‘रुग्णसेवेतून माणुसकीचा जागर’
सांगोल्यात खंडागळे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे समाजभान जपणारे उपक्रम

‘रुग्णसेवेतून माणुसकीचा जागर’
सांगोल्यात खंडागळे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे समाजभान जपणारे उपक्रम
सांगोला (प्रतिनिधी): आज आरोग्यसेवा ही खर्चिक व सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर जात असताना, सांगोला शहरातील खंडागळे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलने मात्र “रुग्णसेवा हीच खरी ईश्वरसेवा” या मूल्याला कृतीत उतरवून समाजासमोर एक आदर्श निर्माण केला आहे. केवळ उपचार नव्हे, तर माणुसकीची ऊब देणारी सेवा देण्याचा प्रामाणिक प्रयत्न येथे सातत्याने केला जात आहे.

दर महिन्याच्या १५ तारखेला मोफत सर्वरोग निदान व उपचार शिबिर आयोजित करून गरीब, गरजू व सर्वसामान्य रुग्णांना आधार देण्यात येतो. या शिबिरात ओपीडी मोफत, तपासण्या सुलभ दरात, तसेच योजनेअंतर्गत होणाऱ्या उपचार व शस्त्रक्रिया अत्यल्प दरात उपलब्ध करून दिल्या जात आहेत. एक्स-रे व ईसीजी तपासणी तसेच गर्भवती मातांची सोनोग्राफी यावर ५० टक्के सवलत देण्यात येत असल्याने अनेक कुटुंबांच्या आरोग्याची चिंता हलकी होत आहे.
या सर्वांपेक्षा अधिक भावनिक व समाजमनाला स्पर्श करणारा उपक्रम म्हणजे ‘स्त्रीजन्माचे स्वागत’. अजूनही मुलीच्या जन्माकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलण्याची गरज असताना, खंडागळे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलने या उपक्रमातून समाजाला सकारात्मक संदेश दिला आहे. कन्यारत्न जन्माला आल्यास नॉर्मल डिलिव्हरीचे हॉस्पिटल बिल पूर्णपणे माफ, तर सिझेरियन झाल्यास हॉस्पिटल बिलामध्ये सवलत देऊन मुलगी ही ओझे नसून आनंदाचा क्षण आहे, हे कृतीतून दाखवून दिले जात आहे.
जन्मानंतर नवजात बाळाला तातडीच्या उपचारांची गरज भासल्यास, काचेच्या (एनआयसीयू) कक्षामध्ये योजनेअंतर्गत मोफत उपचार दिले जात आहेत. बाळ रडत नसणे, कावीळ होणे किंवा कमी दिवसांचे बाळ असणे अशा प्रसंगी आई-वडिलांच्या काळजीवर फुंकर घालण्याचे काम हे हॉस्पिटल करत आहे. आई आणि बाळ – दोघांचेही उपचार एकाच छताखाली, ही सुविधा ग्रामीण भागासाठी आशेचा किरण ठरत आहे.
तसेच जन्मजात बालकांना काचेच्या (एनआयसीयू) कक्षामध्ये ठेवण्याची गरज भासल्यास, योजनेअंतर्गत मोफत उपचार देण्यात येणार आहेत. कमी दिवसांचे बाळ, बाळ रडत नसणे किंवा बाळाला कावीळ झाल्यास तात्काळ उपचाराची सुविधा येथे उपलब्ध आहे. आई व नवजात बाळाच्या उपचारासाठी एकाच छताखाली सर्व आधुनिक सुविधा खंडागळे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये उपलब्ध आहेत.
महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना व प्रधानमंत्री आयुष्मान भारत योजनेअंतर्गत मोफत औषधोपचार व शस्त्रक्रिया उपलब्ध करून देत, डॉ. स्वाती खंडागळे व डॉ. परेश खंडागळे समाजातील शेवटच्या घटकापर्यंत आरोग्यसेवा पोहोचविण्याचे कार्य करत आहेत. आरोग्य ही संपत्ती असली, तरी ती जपण्याची जबाबदारी समाजाची आहे. त्या समाजहिताच्या वाटेवर खंडागळे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलने उचललेले पाऊल सांगोला तालुक्यासाठी नक्कीच अभिमानास्पद आहे.

महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना व प्रधानमंत्री आयुष्मान भारत योजना अंतर्गत येथे मोफत औषधोपचार व शस्त्रक्रिया केल्या जात असून, डॉ. स्वाती खंडागळे व डॉ. परेश खंडागळे यांच्या मार्गदर्शनाखाली रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा या भावनेतून आरोग्यसेवा दिली जात आहे. सांगोला व परिसरातील नागरिकांनी या उपक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन खंडागळे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलकडून करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी 7588506196, 8999611622 या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.



