिरी, पुराच्या पाण्यातही पोलची दुरुस्ती, 262 कर्मचार्‍यांकडून सेवा

जिल्ह्यात महापुराने महावितरणचे 24 कोटींचे नुकसान

पूरपरिस्थितीत महावितरण विभागाची कामगिरी, पुराच्या पाण्यातही पोलची दुरुस्ती, 262 कर्मचार्‍यांकडून सेवा

सोलापूर (प्रतिनिधी): सोलापूर जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे व सीना नदीला आलेल्या पुराने महावितरण सोलापूर मंडळ अंतर्गत 15 ते 24 सप्टेंबरपर्यंत नदीकाठच्या 95 गावांचा वीजपुरवठा पूर्णतः खंडित झाला तर सुमारे 24 कोटी रूपयांचे नुकसान झाले, अशी माहिती महावितरण कंपनीचे अधीक्षक अभियंता सुनील माने यांनी दिली. सोलापूर जिल्ह्याच्या 95 गावांपैकी 74 गावांचा वीज पुरवठा सुरळीत करण्यात महावितरण विभागाला यश आले आहे.


सोलापूर जिल्ह्यातील महावितरणचे 33/11 केव्ही क्षमतेचे एकूण 19 उपकेंद्र अतिवृष्टीमुळे व पुराचे पाणी उपकेंद्रात गेल्याने बंद करण्यात आले होते. करमाळा तालुक्यातील आवाटी, मोहोळ तालुक्यातील लांबोटी व भांबेवाडी, माढा तालुक्यातील कुंभेज, दक्षिण सोलापूर तालुक्यातील औराद, हत्तरसंग कुडल व वडकबाळ, अक्कलकोट तालुक्यातील कोर्सेगाव, गुड्डेवाडी ही उपकेंद्र बाधित झाली होती. त्यामुळे 11 केव्ही क्षमतेच्या एकूण 92 वाहिन्यांचा वीज पुरवठा खंडित झाला होता. सदर 92 वाहिन्या बंद असल्याने एकूण 28 हजार 59 घरगुती ग्राहक व 39 हजार 41 शेती पंप ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित झालेला होता, अशी माहिती वीज वितरण कंपनीकडून देण्यात आलेली आहे.
सीना नदीकाठ भागात असलेले महावितरणचे शेतीपंपास वीज पुरवठा करणारे एकूण 5 हजार 604 वितरण रोहित्र फार मोठ्या प्रमाणात पाण्याखाली गेल्याने सुरक्षिततेच्या दृष्टीने सदर वितरण रोहित्रांचा वीज पुरवठा खंडित झाला होता. महावितरणचे अंदाजे नुकसान 25 ते 30 कोटीपर्यंत झाल्याचे आढळून आले आहे. मोहोळ तालुक्यातील मोहोळ ते भांबेवाडी या 33 केव्ही वाहिनीचे पोलवरील एका फेजचे जम्प तुटल्याने दि. 27 सप्टेंबर 2025 रोजी पोलच्या बुडात 25 फुटापर्यंत पाणी साचलेले असतानाही बोटीच्या साहायाने पोलपर्यंत पोहचून सदर वाहिनीचा वीज पुरवठा पूर्ववत करण्यात आला.

पुराच्या पाण्यातही पोलची दुरुस्ती

सोलापूर मंडळ अंतर्गत जेऊर उपविभागात 33 केव्ही वाहिनीचे 7 पोल पुराच्या पाण्यात पूर्णत: पडलेले असतानादेखील पर्यायी 33 केव्ही वाहिनीद्वारे 7 गावांचा वीज पुरवठा मोठ्या प्रमाणात पाऊस असतानादेखील पूर्ववत करण्यात आले.

 

262 कर्मचार्‍यांकडून सेवा

महावितरणकडे 262 सूचीबद्ध कंत्राटदार सज्ज असून, त्यांच्याकडे आवश्यक साहित्य व मनुष्यबळ उपलब्ध आहे. सध्या 21 गावांचा वीजपुरवठा अद्यापही खंडित वीज पुरवठा सुरळीत करत आहेत.

पूरपरिस्थितीत महावितरण विभागाची कामगिरी…

• मोहोळ ते भांबेवाडी येथे पोल जवळ 25 फुटापर्यंत पाणी असूनही महावितरण कर्मचाऱ्यांनी बोटीत जाऊन वीजपुरवठा सुरळीत केला.
• अक्कलकोट तालुक्यात 11 केव्ही कोर्सेगाव वाहिनीवर सिना नदीच्या पात्रात असलेल्या 11 केव्ही वाहिनीच्या पोल जवळ पडलेले झाड गोटयाळ गावातील वायरमन यांनी नदीच्या पाण्यात पोहोत जाऊन काढले व बाधित भाग बंद करून इतर भागाचा वीजपुरवठा सुरळीत केला. सोलापूर मंडळ अंतर्गत जेऊर उपविभागात 33 केव्ही वाहिनी चे 7 पोल पुराच्या पाण्यात पुर्णत: पडलेले असताना देखील पर्यायी 33 केव्ही वाहिनीव्दारे 7 गावांचा वीज पुरवठा मोठया प्रमाणत पाऊस असताना देखील 24 तासाच्या आत पुर्ववत करण्यात यश आले आहे, असे श्री.माने यांनी सांगितले.
तसेच करमाळा, माढा, मोहोळ, उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर या सर्व उपविभांगामध्ये देखील सर्व कर्मचारी अधिकारी यांनी अहोरात्र काम करून गावठाण भागातील वीज पुरवठा कसा पुर्ववत होईल याकडे लक्ष देऊन जास्तीत जास्त ग्राहकांना वीज सेवा उपलब्ध होईल यासाठी प्रयत्न केले जात आहेत. मोहोळ तालुक्यातील मोहोळ ते भांबेवाडी या 33 केव्ही वाहिनीचे पोल वरील एका फेजचे जम्प तुटल्याने 27 सप्टेंबर रोजी पोलच्या बुडात 25 फुटापर्यंत पाणी साचलेले असताना सुध्दा बोटीच्या साहयाने पोल पर्यंत पोहचून सदर वाहिनीचा वीज पुरवठा पुर्ववत करण्यात आला.
अक्कलकोट तालुक्यातील 11 केव्ही कोर्सेगाव वीजवाहिनीवर, सिना नदीच्या पात्रात असलेल्या पोलजवळ एक झाड कोसळले होते. यामुळे वीजपुरवठा बाधित झाला होता. गोटयाळ गावातील वायरमन यांनी अत्यंत धाडसाने नदीच्या पाण्यात पोहून जाऊन झाड हटवले आणि बाधित भाग बंद करून इतर परिसराचा वीजपुरवठा सुरळीत केला. ही घटना प्रशासकीय तत्परता आणि कर्मचाऱ्यांच्या कार्यनिष्ठेचे उदाहरण ठरली असून, अशा संकटसमयी तातडीने हस्तक्षेप करून जनतेला दिलासा देण्याचे कार्य कौतुकास्पद आहे. नदीकाठच्या भागात अनेक शेतीपंप वाहिन्या व रोहित्र अद्यापही पाणी व गाळात अडकलेले आहेत. त्यामुळे पाणी ओसरल्यानंतर आणि पोल उभे करण्यास योग्य परिस्थिती निर्माण झाल्यावर, त्या ठिकाणी तात्काळ देखभाल व दुरुस्तीचे काम हाती घेऊन वीजपुरवठा पूर्ववत केला जात आहे. या कार्यासाठी महावितरणकडे 262 सूचीबद्ध कंत्राटदार सज्ज असून, त्यांच्याकडे आवश्यक साहित्य व मनुष्यबळ उपलब्ध आहे. सध्या 21 गावांचा वीजपुरवठा अद्यापही खंडित असून, येत्या दोन दिवसांत प्राधान्याने वीजपुरवठा पूर्ववत करण्यासाठी महावितरण प्रयत्नशील आहे. ही कार्यवाही वीज वितरण कंपनीची तत्परता, नियोजनबद्धता आणि नागरिकांच्या गरजांप्रतीची संवेदनशीलता आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!