यंदा रेशनवर गव्हाबरोबरच ज्वारीही मिळणार

यंदा रेशनवर गव्हाबरोबरच ज्वारीही मिळणार
सांगोला (प्रतिनिधी): राज्यात अकोला, बुलढाणा आणि वाशिम जिल्ह्यांत ज्वारीचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन झाले आहे. त्यामुळे यंदा शासनाकडून रेशनवर गव्हाबरोबरच ज्वारीही मिळणार असून ऑक्टोबर आणि नोव्हेंबर प्राप्त झाले आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना रुचकर चपातीबरोबरच पौष्टिक भाकरीची चवही घेता येणार आहे.
गरीब आणि दुर्बल गटातील लोकांसाठी अन्नधान्याची सुलभ, किफायतशीर दरामध्ये उपलब्धतेसाठी राष्ट्रीय अन्नसुरक्षा कायदा २०१३ च्या तरतुदी करण्यात आली. कोरोना साथीच्या कालावधीत अंत्योदय आणि प्राधान्य कुटुंबांना मोफत धान्य देण्यास प्रारंभकरण्यात आला. केंद्र सरकारच्या नवीन एकात्मिक अन्नसुरक्षा योजनेस १ जानेवारी २०२३ पासून सुरू केली. अंत्योदय आणि प्राधान्य कुटुंबाला पुढील पाच वर्षांसाठी (२०२८ पर्यंत) मोफत धान्य दिले जाणार आहे.
सोलापूर जिल्ह्यात 6 लाख 64 हजार 875 कार्डधारक आहेत. यामध्ये 28 लाख 32 हजार 182 युनिट आहेत. तर प्राधान्यक्रममधील 16 लाख 3 हजार 792 तर अंत्योदयचे 2 लाख 16 हजार 420 एवढ्या युनिटला धान्य मिळते. राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा 2013 या योजनेंतर्गंत 3 लाख 70 हजार 712 प्राधान्यक्रम कुटूंबातील प्रति व्यक्ती 3 किलो तांदूळ आणि 2 किलो गहू दिले जाते. तर अंत्योदयमधील 51 हजार 349 इतक्या कार्डवर यामधून प्रति कार्ड 35 किलो धान्य मिळते. यात 20 किलो तांदूळ आणि 15 किलो गहूचा समावेश आहे. तर 2 लाख 42 हजार 814 या लोकांना कोणत्याही प्रकारचे धान्य वाटप करण्यात येत नाही. माळशिरस तालुक्यात सर्वाधिक 87 हजार कार्डधारक आहेत. तर उत्तर सेलापूरात सर्वात कमी 19 हजार 449 इतके आहेत. सोलापूर जिल्ह्यात सुमारे 40 टक्के लोकांना रेशन दुकानाचे धान्य मिळत नाही.
यंदा शासनाकडून रेशनवर गव्हाबरोबरच ज्वारीही मिळणार असून ऑक्टोबर आणि नोव्हेंबर प्राप्त झाले आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना रुचकर चपातीबरोबरच पौष्टिक भाकरीची चवही घेता येणार आहे.नज्वारी हे एक बहुमुखी धान्य आहे जे सहजपणे विविध पदार्थांमध्ये समाविष्ट केले जाऊ शकते. त्याचे ग्लुटेन-मुक्त निसर्ग आणि समृद्ध पोषक प्रोफाइल हे आरोग्य-सजग व्यक्तींसाठी एक उत्कृष्ट पर्याय बनवते.
या बारा जिल्ह्यांना धान्य उचल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत
जिल्हा – ज्वारी (क्विंटल)
नांदेड – ४७४६०
परभणी – २८७५०
बीड – ३६७३०
धाराशिव – २६०२०
अहिल्यानगर – ६४८६०
लातूर – ३९५६०
सोलापूर – ४०२६०
सोलापूर एफडीओ – १०७६०
पुणे – ५६८८०
पुणे एफडीओ – २७४८०
सातारा – ३७२६०
सांगली – ३९३००