राजकीय

“एकदाच संधी द्या, पाच वर्षे तुमचा सालगडी म्हणून काम करेन” – चेतनसिंह केदार सावंत

कारंडेवाडी (बुद्धेहाळ), सोमेवाडी, कारंडेवाडी (उदनवाडी) येथील गावभेट दौऱ्याला ग्रामस्थांचा प्रचंड प्रतिसाद

“एकदाच संधी द्या, पाच वर्षे तुमचा सालगडी म्हणून काम करेन” – चेतनसिंह केदार सावंत

कारंडेवाडी (बुद्धेहाळ), सोमेवाडी, कारंडेवाडी (उदनवाडी) येथील गावभेट दौऱ्याला ग्रामस्थांचा प्रचंड प्रतिसाद

सांगोला (प्रतिनिधी): “मला एकदाच संधी द्या. पुढील पाच वर्षे मी तुमचा सालगडी म्हणून प्रामाणिकपणे काम करेन,” असे भावनिक आवाहन भाजप–शिवसेना–आरपीआय महायुतीचे चोपडी जिल्हा परिषद गटाचे अधिकृत उमेदवार चेतनसिंह केदार सावंत यांनी केले. चोपडी जिल्हा परिषद गटातील कारंडेवाडी (बुद्धेहाळ), सोमेवाडी, कारंडेवाडी (उदनवाडी) येथील गावभेट दौऱ्यात बोलताना त्यांनी सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांवर ठाम भूमिका मांडली.


राज्यात आणि केंद्रात भाजपचे सरकार असून आजवर सर्वसामान्य जनतेला न्याय देण्याची भूमिका केवळ भाजपनेच घेतली असल्याचे चोपडी जिल्हा परिषद गटाचे महायुतीचे उमेदवार चेतनसिंह केदार सावंत यांनी स्पष्ट केले. जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार जयकुमार गोरे यांच्याकडे ग्रामविकास मंत्रालयाचा कारभार असल्यामुळे गावपातळीवरील रस्ते, पाणी, वीज, स्मशानभूमी यांसह सर्व मूलभूत समस्यांवर निश्चितपणे तोडगा काढला जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. “मी आश्वासन देणारा नेता नाही, तर जनतेच्या अडीअडचणी, समस्या प्रत्यक्ष सोडवून काम करणारा एक कार्यकर्ता आहे.

गावागावातील प्रश्न माझ्यासाठी राजकारण नसून जबाबदारी आहे,” असे सांगत त्यांनी विकासापासून वंचित राहिलेल्या प्रत्येक गावाचा सर्वागीण विकास करण्याचा निर्धार व्यक्त केला.
जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपची सत्ता येणार असून जिल्हा परिषदेचा अध्यक्ष हा भाजपचाच होणार, यात कोणतीही शंका नाही. त्यामुळे कमळाला दिलेले एकही मत वाया जाणार नाही. भाजपच्या माध्यमातून चोपडी जिल्हा परिषद गटाचा सर्वांगीण विकास साधला जाईल. “मला मतरूपी जनतेचे आशीर्वाद द्या. मला एकदाच संधी दिलीत, तर या गावासह संपूर्ण चोपडी जिल्हा परिषद गटाचा चेहरामोहरा बदलल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही,” असे ठाम आश्वासन चेतनसिंह केदार सावंत यांनी उपस्थित नागरिकांना दिले.


चोपडी जिल्हा परिषद गटाचे भाजप शिवसेना आरपीआयचे अधिकृत उमेदवार चेतनसिंह केदार सावंत यांनी कारंडेवाडी (बुद्धेहाळ), सोमेवाडी, कारंडेवाडी (उदनवाडी) येथील गावभेट दौऱ्यात गावातील समस्या, अडचणी जाणून घेतल्या. यावेळी भाजपचे मंडल अध्यक्ष दुर्योधन हिप्परकर, चोपडी गावचे उपसरपंच पोपटशेठ यादव, सुभाष गोडसे, सोमेवाडी येथील शिवसेनेचे ज्येष्ठ नेते नारायण गळवे, माजी उपसरपंच भारत गोडसे, चंदू चौगुले, सुखदेव करांडे, मुक्ताआप्पा करांडे, सुमित करांडे, सत्यवान गाडे, बाबू करांडे, बजरंग करांडे, सुशांत करांडे, लक्ष्मण करांडे, बाळू टोणे, सुरेश करांडे, वसंत करांडे, सुरेश काका चौगुले, संजय शेळके, माऊली बनसोडे, सुधीर खांडेकर, केशव काळेल, हणमंत विटेकर, अजित काळेल, औदुंबर गोडसे, विठ्ठल बंदवडे, सिद्धेश्वर शेळके, अशोक ठोंबरे, तात्या खोकले ,राजू गेनुरे, अशोक शेळके, राजू शेळके, गुंडा ठोंबरे, महादेव चौगुले, अशोक वाघमारे, सिद्धेश्वर बंदवडे, बाळू खोकले, अभि शेळके यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या गावभेट दौऱ्याला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. ‘सेवकभावनेने काम करणारा उमेदवार’ अशी भावना मतदारांमध्ये दिसून येत असून प्रचाराला दिवसेंदिवस चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!