सुनील जवंजाळ यांची अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात निवड

सुनील जवंजाळ यांची अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात निवड
सांगोला (प्रतिनिधी):- चोपडी येथील व लेखक सुनील कालिदास जवंजाळ यांची 99 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात निमंत्रितांच्या कवी संमेलनात निवड झाली आहे.
सोलापूर जिल्ह्यातील निमंत्रितांच्या कवी संमेलनासाठी एकमेव सुनील जवंजाळ यांची निवड झाली आहे.अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे 99 अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन सातारा येथे एक ते चार जानेवारी 2026 या दरम्यान ख्यातनाम साहित्य विश्वास पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार आहे. सुनील जवंजाळ हे नव्या पिढीतील प्रमुख कवी असून त्यांचे वेदनेच्या पाऊलखुणा हा कवितासंग्रह तसेच काळीजकाटा ही कादंबरी व गावपण शोधताना हे ललित प्रसिद्ध आहे.
त्यांच्या या पुस्तकांना अनेक महत्त्वाच्या राज्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आले असून विविध महाविद्यालयातून, विद्यालयातून अनेक ठिकाणी विविध विषयांवर त्यांनी व्याख्याने दिली आहेत. भूमिका निष्ठ लेखनामुळे व उत्कृष्ट कवी संमेलनाच्या सूत्रसंचालनामुळे मराठी साहित्य वर्तुळात त्यांची वेगळी ओळख निर्माण झाली आहे. अखिल भारतीय साहित्य संमेलनात 2 जानेवारी रोजी प्रसिद्ध हास्य कवी अशोक नायगावकर यांच्या अध्यक्षतेखाली दुपारी तीन वाजता मुख्य रंगमंचावर होणाऱ्या कवी संमेलनात ते कविता सादर करणार आहे.
त्यांच्या या निवडीबद्दल सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष तथा महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा सांगोलाचे अध्यक्ष प्रा. प्रबुद्धचंद्र झपके, सर्व संस्था कार्यकारणी सदस्य, महाराष्ट्र साहित्य परिषद सोलापूर प्रतिनिधी कल्याणराव शिंदे, पद्माकर कुलकर्णी, सोलापूर व सांगली जिल्ह्यातील असंख्य साहित्यिकांनी,सांगोला विद्यामंदिर परिवारातील सर्व प्रशासकीय वर्ग, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी त्यांच्या निवडीबद्दल त्यांचे अभिनंदन करत संमेलनासाठी शुभेच्छा दिल्या.



