कार्यकर्त्यांनो लागा तयारीला…सांगोला नगरपालिका प्रभाग रचना जाहीर
११ प्रभागांमधून २३ नगरसेवक निवडून द्यावे लागणार..!

सोमवार १८ ऑगस्ट रोजी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सभागृहात प्रशासक तथा मुख्याधिकारी डॉ.सुधीर गवळी यांच्या अध्यक्षतेखाली सांगोला नगरपालिका प्रभाग रचना जाहीर करण्यात आली.
आगामी नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोमवारी सांगोला नगरपालिकेची प्रारूप प्रभाग रचना जाहीर करण्यात आली. २०११ च्या जनगणनेनुसार सांगोला शहराची लोकसंख्या ३४ हजार ३२१ असून येत्या काळात होणार नगरपालिका निवडणुकीत ११ प्रभागांमधून २३ नगरसेवक निवडून द्यावे लागणार आहेत. दहा प्रभाग द्विसदस्यीय तर एक प्रभाग त्रि सदस्यीय राहणार आहे. या प्रभाग रचनेवर नागरिकांच्या हरकती, सूचना असतील तर ३१ ऑगस्ट रोजी दुपारी तीन वाजेपर्यंत नगरपालिका कार्यालयात सादर कराव्या लागणार आहेत. आलेल्या हरकती व सूचनांवर सुनावणी घेऊन २६ सप्टेंबर रोजी अंतिम प्रभाग रचना जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती प्रशासक तथा मुख्याधिकारी डॉ सुधीर गवळी यांनी दिली.
विधानसभेच्या निकालानंतर नेतेमंडळींना जिल्हा परिषद, महापालिका, पंचायत समित्या, नगरपालिकांच्या निवडणुकीचे वेध लागले आहेत. या स्थानिक स्वराज्य संस्था बरखास्त होऊन चार वर्षांहून अधिक कालावधी झाला आहे. कधी आरक्षणाच्या मुद्यावरून तर कधी आरक्षणाच्या न्यायालयीन प्रक्रियेमुळे या निवडणुका लांबणीवर पडल्या होत्या. नगरपालिका निवडणुकीची प्रभाग रचना जाहीर झाल्यानंतर इच्छुकांनी तयारी सुरू केली आहे.
सांगोला नगरपालिकेची प्रभाग रचना पुढीलप्रमाणे
प्रभाग क्रमांक १
सदस्य संख्या २
लोकसंख्या – एकूण – ३९८६
बावनपीर दर्गा, २२० के. व्ही सबस्टेशन, वंदेमातरम चौक, आयटीआय कॉलेज, फॅबटेक कॉलेज, बुरांडे-शिंगाडे वस्ती, मुजावर-मुलाणी वस्ती, आरक्षण क्र. ४७ बगीचा, ॲड ढेरे वसाहत, मस्के कॉलनी, गणेश मंगल कार्यालय
प्रभाग क्रमांक – २
सदस्य संख्या – २
लोकसंख्या एकूण ३२२०
पोलीस कॉलनी, यशनगर, साठेनगर, पंचायत समिती, विद्यामंदीर प्रशाला, विद्यानगर कॉलनी, देशमुख वस्ती, पाचीपट्टा, नरुटे वस्ती, बिलेवाडी, आनंदनगर, कोपटे वस्ती, कृषी उत्पन्न बाजार समिती, मणेरी मळा.
प्रभाग क्रमांक ३
सदस्य संख्या २
लोकसंख्या एकूण – २८८५
साळुंखे वस्ती, रामकृष्ण व्हिला मंगल कार्यालय, पवार वस्ती, आयोध्या नगरी, भिमनगर, बुंजकर वस्ती, जांगळे वस्ती, भाकरे मळा, माता-बालक उत्कर्ष शाळा.
प्रभाग क्रमांक ४
सदस्य संख्या – २
लोकसंख्या एकूण – २७९५
सनगर गल्ली, वज्राबाद पेठ, दक्षता हॉस्पिटल, तेली गल्ली, गोंधळी गल्ली, कैकाडी गल्ली, कुंभार गल्ली, आठवडा बाजार संकुल, बंधन बँक, आण्णाभाऊ साठे पुतळा, तहसिल कार्यालय
प्रभाग क्रमांक ५
सदस्य संख्या – २
लोकसंख्या एकूण – ३०३४
अहिल्यादेवी पुतळा, धनगर गल्ली वसाहत, इंदिरानगर झोपडपट्टी, संजयनगर झोपडपट्टी, ग्रामीण रुग्णालय वसाहत, सटवाई मंदीर, पुजारवाडी शाळेसमोरील वसाहत, सांगोला न्यायालय, क्रीडा संकुल
प्रभाग क्रमांक – ६
सदस्य संख्या – २
लोकसंख्या एकूण – २७८६
ॲड. बनकर वकील वसाहत, धोंडीराम जाधव वस्ती, माळवाडी, राऊतमळा, चांडोलेवाडी, शेंबडेवस्ती, पिराचा टेक, हटसन डेअरी, सिध्दीविनायक अपार्टमेंट, लिंगे वस्ती
प्रभाग क्रमांक ७
सदस्य संख्या – २
लोकसंख्या एकूण ३०८९
हॉटेल वरुणराज, आदर्श प्राथमिक विद्यालय वसाहत, मिरज रोड उत्तर बाजू वसाहत, प्रदीप सावंत वसाहत, लक्ष्मीनगर झोपडपट्टी, गणेश नगर, गौरी पेट्रोल पंप, बनकर वस्ती, सह्याद्री इंग्लिश मेडियम स्कूल वसाहत
प्रभाग क्रमांक ८
सदस्य संख्या – २
लोकसंख्या एकूण – २६९२
चौंडेश्वरी नगर, करीम कॉम्प्लेक्स, पंचशील नगर, खोडबुळे वस्ती, न्यु इंग्लिश स्कूल, जिव्हाळा नगर, हॉटेल विसावा, शिवाजीनगर, दत्तनगर, अल्टीमेट फिटनेस जीम
प्रभाग क्रमांक – ९
सदस्य संख्या – २
लोकसंख्या – एकूण – २८१०
छ. शिवाजी महाराज चौक, नेहरू चौक, मणेरी चौक, मुजावर गल्ली, त्रिमुर्ती टॉकीज, बेले वसाहत, खंदक परिसर, कोष्टी गल्ली परिसर, चौंडेश्वरी मंदीर बीएसएनएल ऑफीस, बस स्टॅण्ड
प्रभाग क्रमांक १०
सदस्य संख्या २
लोकसंख्या एकूण – ३०९८
शनी मंदीर, मठाचा बोळ, पंढरपुर अर्बन बँक परिसर, सिटी पोस्ट, डबीर चौक, सांगोला सोनोग्राफी सेंटर, खडतरे गल्ली उद्यान, खडतरे गल्ली नवीन वसाहत, डॉ. केळकर हॉस्पिटल, देशपांडे व गल्ली, महादेव गल्ली, चौंडेश्वरी मंदीर.
प्रभाग क्रमांक ११
सदस्य संख्या – ३
लोकसंख्या एकूण – ४७२६
कडलास चौक, ॲड. संपत पाटील वस्ती, अलराईन नगर, वासुद रोड पुर्व भाग, सांगोला कॉलेज, केदार-सुरवसे वस्ती, दादासाहेब खडतरे वस्ती, भुईटे वस्ती, चौगुले-चोरमुले वस्ती, शिवाजी पॉलिटेक्निक, गेजगे वस्ती, पारे रोड व लगतच्या वस्त्या