सह्याद्री फार्मसी कॉलेजच्या बी.फार्मसीच्या विद्यार्थ्यांचे विद्यापीठ परीक्षेत घवघवीत यश

सह्याद्री फार्मसी कॉलेजच्या बी.फार्मसीच्या विद्यार्थ्यांचे विद्यापीठ परीक्षेत घवघवीत यश
सांगोला (प्रतिनिधी): डॉ.बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ,लोणेरे, रायगड यांनी चतुर्थ व तृतीय वर्ष बी.फार्मसी वर्षांयाच्या विद्यार्थ्यांसाठी घेतलेल्या अंतिम सत्र परीक्षेत सह्याद्री फार्मसी कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले. चतुर्थ वर्ष बी.फार्मसीच्या अंतिम सत्र परीक्षेत प्रथम क्रमांक कु.देशमुख श्रुती संतोष -सीजीपीए ८.६७,द्वितीय क्रमांक चि.शंतनू आनंद बेले-सीजीपीए-८.५८ व तृतीय क्रमांक कु.लोकरे स्नेहल विजय-सीजीपीए ८.५४ तर तृतीय वर्ष बी.फार्मसीच्या अंतिम सत्र परीक्षेत प्रथम क्रमांक कु.प्रगती अनिल भुई -एस जीपीए-८.७३, द्वितीय क्रमांक कु.प्राची प्रकाश पाटील-एसजीपीए-८.६०,तृतीय क्रमांक कु.उत्कर्षा सहदेव जगताप-एसजीपीए-८.५३ गुण घेऊन डॉ.बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे, रायगड विद्यापीठात विशेष प्राविण्यासहीत उत्तीर्ण झाले.
या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ.दिलीपकुमार इंगवले, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.मनोजकुमार पाटील, परीक्षा विभागाचे प्रमुख डॉ.एस एम.मोरे,डॉ .एस.ए.माळी यांनी सत्कार करून त्यांच्या उज्वल भविष्यासाठी शुभेछया दिल्या.यशस्वी विद्यार्थ्यांनी, महाविद्यालयात असणारे अनुभवी व तंज्ञ प्राध्यापक,अभ्यासमय वातावरण,अद्यावत कलासरूम,सुसज्य प्रयोगशाळा व लायब्ररी,महाविद्यालयाची शिस्त व अनुशासन यांचा या यशात बहुमोल वाटा आहे असे मनोगत व्यक्त केले.