सामाजिक

भगवतभक्त शारदादेवी (काकी) साळुंखे-पाटील यांच्या जयंतीनिमित्त भव्य दिंडी सोहळा व पादुका प्राणप्रतिष्ठापना कार्यक्रम

भगवतभक्त शारदादेवी (काकी) साळुंखे-पाटील यांच्या जयंतीनिमित्त भव्य दिंडी सोहळा व पादुका प्राणप्रतिष्ठापना कार्यक्रम

 

सांगोला (तालुका प्रतिनिधी): आपलं अवघं आयुष्य भागवत धर्माची पताका खांद्यावर घेऊन वारकरी संप्रदायाची सेवा करण्यात व्यतीत केलेल्या भगवत भक्त शारदादेवी (काकी) साळुंखे-पाटील यांच्या 84 जयंती निमित्त उद्या बुधवार दि ३१ डिसेंबर रोजी सकाळी ९ ते १२.३० दरम्यान जवळे येथे भव्य असा पादुका प्राणप्रतिष्ठा सोहळा व दिंडी सोहळा आयोजित करण्यात आला आहे.

कार्यतपस्वी आम.काकासाहेब साळुंखे पाटील व कै.सौ. शकुंतलादेवी थोरल्या काकी यांच्याही पादुकांची दिंडी सोहळ्याद्वारे शारदाई वात्सल्यधाम,अंबिकावस्ती, आलेगाव रोड, जवळे येथे विधिवत प्राणप्रतिष्ठा केली जाणार असून यानिमित्त भव्य अशा दिंडी सोहळ्याचे व अध्यात्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. परम पवित्र पादुकांची प्राणप्रतिष्ठा साळुंखे पाटील घराण्यातील चौथ्या पिढीतील परतवंडांच्या हस्ते होणार असून जवळे हायस्कूल मधून दिंडीचे प्रस्थान होणार आहे. नारायण मंदिर येथे पादुकांचे विधीवत पूजन केले जाणार असून गाव प्रदक्षिणा दिंडीद्वारे घातली जाणार आहे. दिंडी सोहळ्यामध्ये रिंगण, मनोरे यासह नामवंत भजनी मंडळाद्वारे विठ्ठल नामाचा जयघोष केला जाणार आहे.

साळुंखे पाटील घराण्यातील चौथ्या पिढीचे प्रतिनिधी कु.किरण घाडगे, चि.जयदीप घाडगे, चि. निलरुद्र कदम, कु. कात्यायनी पाटील, चि. राजवीर काटकर, चि. युगंधर पाटील, कु.देवीना कदम, चि.सयाजीराजे गायकवाड, चि.आऋष गायकवाड, चि.अयांश आम्रे, चि.अद्वैत गायकवाड चि.ज्योतिरादित्य गोरे कु.दाक्षायणी गोरे यांचे हस्ते पादुकांची प्राणप्रतिष्ठा करण्यात येणार आहे. दिंडीमध्ये जवळे गावातील समर्थ संप्रदाय तसेच दत्त संप्रदाय व आध्यात्मिक मंडळातील महिला जलाचे कलश घेऊन सहभागी होणार आहेत. या अनुपम्य अशा भक्ती सोहळ्यास उपस्थित राहावे असे आवाहन मा.डॉ.प्रदीपदादा साळुंखे-पाटील, मा. आ.दीपकआबा साळुंखे-पाटील, सौ. चारुशीलाताई काटकर, मा. जि.प.अध्यक्षा जयमालाताई गायकवाड यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!