शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) प्रणित युवासेनेच्या आंदोलनाला मिळाले यश
धाराशिव साखर कारखान्याचा प्रतिटन ३ हजारांचा दर जाहीर

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) प्रणित युवासेनेच्या आंदोलनाला मिळाले यश
धाराशिव साखर कारखान्याचा प्रतिटन ३ हजारांचा दर जाहीर
सांगोला (प्रतिनिधी): वाकी शिवणे येथील धाराशिव साखर कारखाना युनिट क्रमांक ४ ने शेतकऱ्यांच्या उसाला एकरकमी पहिला हप्ता तीन हजार रुपये दर द्यावा, या मागणीसाठी शिवसेना पक्षाच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) युवासेनेचे तालुकाप्रमुख सुभाष भोसलेंसह चौघांचे कारखानास्थळी उपोषण सुरू केले होते. गुरुवारी माजी आमदार दीपकआबा साळुंखे पाटील यांनी उपोषणस्थळी भेट देऊन कारखान्याचे चेअरमन आमदार अभिजित पाटील यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा करून उसाला प्रतिटन ३ हजार रुपयांचा दर देण्याची मागणी केली. धाराशिव कारखान्याने प्रतिटन ३ हजारांचा दर जाहीर केल्याचे पत्रक काढल्याने शेतकरी वर्गातून आनंद व्यक्त केला जात आहे. शुक्रवारी आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख, माजी आमदार दीपकआबा साळुंखे पाटील, डॉ. अनिकेत देशमुख यांच्या हस्ते उपोषणकर्त्यांनी सरबत घेऊन उपोषण सोडले.
वाकी शिवणे (ता. सांगोला) येथील धाराशिव साखर कारखाना युनिट क्रमांक ४ ने शेतकऱ्यांच्या उसाला एकरकमी पहिला हप्ता तीन हजार रुपये द्यावा, या मागणीसाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे युवासेना तालुकाप्रमुख सुभाष भोसले, तालुका समन्वयक शंकर मेटकरी व शाखाप्रमुख सचिन सुरवसे यांनी गेल्या पाच दिवसांपासून कारखाना कार्यस्थळी उपोषण सुरू केले आहे. उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावल्याने आंदोलन अधिक तीव्र होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
दरम्यान, आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख, माजी आमदार दीपकआबा साळुंखे पाटील, डॉ.अनिकेत देशमुख यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेऊन संवाद साधून त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली. त्यावेळी दीपक आबा साळुंखे पाटील यांनी धाराशिव कारखान्याचे चेअरमन आमदार अभिजित पाटील यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधत उसाला प्रतिटन ३ हजार रुपये दर देण्याची मागणी केली. यावेळी झालेल्या चर्चेदरम्यान समाधानकारक तोडगा निघाला. त्यानंतर धाराशिव साखर कारखान्याने चालू वर्षासाठी २९०० रुपये दर जाहीर करून व दीपावलीला शंभर रुपये प्रती टन देण्याचे पत्रक प्रकाशित करून आंदोलकांना दिले.
या निर्णयामुळे माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील यांनी केलेल्या मध्यस्थीनंतर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) युवासेनेचे तालुकाप्रमुख सुभाष भोसले, तालुका समन्वयक शंकर मेटकरी व शाखाप्रमुख सचिन सुरवसे यांच्या आंदोलनाला यश मिळाले असल्याने शेतकरी वर्गातून आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. धाराशिव साखर कारखाना युनिट – ४ नी पहिला हप्ता ३ हजार रुपये पैकी २९०० सुरुवातीला व राहिलेले बिल १०० रुपये दिवाळीला देण्यासह मागील गळीत हंगामातील राहिलेले १०० रुपये बिल देण्याची मागणी मान्य केल्याने शुक्रवारी पाचव्या दिवशी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) प्रणित युवासेनेच्या बेमुदत उपोषणाला यश मिळाले.



