सह्याद्री फार्मसी कॉलेजमध्ये शिक्षक दिन उत्साहात साजरा

सह्याद्री फार्मसी कॉलेजमध्ये शिक्षक दिन उत्साहात साजरा
सांगोला (प्रतिनिधी): सह्याद्री कॉलेज ऑफ फार्मसी, मेथवडे या महाविद्यालयात शिक्षक दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. शिक्षक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाची सुरवात संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ.दिलीपकुमार इंगवले सर व महाविद्यालय प्राचार्य डॉ.मनोजकुमार पाटील यांच्या हस्ते व सर्वांच्या उपस्थितीत सरस्वती मातेच्या व माजी राष्ट्रपती डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण व दीपप्रज्वलन करून झाली.
यावेळी मान्यवरांच्या हस्ते महाविद्यालयातर्फे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा श्रीफळ, पुष्पगुच्छ, भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी प्रा.पी.एन.बंडगर, डी.फार्मसी द्वितीय वर्षाची विद्यार्थिनी कु.भारती मोटे, कु.ज्योती खिलारे,कु.श्रद्धा पवार यांनी आपले मनोगत व्यक्त केले. शिक्षक हा ज्ञानाचा व पवित्रतेचा सागर असून तो आदर्श नागरिक घडवतो, शिक्षक हा भावी पिढीचा शिल्पकार असून त्यांच्याकडूनच आपल्याला ज्ञान व जगाकडे पाहण्याची सकारात्मक दृष्टी मिळते. शिक्षकांचे विद्यार्थ्यांच्या यशस्वी जीवनातील व देशाच्या विकासाच्या जडणघडणीत मोलाचे योगदान आहे असे आपले मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन कु.अंजली घुले, कु.प्रतीक्षा पवार यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महाविद्यालय सांस्कृतिक विभागाचे डॉ.एन ए.तांबोळी, प्रा.अदिती पवार व सर्व तृतीय वर्ष बी.फार्मसी व द्वितीय वर्ष डी.फार्मसी विद्यार्थ्यांचे योगदान लाभले.



