Good News राज्यातील एकूण पाणीसाठा ८१ टक्क्यांवर…
उजनी, राधानगरी, चासकमान, भाटघर १०० टक्के भरले

राज्यातील लहान, मध्यम व मोठ्या अशा एकूण २,९९७ इतक्या धरणांमध्ये यावर्षी २१ ऑगस्ट अखेर सुमारे ८१.२२ टक्के म्हणजेच ४१,३७७ दशलक्ष घनफूट इतका उपयुक्त पाणीसाठा आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत हा साठा १२ टक्क्यांनी अधिक आहे.
राज्यात १३८ मोठी धरणे, २६० मध्यम प्रकल्प आणि २५९९ लघु प्रकल्प आहेत. राज्यात ऑगस्ट महिन्यातील सुरुवातीच्या खंडानंतर पावसाने पुन्हा जोर धरला असून बहुतांश धरणांमध्ये पाणीसाठा वाढला आहे. काही धरणे पूर्ण क्षमतेने भरली आहेत तर मराठवाडा आणि विदर्भातील काही धरणांमध्ये अजूनही कमी पाणीसाठा आहे. २० ऑगस्ट पर्यंत उजनी, राधानगरी, चासकमान, भाटघर सह इतर सहा धरणे १०० टक्के भरली असून, बहुतांश धरणांमध्ये ९० टक्क्यांहून अधिक पाणीसाठा आहे. मुंबई, कोकण आणि पुणे विभागातील धरणांची स्थिती समाधानकारक असली, तरी मराठवाडा आणि विदर्भातील काही धरणांमध्ये पाण्याची पातळी कमी आहे. या धरणांमधील पाण्याचा साठा पूर्ण क्षमतेने भरला असून, काही ठिकाणी ओव्हरफ्लोची स्थिती आहे. यामुळे या भागातील पाणीपुरवठा आणि शेतीच्या गरजा पूर्ण होण्यास मोठी मदत होईल.
राज्यातील एकूण २,९९७ लहान, मध्यम आणि मोठ्या धरणांमधील पाणीसाठा २१ ऑगस्ट २०२५ पर्यंत ८१.२२ टक्क्यांवर पोहोचला आहे. पुणे विभागातील ७२० प्रकल्पांमधील पाणीसाठा ८९.३२ टक्के, कोकण विभागातील १७३ प्रकल्पांमधील पाणीसाठा ९०.९३ टक्के, नागपूर विभागातील ३८३ प्रकल्पांमधील पाणीसाठा ७०.९० टक्के आहे, अमरावती विभागातील २६४ प्रकल्पांमधील पाणीसाठा ७९.०५ टक्के, छत्रपती संभाजीनगर विभागातील ९२० प्रकल्पांमधील पाणीसाठा ७३.६९ टक्के, नाशिक विभागातील ६३७ प्रकल्पांमधील पाणीसाठा ७३.०८ टक्के आहे.
विभागनिहाय धरणांच्या पाणीसाठ्याची सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे…
नागपूर विभागातील धरणांची स्थिती
बावनथडी धरण ३९.४९ टक्के, गोसीखुर्द धरण ४५.५२ टक्के, असोलामेंढा १०० टक्के, दिना १०० टक्के, इटीयाडोह धरण १०० टक्के, सिरपूर धरण ८८.२२ टक्के, कामठीखैरी धरण ९०.७९ टक्के, तोतलाडोह धरण ७२.३३ टक्के, वडगाव धरण ९१.५८ टक्के, निम्न वर्धा धरण ६३.६३ टक्के.
अमरावती विभागातील धरणांची स्थिती
काटेपूर्णा धरण ८८.४१ टक्के, उर्ध्व वर्धा धरण ८०.८२टक्के, खडकपूर्णा धरण ८९.११ टक्के, अरुणावती ७०.५९ टक्के, इसापूर धरण ९७.२३ टक्के.
छत्रपती संभाजीनगर विभागातील धरणांची स्थिती
पैठण (जायकवाडी) ९५.३३ टक्के, माजलगाव ६३.१८ टक्के, मांजरा १०० टक्के, सिद्धेश्वर ९०.८७ टक्के, येलदरी ९५.८२ टक्के, निम्न मनार १०० टक्के, विष्णूपुरी ५६.६४ टक्के, निम्न तेरणा ९५.११ टक्के, सीना कोळेगाव ९७.२६ टक्के, निम्न दुधना ७१.०८ टक्के,.
नाशिक विभागातील धरणांची स्थिती
भंडारदरा धरण ९७.८० टक्के, मुळा धरण ८९.७६ टक्के, निळवंडे २ धरण ९५.५७ टक्के, वाघूर ७३.५५ टक्के, उर्ध्व तापी हतनूर धरण ४०.३९ टक्के, दारणा धरण ९४.६२ टक्के, गंगापूर धरण ९३.६३ टक्के, गिरणा धरण ७१.०६ टक्के, करंजवण धरण ९३.८९ टक्के, वैतरणा ज. वि. प्रकल्प ९५.९० टक्के,
पुणे विभागातील धरणांची स्थिती
दूधगंगा ८७.२४ टक्के, राधानगरी ९९ टक्के, तुळशी ९७.६९ टक्के, नीरा देवधर ९८.२४ टक्के, डिंभे ९६.५२ टक्के, भामा आसखेड ९९.०९ टक्के, चासकमान १०० टक्के, भाटघर ९९.५६ टक्के, मुळशी टाटा १०० टक्के, वारणा ८८.९२ टक्के, धोम बलकवडी ९३.२२ टक्के, धोम ९५.७६ टक्के, कोयना ९४.१६ टक्के, उरमोडी ९६.५१ टक्के, वीर ९४.०८ टक्के, उजनी १०० टक्के.
कोकण विभागातील धरणांची स्थिती
धामणी ९९.०६ टक्के, तिल्लारी ८७.५३ टक्के, बारवी १०० टक्के, भातसा ९५.३१ टक्के, मोडक सागर धरण ९०.६३ टक्के, तानसा धरण ९८.६८टक्के,