सामाजिक

“शिरभावी योजनेतून भागवली जातेय २६ हजार नागरिकांची तहान”

सांगोल्यात ९ ग्रामपंचायतींना तातडीने पाणीपुरवठा सुरू; आणखी ६ गावांची पाण्याची मागणी

“शिरभावी योजनेतीन भागवली जातेय २६ हजार नागरिकांची तहान”

सांगोल्यात ९ ग्रामपंचायतींना तातडीने पाणीपुरवठा सुरू; आणखी ६ गावांची पाण्याची मागणी

सांगोला (प्रतिनिधी): सांगोला तालुक्यातील भीषण उन्हाळा आणि वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर पाण्याची टंचाई तीव्र होत असताना शिरभावी प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजना नागरिकांसाठी जीवनवाहिनी ठरत आहे. ८२ गावच्या शिरभावी प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजनेतून सांगोला तालुक्यातील सोनलवाडी, अचकदाणी, वाकी-शिवणे ,गायगव्हाण, संगेवाडी, आलेगाव, देवळे राजापूर व शिवणे या ९ गावांना पाणीपुरवठा करुन सुमारे २६ हजार ३२६ नागरिकांची तहान भागवली जात आहे. तर आणखी सहा गावांची मागणी असल्याने त्या ठिकाणीही येत्या दोन दिवसात पाणीपुरवठा सुरू करण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.

सांगोला तालुक्यात वाढत्या प्रचंड तापमानामुळे गाव पातळीवरील पाणीपुरवठा विहिरींची पाणी खलावत चालली आहे तर काही ठिकाणी विहिरीतील पाणी आटल्याने नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे गाव, वाड्यावस्त्यावरील पिण्याच्या पाण्याचा आधार असणा-या हातपंपाची पाणी पातळी खोलवर गेली आहे त्यामुळे नागरिक महिला आबालवृद्धांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. सांगोला तालुक्यातील सोनलवाडी, अचकदाणी, वाकी-शिवणे, गायगव्हाण, संगेवाडी, आलेगाव, देवळे, राजापूर व शिवणे या गावांमध्ये सध्या शिरभावी प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेतून नियमित पाणीपुरवठा सुरू आहे. या पार्श्वभूमीवर तालुक्यातील १५ ग्रामपंचायतींनी शिरभावी योजनेकडे लेखी मागणी केली होती. त्यापैकी ९ ग्रामपंचायतींना तातडीने पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे. उर्वरित गावांपैकी अनकढाळ व निजामपूर यांनी स्थानिक स्रोत उपलब्ध झाल्याने पाणीपुरवठा नको असल्याचे कळविले आहे, तर उर्वरित चार ग्रामपंचायतींना लवकरच पाणीपुरवठा सुरू करण्याची तयारी प्रशासनाने केली आहे.

शिरभावी प्रादेशिक नळ पाणीपुरवठा या योजनेअंतर्गत शिरभावी, मानेगाव, कटफळ व वाणीचिचाळे येथील मुख्य टाक्यांना जोडणारी सुमारे ६०० किलोमीटर लांबीची नवीन पाइपलाईन टाकण्यात आली आहे. या पाइपलाईनद्वारे पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी सध्या विविध ठिकाणी चाचण्या सुरू असून, ज्या भागात चाचण्या पूर्ण झाल्या आहेत तेथे नियमित पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे. दरम्यान, शिरभावी योजनेमुळे टंचाईग्रस्त गावांना मोठा दिलासा मिळत असून, येत्या काही दिवसांत आणखी गावांचा समावेश झाल्यास तालुक्यातील पाणीटंचाईचा प्रश्न मोठ्या प्रमाणात मार्गी लागण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

दरम्यान तालुक्यातील‌ सोनलवाडी , अचकदाणी, वाकी, गायगव्हाण, संगेवाडी, आलेगाव, देवळे, शिवणे, राजापूर, गोडसेवाडी , डोंगरगाव, यलमर मंगेवाडी व आगलावेवाडी, अनकढाळ व निजामपूर या १५ ग्रामपंचायतीकडून शिरभावी प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजनेकडे लेखी पत्र देऊन पाणीपुरवठा करण्याची मागणी केली आहे. त्यापैकी संगेवाडी ( १९३९ ), अचकदानी ( ३५२७), वाकी शिवणे (४३६०), गायगव्हाण (१६३५ ), संगेवाडी (२८२५ ), शिवणे (४५१५), आलेगाव ( ४७१५ ), देवळे ( १७८० ), राजापूर (७९० ) अशा एकुण ९ ग्रामपंचायतींना त्यांच्या मागणीनुसार पाणीपुरवठा सुरू केला असून, अनकढाळ व निजामपूर ग्रामपंचायतीने ग्रामीण पाणीपुरवठा विहिरीला पाणी उपलब्ध झाल्यामुळे नको म्हणून सांगितले तर उर्वरित चार ग्रामपंचायतीना लवकरच पाणीपुरवठा सुरू केला जाणार आहे.

शिरभावी प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजनेतंर्गत शिरभावी, मानेगाव, कटफळ, वाणीचिचाळे मुख्य टॅंकला जोडणाऱ्या सुमारे ६०० किमी लांबीच्या नवीन पाईपलाईन टाकली आहे. सदर पाईपलाईन मधून मुख्य टॅंकला पाणीपुरवठा सुरळीत होण्यासाठी चाचण्या सुरू आहेत.ज्या ठिकाणी चाचण्या पूर्ण झाल्या आहेत तेथील पाणीपुरवठा सुरळीत केला आहे.- संजयकुमार स्वामी, प्रभारी उपविभागीय अभियंता सांगोला

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!