सामाजिक

शिरभावी पाणीपुरवठा योजना थकबाकीच्या विळख्यात; ५७ गावांसह संस्थांकडे १ कोटी ६४ लाखांची थकबाकी

सांगोल्यात ११ गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा, सहा गावांत टँकरचा प्रस्ताव, शिरभावी पाणीपुरवठा योजनेतून 36 गावांना पाणीपुरवठा 

शिरभावी पाणीपुरवठा योजना थकबाकीच्या विळख्यात; ५७ गावांसह संस्थांकडे १ कोटी ६४ लाखांची थकबाकी

सांगोल्यात ११ गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा, सहा गावांत टँकरचा प्रस्ताव, शिरभावी पाणीपुरवठा योजनेतून 36 गावांना पाणीपुरवठा 

सांगोला (प्रतिनिधी): सांगोला तालुक्याची जीवनदायिनी ठरलेली महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या उपविभागांतर्गत कार्यरत शिरभावी व ८१ गावांच्या प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजनेवर थकबाकीचे संकट गडद झाले आहे. ऑगस्ट २०२६ अखेर ५७ गावांकडे तब्बल १ कोटी ६४ लाख १२ हजार ५५७ इतकी थकबाकी असून योजनेच्या आर्थिक व्यवस्थापनावर ताण निर्माण झाला आहे. सांगोला तालुक्यात पावसाने ओढ दिल्याने पिण्याच्या पाण्याची टंचाई दिवसेंदिवस तीव्र होत आहे. सध्या शिरभावी पाणीपुरवठा योजनेतून 36 गावांना पाण्याचा पुरवठा करण्यात येत आहे.  सध्या सांगोला तालुक्यातील ११ गावांमधील १८ हजार ७३६ नागरिकांना टँकरद्वारे १६ खेपा करून तीन लाख लिटर पाणीपुरवठा करण्यात येत आहे. घेरडी, सोनलवाडी, मानेगाव, आलेगाव, जुजारपूर आणि वाणीचिंचाळे या गावांना नव्याने टँकरने पाणीपुरवठा करण्याचे प्रशासनाकडे प्राप्त झाले आहेत. त्यामुळे आगामी काळात तालुक्यातील पाणीटंचाई आणखी गंभीर होण्याची शक्यता आहे.

शिरभावीसह ८१ गावांना वर्षभर अखंडितपणे पाणीपुरवठा करणारी योजना म्हणून या योजनेचा राज्यात नावलौकिक आहे. पण वेळोवेळी थकबाकीची रक्कम वाढत असल्याने ही योजना आर्थिक संकटात सापडली आहे. अनेक गावांची थकबाकी मोठया प्रमाणावर आहे. दुष्काळी असलेल्या सोलापूर जिल्ह्यात ऐन उन्हाळ्यात देखील वेळेवर पाणीपुरवठा होणारा तालुका म्हणून सांगोला तालुक्याची ओळख आहे. सांगोला तालुक्याची जीवनदायिनी ठरलेली शिरभावी पाणीपुरवठा योजना थकबाकीमुळे आर्थिक संकटात सापडली आहे. सोलापूर जिल्ह्यात ऐन उन्हाळ्यातही वेळेवर पाणीपुरवठा होणारा तालुका अशी सांगोल्याची ओळख या योजनेमुळेच निर्माण झाली. मात्र वाढत्या थकबाकीमुळे योजनेच्या देखभाल, दुरुस्ती व नियमित खर्च भागविणे कठीण होत चालले आहे. अनेक गावांची थकबाकी लाखोंच्या घरात पोहोचल्याने प्रशासन चिंतेत आहे.

शिरभावी पाणीपुरवठा योजनेतील थकबाकी असलेली गावे पुढीलप्रमाणे, शिरभावी २,६६,३५४, संगेवाडी ७५,३४१, मेथवडे १२,९४,०४२, मेथवडे (माळीवस्ती) २,५८,७९९, देवळे ७५,६९४, मांजरी ९,९९,७४३, बामणी २,८१,७८८, सावे ४,०५,७८५, धायटी १,०८,३१७, चिचोली ३,०६,४०२, हलदहिवडी ७६,३१२, वाकि (शि) २,९५,८९८, शिवणे २,४२,७०१, खिलारवाडी ६३,१९१, महूद २८,८०,५८२, महिम १,८२,६७५, गायगव्हाण १९,८९५, देवकतवाडी २,८४,७६८, खवासपूर ४,५८,०६५, एखतपूर ९५,७११, लोटेवाडी २,४५,४०९, कटफळ ४,५५४, अचकदाणी ३,०२,२१४, लक्ष्मीनगर ५,४७,२११, सोनलवाडी १८१, बागलवाडी ६०, वाकी- नरळे वस्ती ४,७५,३७७, वाकि (घे) ६७७, वाणीचिंचाळे ७२६, आलेगाव २,३०,८२२, घेरडी ९०,३३९, मेडशिंगी २०, वाढेगाव १४,२१,८७१, हबीसेवाडी १,४१,११८, डिकसळ ४,२०७, हंगिरगे १,४६,५४०, लोणविरे २८,९४९, हणमंतगाव १,१४५, कडलास ३२,६५४, आगलावेवाडी २९,३०९, बुरुंगेवाडी ६,५२८, जवळा १,४१,७१६, राजुरी १०२, कारंडेवाडी २,८९,९४६, तरंगेवाडी ७४,८१३, भोपसेवाडी २,८४,२४४, नाझरे ७७,७२५, वझरे ३,९४,६३१, अनकढाळ ४,५१२, अजनाळे १३९, य.मंगेवाडी ९३,८५६, गोडसेवाडी १३,०६३, कमलापूर ३,७०२, अकोला २,७१,८२४, कोळे ७,२७,७१०, बुध्देहाळ २०,०२८, सोमेवाडी ९९,६२०, जुजारपूर २,४६,६८७, हायवे कोळा २०,८९८ अशी १ कोटी ५१ लाख ४५ हजार ५७५ रुपयांची थकबाकी आहे. मेथवडे, मांजरी, सावे, चिंचोली, महूद, खवासपूर, लक्ष्मीनगर, वाढेगाव, कोळा, वाकी नरळे वस्ती, जुजारपूर आदी गावे थकबाकीत आघाडीवर असल्याचे चित्र आहे.
तर शेतकरी सहकारी सूत गिरणीकडे ६ लाख ४२ हजार २३०, महिला सूत गिरणीकडे २७ हजार ८४२, मंगळवेढा पंचायत समिती २ लाख ८९ हजार २२६, पंढरपूर पंचायत समिती ४३ हजार २००, सांगोला तहसील कार्यालय २ लाख ६४ हजार ४८५ अशी एकूण १२ लाख ६६ हजार ९८३ हजार रुपये इतकी थकबाकी आहे. गावे आणि संस्था मिळून १ कोटी ६४ लाख १२ हजार ५५७ रुपये इतकी थकबाकी आहे.

वाढत्या थकबाकीचा प्रश्न निकाली काढण्यासाठी प्रशासनाने संबंधित गावांना व संस्थांना तातडीने देयके भरण्याचे आवाहन केले आहे. अन्यथा भविष्यातील पाणीपुरवठ्याच्या नियोजनावर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. सांगोला तालुक्याच्या पाणी सुरक्षेसाठी शिरभावी योजनेचे आर्थिक सुदृढीकरण अत्यावश्यक असल्याचे मत नागरिकांतून व्यक्त होत आहे.

२०१८ च्या दुष्काळात नागरिकांना पिण्याचा पाण्याचा पुरवठा करण्यासाठी शिरभावी योजनेमधून मंगळवेढा व पंढरपूर पंचायत समितीच्या ग्रामीण पाणीपुरवठा  विभागाला टँकर भरण्यासाठी पाणी उपलब्ध करून दिले होते. परंतु सहा वर्षांनंतरही मंगळवेढा व पंढरपूर पंचायत समितीने शिरभावी योजनेची बिले थकवली आहेत. मंगळवेढा पंचायत समितीकडे २ लाख ८९ हजार २२६ रुपये, पंढरपूर पंचायत समितीकडे ४३ हजार २०० रुपये, सांगोला तहसिल कार्यालयाकडे २ लाख ६४ हजार ४८५ इतकी थकबाकी आहे.

सध्या सांगोला तालुक्यात भीषण दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली असून नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा आणि जनावरांच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. शिरभावी पाणीपुरवठा योजनेतून सांगोला तालुक्यातील य. मंगेवाडी , गायगव्हाण , आलेगाव, आगलावेवाडी , गोडसेवाडी, देवळे , राजापूर , शिवणे , वाकी (शिवणे), अचकदाणी, सोनलवाडी, संगेवाडी, डोंगरगाव , मानेगाव, मेडशिंगी, बुरलेवाडी, वाकी (घेरडी), घेरडी , मेथवडे (माळीवस्ती), एखतपूर, सावे, मेथवडे, लोटेवाडी, सातारकरवस्ती, खवासपूर, हणमंतगाव, बुरंगवाडी, जवळा, वाणीचिंचाळे, राजुरी, अनकढाळ, लक्ष्मीनगर, चिचोली, कमलापूर, बामणी, सोनंद, भोपसेवाडी या ३६ गावांना पाणीपुरवठा करण्यात येत आहे.

सांगोला तालुक्यात भीषण दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली असून गेल्या चार महिन्यांपासून तालुक्यातील कमलापूर येथे ३ हजार ५९६ लोकसंख्येसाठी एक टँकर दोन खेपा, चिंचोली येथे २ हजार ४६५ लोकसंख्येसाठी एक टँकर दोन खेपा, चिनके येथे २ हजार ७५० लोकसंख्येसाठी एक टँकर दोन खेपा, राजापूर येथे ६९५ लोकसंख्येसाठी एक टँकर एक खेप, गुणाप्पावाडी येथे ६२३ लोकसंख्येसाठी एक टँकर एक खेप, वाणी-चिंचाळे येथे ९८५ लोकसंख्येसाठी एक टँकर एक खेप, वाढेगाव येथे २ हजार १४० लोकसंख्येसाठी एक टँकर दीड खेप, वासुद येथे ७६३ लोकसंख्येसाठी एक टँकर एक खेप, जुजारपूर येथे ३ हजार २२ लोकसंख्येसाठी एक टँकर दीड खेप, हनमंतगाव येथे ७२७ लोकसंख्येसाठी एक टँकर दीड खेप, तर डोंगरगाव येथे ९७० लोकसंख्येसाठी एक टँकर एक खेप पाणीपुरवठा सुरू आहे. आता त्यात आणखी ५३ वाड्या-वस्त्यांची भर पडणार आहे.

घेरडी परिसरातील यमगरवाडी, बुरुंगलेवाडी, खताळ वस्ती, मेटकरवाडी, दिवाण वस्ती, अवताडे वस्ती, बंडगर वस्ती, देवकतेवाडी, जगधने वस्ती, पाणीपुरवठा कुंभार वस्ती, खांडेकर वस्ती व सरगर वस्ती आदी वाड्या-वस्त्यांवरील ९ हजार ७२० तर सोनलवाडी १४ वाड्या-वस्त्यांमधील १ हजार २६०, मानेगावमधील ५ वाड्या वस्त्यांवरील ९७५, आलेगाव १९ वाड्या वस्त्यांवरील ३ हजार १२ आणि वाणीचिंचाळे ६ वाड्या-वस्त्यांवरील ९७० अशा एकूण ५२ वाड्या-वस्त्यांवरील १५ हजार ३७ लोकसंख्येला टँकरने पाणीपुरवठा करण्याची मागणी त्या-त्या गावचे सरपंच, ग्रामसेवक यांनी केली आहे. पंचायत समिती पाणीपुरवठा विभागाकडे प्राप्त झालेले हे प्रस्ताव तात्काळ मंजुरीसाठी तहसील कार्यालयाकडे पाठविण्यात आले आहेत. तहसील कार्यालयाकडून मंजुरी मिळताच मागणी केलेल्या गावांमध्येही टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्यात येणार असल्याची माहिती पाणीपुरवठा विभागाकडून देण्यात आली.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!