राजकीयसामाजिक

दीपकआबांच्या प्रयत्नातून महिलांसाठी सामाजिक सभागृह बांधण्यासाठी ६ कोटी ५० लाखांचा निधी मंजूर 

दिपकआबांच्या मागणीला महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांची तत्काळ मंजुरी 

दीपकआबांच्या प्रयत्नातून महिलांसाठी सामाजिक सभागृह बांधण्यासाठी ६ कोटी ५० लाखांचा निधी मंजूर

दिपकआबांच्या मागणीला महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांची तत्काळ मंजुरी

 

सांगोला (तालुका प्रतिनिधी): केवळ राजकारण आणि शिक्षणात महिलांना आरक्षण देऊन चालणार नाही तर समाजातही त्यांना मानाचे स्थान आणि प्रतिष्ठा मिळाली पाहिजे या हेतूने माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील यांनी राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांच्याकडे सांगोला तालुक्यातील महिलांना गावोगावी सामाजिक सभागृह मिळावे अशी मागणी केली होती. दिपकआबांच्या मागणीला तात्काळ मंजुरी देत सांगोला तालुक्यातील ३३ कामांना तब्बल ६ कोटी ५० लाख रुपयांचा कामाला महिला बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी निधी उपलब्ध केला आहे.

 

सांगोला तालुक्यातील जवळा, भोपसेवाडी, कोळा, हातीद, संगेवाडी, अजनाळे, वाटंबरे, पाचेगाव बु., हंगीरगे, य. मंगेवाडी, आलेगाव, वाढेगाव, बामणी, मेथवडे, देवळे, सावे, राजापूर, मेडशिंगी गावातील बुर्लेवाडी, वाकी घे, एखतपूर, वा. चिंचाळे, धायटी, उदनवाडी, पारे, मांजरी, देवकतेवाडी, डिकसळ, कटफळ, चिनके या गावांत तर सावे गावातील इमडेवाडी आणि आलेगाव येथील बाबरवाडी येथे महिलांसाठी सामाजिक सभागृह बांधण्यासाठी प्रत्येकी २० लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. तर, मेडशिंगी येथे महिलांसाठी सामाजिक सभागृह बांधण्यासाठी ४० लाख रुपये मंजूर करण्यात आला आहे. या महिला सामाजिक सभागृहात बसून महिलांना राजकीय आणि सामाजिक व्यवस्थेत सहभागी होता येणार आहे.

 

गावोगावी असणाऱ्या समाजमंदिर तसेच अन्य सार्वजनिक ठिकाणी बसून केवळ पुरुषच गावचा कारभार चालवत असतात त्यामुळे सांगोला तालुक्यातील अनेक गावातून महिलाना गावोगावी स्वतंत्र सामाजिक सभागृह बांधून मिळावे अशी मागणी महिला वर्गातून पुढे येत होती. अशा सभागृहात बसून महिलांना त्यांच्या महिला बचत गट आणि राजकीय आणि सामाजिक व्यवस्थेत सहभागी होण्याची संधी मिळणार आहे. तालुक्यातील महिलांच्या या प्रमुख मागणीची माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील यांनी दखल घेऊन याबाबत राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांना महिलांसाठी स्वतंत्र सामाजिक सभागृह मिळावे अशी मागणी केली दिपकआबांच्या या मागणीला अदिती तटकरे यांनी तत्काळ मंजुरी देऊन महिलांना स्वतंत्र सामाजिक सभागृह देण्याचा निर्णय घेतला. या निर्णयामुळे सांगोला तालुक्यातील महिला वर्गातून अदिती तटकरे आणि माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील यांचे आभार व्यक्त होत आहेत.

महिलांना केवळ चूल आणि मूल यापुरते मर्यादित राहू नये. गाव कारभार करणाऱ्या पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून त्यांनी गावाचा आणि समाजाचा कारभार चालवला पाहिजे त्यासाठी महिलांना स्वतंत्र सामाजिक सभागृह मिळावे ही महिलांची भूमिका होती महिलांच्या या मागणीची दखल घेऊन राज्याच्या कर्तबगार महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांच्याकडे मी केलेल्या मागणीला त्यांनी तत्काळ मंजुरी दिल्याने सांगोला तालुक्यातील महिलांना राजकारण आणि समाजकारण करण्यासाठी हक्काचे व्यासपीठ मिळणार आहे. – दिपकआबा साळुंखे पाटील, माजी आमदार, सांगोला.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!