अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील १.३३ लाख हेक्टरवरील पिके बाधित
३७९ गावांतील दीड लाख शेतकऱ्यांच्या पिकांचे, फळबागांचे नुकसान

अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील १.३३ लाख हेक्टरवरील पिके बाधित
३७९ गावांतील दीड लाख शेतकऱ्यांच्या पिकांचे, फळबागांचे नुकसान
सांगोला (प्रतिनिधी): परतीच्या पावसाने सोलापूर जिल्ह्यातील माढा, करमाळा, मोहोळ, अक्कलकोट, दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर व बार्शी या तालुक्यांना सर्वाधिक मोठा फटका बसला आहे. सोलापूर जिल्ह्यात परतीच्या पावसाने पुन्हा एकदा थैमान घातले असून १ ऑगस्ट ते १३ सप्टेंबर या कालावधीत सुमारे १ लाख ३३ हजारहून अधिक हेक्टरवरील शेती पिकांना फटका बसला आहे. यामध्ये तूर, उडीद, सोयाबीन, कापूस, मका, कांदा, बाजरी व फळपिकांचे मोठे नुकसान झाले आहे. नुकसानीचे पंचनामे सुरू असल्याची माहिती कृषी विभागाच्या वतीने देण्यात आली.
२४ तासांत ६५ मिलिमीटर पाऊस अतिवृष्टी म्हणून गणला जातो. दुसरीकडे सलग पाच दिवस सरासरी १० मिलिमीटर पाऊस हा सततचा पाऊस धरला जातो. दोन्ही पावसामुळे नुकसान झालेल्यांना सरकारकडून भरपाई दिली जाते. सलग चार दिवस ४० ते ५० मिलिमीटर पाऊस पडला आणि पाचव्या दिवशी १० मिलिमीटरपेक्षा कमी पाऊस झाला तरी तेथे भरपाई मिळत नाही. त्याचा फटका हजारो शेतकऱ्यांना बसणार आहे.
अतिवृष्टीचा सोयाबीन, कांदा, भाजीपाला, मका, कांदा, कलिंगड, तूर, उडीद यासह पपई, डाळिंब, केळी अशा फळबागांना मोठा फटका बसला आहे. दुसरीकडे अनेक शेतकऱ्यांना बँकांनी कर्ज भरण्याच्या नोटिसा बजावल्या असून अनेकांच्या डोक्यावर खासगी सावकारांच्या कर्जाचाही डोंगर आहे. त्यामुळे आता ‘जगावे की मरावे’ असा प्रश्न बळिराजा विचारू लागला आहे.
ऑगस्टमध्ये अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीपोटी ५९ कोटी ७९ लाखांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. यामध्ये ५९ हजार ११० शेतकऱ्यांचे ५६ हजार ९६१ हेक्टरवरील पिकांना फटका बसला होता. यामध्ये उत्तर सोलापूर २६ कोटी ०३ लाख, दक्षिण सोलापूर ११ कोटी ९९ लाख, अक्कलकोट १४ कोटी ०४ लाख, माढा १ कोटी ५९ लाख, पंढरपूर ४ कोटी ७० लाख, बार्शी ८.१८ लाख, अपर मंद्रूप १३.९९ लाख, मोहोळ १७.७३ लाख, मंगळवेढा १२.५४ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.
जिल्ह्यातील या मंडलांमध्ये अतिवृष्टी
११ सप्टेंबर रोजी सोलापूर जिल्ह्यातील शेळगी, मार्डी, बोरामणी, वळसंग, होटगी, मैंदर्गी, वागदरी, चपळगाव, किणी, सोनंद, अक्कलकोट, जेऊर, तडवळ या १३ महसूल मंडलात अतिवृष्टी झाली होती. याशिवाय त्या दिवशी नरखेड, करजगी, दुधनी, निंबर्गी, मुस्ती या मंडळात देखील मोठा पाऊस झाला. दुसरीकडे शनिवार १३ सप्टेंबर रोजी निंबर्गी, पांगरी, नारी, तडवळ, रोपळे, जेऊर, कोर्टी, उमरड, केत्तूर व हुलजंती या १० मंडलांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली आहे. याशिवाय तिहे, वळसंग, विंचूर, बार्शी, आगळगाव, उपळाई, गौडगाव, पानगाव, अक्कलकोट, चपळगाव, पेनूर, टेंभुर्णी, करमाळा, अर्जुननगर, केम, सालसे, आंधळगाव या मंडलांमध्ये देखील मोठा पाऊस झाला आहे. परतीच्या पावसाने जिल्ह्यातील माढा, करमाळा, मोहोळ, अक्कलकोट, दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर व बार्शी या
सोयाबीन, तूर, कांद्याचे मोठे नुकसान झाले आहे.
सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे खरीप हंगामातील पिकांना मोठा फटका बसला आहे. यामध्ये तूर, उडीद, सोयाबीन, कापूस, मका, कांदा, बाजरी व फळपिकांचे मोठे नुकसान झाले आहे. तालुकानिहाय महसूल व कृषी विभागाच्या वतीने पंचनामे करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. अंतिम आकडेवारी दोन ते तीन दिवसात येणार असल्याचे महसूल प्रशासनाकडून सांगण्यात आले. त्याशिवाय सुमारे २० हजार शहरी घरांनाही नुकसान सहन करावे लागले आहे. शेतीव्यतिरिक्त फळबागांना, गोठ्यांना आणि कच्च्या घरांना मोठा फटका बसला आहे. ऑगस्टमध्ये झालेल्या नुकसानीच्या पंचनाम्याचा अहवाल शासनाकडे पाठवला आहे. तर सप्टेंबरमधील पंचनामे सध्या सुरू आहेत.
तालुकानिहाय महसूल व कृषी विभागाच्या वतीने पंचनामे करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील खरीप हंगामातील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. ऑगस्टचे पंचनामे पूर्ण होऊन अहवाल शासनाला सादर केला असून सप्टेंबरचे पंचनामे सुरू असल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शुक्राचार्य भोसले यांनी दिली.
तालुका निहाय नुकसानीची स्थिती, शेतकरी संख्या व कंसात हेक्टर क्षेत्र
द. सोलापूर १८५०० (१७५०० हेक्टर)
बार्शी ५२९२५ (४७४५१ हेक्टर)
अक्कलकोट ४३४९२ (४७६०० हेक्टर)
मोहोळ २५५०० (१५०० हेक्टर)
माढा ३१५० (७६१० हेक्टर)
करमाळा ११४२५ (७६१० हेक्टर)
एकूण १५४९९२ (१३३६७६ हेक्टर)