राजकीय

सांगोल्यात राष्ट्रवादीला नवे बळ, प्रमुख कार्यकर्त्यांचा जाहीर पक्षप्रवेश

नूतन पदाधिकाऱ्यांच्या निवडींचा भव्य कार्यक्रम, तालुकाध्यक्ष अतुल पवार यांची माहिती

सांगोल्यात राष्ट्रवादीला नवे बळ, प्रमुख कार्यकर्त्यांचा जाहीर पक्षप्रवेश

नूतन पदाधिकाऱ्यांच्या निवडींचा भव्य कार्यक्रम, तालुकाध्यक्ष अतुल पवार यांची माहिती

सांगोला (प्रतिनिधी): सांगोल्याच्या राजकारणात स्वतंत्र ओळख निर्माण केलेले अतुल (मालक) पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सांगोला तालुकाध्यक्षपदी नुकतीच निवड झाली असून, या निवडीनंतर प्रथमच तालुकास्तरीय संघटन मजबूत करण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात येत आहे. प्रमुख कार्यकर्त्यांचा जाहीर पक्षप्रवेश आणि नूतन पदाधिकाऱ्यांच्या निवडींसाठी भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

हा कार्यक्रम गुरुवार, दिनांक १ जानेवारी २०२६ रोजी दुपारी १२ वाजता, वासूद रोड, कर्मवीर नगर, रोड क्र. ७, सांगोला येथे होणार असून, विविध पक्षांतील अनेक प्रमुख कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश करणार आहेत. याच कार्यक्रमात तालुकास्तरीय नूतन पदाधिकाऱ्यांच्या निवडी अधिकृतरीत्या जाहीर केल्या जाणार आहेत.

याबाबत बोलताना तालुकाध्यक्ष अतुल पवार म्हणाले, “सांगोला तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची संघटनात्मक बांधणी अधिक सक्षम करण्यावर भर दिला जाणार आहे. सर्वसामान्य कार्यकर्त्यांना न्याय देत, त्यांच्या कर्तृत्वाला संधी देण्याचा माझा प्रामाणिक प्रयत्न राहील. तालुक्यातून सक्षम नेतृत्व घडावे, यासाठी मी सातत्याने काम करणार आहे.”

अतुल पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नवचैतन्य निर्माण झाले असून, कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. आगामी काळात सांगोला तालुक्याच्या राजकारणात राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद लक्षणीयरीत्या वाढेल, अशी चर्चा राजकीय व सामाजिक वर्तुळात रंगू लागली आहे. त्यामुळे या कार्यक्रमाकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!