राजकीय

कार्यकर्त्यांनी खचून न जाता जोमाने कामाला लागावे ; दिपकआबा साळुंखे पाटील

आगामी काळात कार्यकर्त्यांच्या अपेक्षेनुसार योग्य तो निर्णय घेण्यात येणार

कार्यकर्त्यांनी खचून न जाता जोमाने कामाला लागावे ; दिपकआबा साळुंखे पाटील 

आगामी काळात कार्यकर्त्यांच्या अपेक्षेनुसार योग्य तो निर्णय घेण्यात येणार

सांगोला (तालुका प्रतिनिधी): स्थानिक स्वराज्य संस्थांच्या नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकांमध्ये अपेक्षित यश मिळाले नसले तरी कार्यकर्त्यांनी खचून न जाता झालेल्या चुका टाळून नव्या जोमाने कामाला लागावे. तसेच आगामी काळात कार्यकर्त्यांच्या अपेक्षेनुसार योग्य तो निर्णय घेण्यात येईल, असा ठाम निर्धार माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील यांनी व्यक्त केला.

रविवार (दि. ८) रोजी सांगोला येथे आयोजित कार्यकर्त्यांच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी ज्येष्ठ नेते तानाजीकाका पाटील, शिवाजीनाना बनकर, मधुकर बनसोडे, जिल्हा दूध संघाचे संचालक विजय येलपले, चंद्रकांत चौगुले, तुकाराम जाधव, विजय पवार, माजी नगराध्यक्ष अनिल खडतरे, सुनील पाटील, ॲड. यशराजे साळुंखे पाटील, डॉ. पियुष साळुंखे पाटील, समीर पाटील यांच्यासह आजी-माजी पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आणि तालुक्यातील प्रमुख कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. आगामी पंचायत समिती सभापती व उपसभापती निवडीच्या पार्श्वभूमीवर आयोजित या बैठकीकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले होते. अल्पावधीत बैठकीचे नियोजन करूनही सांगोला शहर व तालुक्यातील कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली.

यावेळी बोलताना माजी आमदार दीपकआबा साळुंखे पाटील म्हणाले की, गेली साठ वर्षांहून अधिक काळ साळुंखे पाटील कुटुंब सांगोला तालुक्याच्या राजकारणात सक्रिय असून या काळात तालुक्यातील कार्यकर्त्यांनी सुख-दुःखात कुटुंबातील सदस्याप्रमाणे साथ दिली आहे. कार्यकर्त्यांनी दाखवलेल्या या विश्वासाच्या जोरावरच आगामी काळात त्यांना अपेक्षित असणारा निर्णय घेतला जाईल आणि त्यासाठी कोणतीही किंमत मोजण्याची तयारी आपण ठेवली आहे. ते पुढे म्हणाले, नुकत्याच झालेल्या नगरपालिका, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांमध्ये आमचे उमेदवार अपेक्षेप्रमाणे यशस्वी झाले नसले तरी तालुक्यातील सर्वसामान्य जनतेचा विश्वास आजही साळुंखे पाटील परिवारावर कायम आहे. या विश्वासाच्या बळावर आगामी ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये नव्या जोमाने कामाला लागून पुन्हा एकदा यश संपादन करण्यासाठी कार्यकर्त्यांनी सज्ज व्हावे, असे आवाहन त्यांनी केले.

या बैठकीत मनोज उकळे, लहू कांबळे, अमर लोखंडे, विजय शिंदे, संतोष पाटील, विलास घुले, संभाजी हरिहर, अजित देवकते, सखुबाई वाघमारे, नारायण माळी, अजिंक्य शिंदे, दिपक कांबळे आदी नेते व कार्यकर्त्यांनी मनोगत व्यक्त केले. आगामी काळात दीर्घकालीन राजकारण लक्षात घेऊन माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील यांनी सत्ताधारी पक्षात प्रवेश करून ठोस निर्णय घ्यावा, अशी मागणीही यावेळी कार्यकर्त्यांनी केली.

आत्मपरीक्षण करून कामाची पद्धत बदलणार
“मागील ३० ते ३५ वर्षांच्या राजकीय कारकीर्दीत मी पक्ष, जात किंवा धर्म न पाहता कोणत्याही शिफारशीची वाट न पाहता लोकांची कामे केली. तरीही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत अपेक्षित यश मिळाले नाही. त्यामुळे आत्मपरीक्षण करून आगामी काळात कामाची पद्धत बदलण्याचा प्रयत्न करणार आहे.” — दिपकआबा साळुंखे पाटील

 

कार्यकर्त्यांनी खचून न जाता जोमाने कामाला लागावे ; दिपकआबा साळुंखे पाटील यांचा निर्धार

पुढील भविष्याबाबत कार्यकर्त्यांना अपेक्षित निर्णय घेणार

सांगोला ; तालुका प्रतिनिधी

आजपर्यंतच्या राजकीय इतिहासात स्थानिक स्वराज्य संस्थेत नेहमीच आपले वर्चस्व राहिले होते मात्र नुकत्याच पार पडलेल्या नगरपालिका आणि जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीत आपण कमी पडलो झालेल्या पराभवाचे शल्य बाजूला ठेऊन आणि झालेल्या चुका टाळून आगामी ग्रामपंचायत निवडणुका डोळ्यासमोर ठेवून कार्यकर्त्यांनी कामाला लागावे. यापुढील काळात कार्यकर्त्यांना अपेक्षित आहे तोच निर्णय आपण घेऊ असा निर्धार माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील यांनी केला.

रविवार दि. ८ मार्च रोजी सांगोला येथे पार पडलेल्या कार्यकर्त्यांच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी ज्येष्ठ नेते तानाजीकाका पाटील, शिवाजीनाना बनकर, मधुकर बनसोडे, जिल्हा दूध संघाचे संचालक विजय येलपले, चंद्रकांत चौगुले, तुकाराम जाधव, विजय पवार, माजी नगराध्यक्ष अनिल खडतरे, सुनील पाटील, ॲड यशराजे साळुंखे पाटील, डॉ. पियुष साळुंखे पाटील, समीर पाटील आदींसह आजी माजी पदाधिकारी लोकप्रतिनिधी आणि तालुक्यातील प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते. आगामी पंचायत समिती सभापती उपसभापती निवडीच्या पार्श्वभूमीवर या बैठकीकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागून राहिले होते. अचानक बैठकीचे नियोजन करूनही या बैठकीला सांगोला शहर आणि तालुक्यातील कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती.

पुढे बोलताना माजी आमदार दिपकआबा म्हणाले, गेली ६० हून अधिक वर्षे साळुंखे पाटील कुटुंब हे सांगोला तालुक्याच्या राजकारणात सक्रिय आहे. या काळात तालुक्यातील कार्यकर्त्यांनी नेहमीच सुख आणि दुःखात कार्यकर्त्यांनी आमच्यावर कुटुंबातील सदस्याप्रमाणे विश्वास ठेवला याच विश्वासावर यापुढील काळात कार्यकर्त्यांच्या जोरावर त्यांना अपेक्षित असणारा निर्णय घेण्यात येईल त्यासाठी वाट्टेल ती किंमत मोजायला आपण तयार आहोत. नुकत्याच पार पडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत जरी आमचे उमेदवार कमी पडले असले तरी, आजही तालुक्यातील सर्वसामान्य लोकांचा विश्वास हा साळुंखे पाटील परिवारावर आहे. याच विश्वासाच्या बळावर आगामी ग्रामपंचायत निवडणुकीत झालेला पराभव बाजूला ठेऊन आपल्याला पुन्हा एकदा नव्या जोमाने कामाला लागावे असे आवाहन यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांना माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील यांनी केले.
या बैठकीत मनोज उकळे, लहू कांबळे, अमर लोखंडे, विजय शिंदे, संतोष पाटील, विलास घुले, संभाजी हरिहर, अजित देवकते, सखुबाई वाघमारे, नारायण माळी, अजिंक्य शिंदे, दिपक कांबळे आदी नेते आणि कार्यकर्त्यांनी आपले मनोगत व्यक्त करताना आगामी काळात माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील यांनी सत्ताधारी राजकीय पक्षात प्रवेश करून दीर्घकालीन राजकारण डोळ्यासमोर ठेवून कठोर निर्णय घ्यावे अशी भूमिका मांडली

चौकट ;

आजपर्यंतच्या ३० ते ३५ वर्षांच्या राजकीय कारकीर्दीत नेहमीच पक्ष पार्टी जात धर्म न पाहता कुणाच्याही शिफारशीची वाट न पाहता लोकांची कामे करत गेलो. तरीही, कालच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत अपेक्षित यश मिळाले नाही याबाबत आत्मपरीक्षण करून आगामी काळात कामाची पद्धतीत बदल करू ;

दिपकआबा साळुंखे पाटील

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!