शाश्वत विकासासाठी सर्जनशील व सक्षम नगराध्यक्ष विश्वेश झपके
शिक्षण, संस्कार, सेवा, जनसंपर्क आणि पारदर्शक कार्यशैलीमुळे जनता आग्रही

शाश्वत विकासासाठी सर्जनशील व सक्षम नगराध्यक्ष विश्वेश झपके
शिक्षण, संस्कार, सेवा, जनसंपर्क आणि पारदर्शक कार्यशैलीमुळे जनता आग्रही
सांगोला (प्रतिनिधी): सांगोला नगरपालिकेच्या निवडणुकीत नगराध्यक्ष पदाचे शहरातील राजकीय वातावरण चांगलेच तापले असताना, सध्या सर्वाधिक चर्चेत असलेले नाव म्हणजे विश्वेश प्रबुद्धचंद्र झपके यांचे आहे. त्यांच्याकडील गुणांची समृद्धी, कार्याची समृद्धी, अनुभवांची समृद्धी, लोकसंपर्क ,स्वतः:चे स्वत्व आणि सामर्थ्य याद्वारे सांगोला शहर अधिक उन्नत, अधिक परिपूर्ण, अधिक निकोप ,अधिक समृद्ध करण्यासाठी स्वच्छ प्रतिमा व पारदर्शक कार्यशैली असलेले युवकांचे आयडॉल एक सर्जनशील व्यक्तित्व विश्वेश झपके
नगराध्यक्ष पदाचे प्रबळ दावेदार ठरत आहेत.
झपके घराण्याविषयी नागरिकांमध्ये विश्वास आणि कमालीचा अभिमान कुटुंब, शाळा, सामाजिक संस्थेचे व्यवहार, समाजकारण, राजकारण, साहित्य सेवा, व्यक्तीच्या प्रगल्भतेसाठीचे प्रयत्न हे संस्कृतीचे सोहळे झाले पाहिजेत या ध्यासाने भारावलेल्या सांगोल्यातील झपके घराण्यांनी ‘ कर्म सेवामय झाले की आयुष्य कृतार्थ होते ‘ या जाणिवेतून शैक्षणिक, सामाजिक, राजकीय साहित्यिक, सांस्कृतिक, व्यावसायीक अशा सर्वच क्षेत्रात आपल्याकडील निरपेक्ष प्रेम, निरपेक्ष सेवा आणि समाजाच्या अभ्युदयासाठी केलेल्या निरपेक्ष दातृत्त्वाच्या परिसस्पर्शांनी माणसाच्या मनात आदर आणि निर्माण केलेली आत्मियता समाजमनातही वृद्धिंगत झाली आहे.त्यामुळे राजकीय क्षेत्रातही माजी नगराध्यक्ष पणजोबा अण्णासाहेब झपके, आजी सांगोल्याच्या पहिल्या महिला नगराध्यक्षा कै.बाईसाहेब उर्फ शोभनतारा चंद्रशेखर झपके, वडील माजी नगराध्यक्ष प्रा.प्रबुद्धचंद्र झपके यांनी शहरातील सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या जाणून घेत त्यांच्या निवारणासाठी नेहमी पुढाकार घेतला आहे. त्यांनी आर्थिक अडचणीत असलेल्या अनेक गरजू नागरिकांना मदत केली असून, गरिब आणि वंचित घटकांसाठी विविध उपक्रम राबविले आहेत. विशेष म्हणजे, ते कोणत्याही प्रसिद्धीच्या अपेक्षेशिवाय समाजकार्यात सहभागी होते ही त्यांच्यासाठी मोठी जमेची बाजू मानली जाते.

झपके सरांचे अनमोल मार्गदर्शन
वडील मा.प्रा.प्रबुद्धचंद्र झपके सर हे जुने, जाणते आणि अभ्यासू नेते आहेत. ते सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे विद्यमान अध्यक्ष, आदर्श नागरी सहकारी बँकेचे संस्थापक चेअरमन, महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा सांगोला अध्यक्ष आणि लायन्स क्लबचे माजी प्रांतपाल आहेत. वीरशैव लिंगायत समाजाचे प्रांतीय अध्यक्ष म्हणूनही त्यांनी समाजसेवेचा ठोस ठसा उमठवला आहे. तसेच नगरसेवक व नगराध्यक्ष पदाची जबाबदारी पार पाडत असताना शहराच्या शैक्षणिक, आरोग्य आणि नागरी विकासाच्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली आहे. शाळा, रुग्णालये, जलसंधारण प्रकल्प आणि सार्वजनिक सोयीसुविधा यशस्वीरित्या राबवल्यामुळे त्यांच्या कार्याचा व मार्गदर्शनाचा होणार फायदा
विधायक व्यवस्थापनाद्वारे शैक्षणिक संस्था गुणवत्तेत अग्रेसर
विविध शैक्षणिक संस्थांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाचे ध्येय विद्यामंदिर परिवाराच्या माध्यमातून पूर्ण होत आहे. केवळ विद्यार्थ्यांची गुणात्मक वाढ ही शैक्षणिक संस्थेची बांधिलकी नसून विद्यार्थ्यांचा सृजनशील विकास आणि देशासाठी सक्षम नागरिक घडवण्याचा अविरत प्रयत्न हे या शिक्षण संस्थेचे वैशिष्ट्य ठरले आहे. आत्तापर्यंत विविध ठिकाणी असणाऱ्या विद्यामंदिर परिवार या शैक्षणिक संस्थेच्या माध्यमातून समाजात असंख अधिकारी विविध प्रशासकीय सेवेमध्ये कार्यरत आहेत. यामध्ये संस्था कार्यकारिणी सदस्य म्हणून विश्वेश झपके यांची नेहमीच सर्जनशील व दिशा देणारी भूमिका राहिली आहे. या दृष्टीने एका कुशल नेतृत्वास जर सांगोला नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदी विराजमान केले तर निश्चितपणे सांगोला नगरीचा सर्वांगीण विकास होईल यात शंका नाही. सांगोला नगरीच्या सर्वच समस्यांना आधुनिकतेच्या भूमिकेतून संपवण्याचा प्रयत्न होईल.
सेवाभाव हीच ताकद
विश्वेश झपके यांच्या कार्यशैलीत अहंकाराचा लवलेश नाही; उलट नागरिकांशी सौहार्दपूर्ण संबंध ठेवणे, त्यांच्या अडचणी समजून घेऊन त्यावर उपाय शोधणे, हे त्यांचे वैशिष्ट्य ठरणार आहे. त्यांची “सेवा हीच प्रतिष्ठा” अशी कार्यनीती असल्यामुळे स्वच्छ व सुंदर शहर, ज्येष्ठ नागरिक, महिला व लहान मुलांसाठी सुसज्ज बगीचा, क्रीडा संकुलातील सुविधा, अंतर्गत गटारी व मोकळा श्वास घेता येण्याजोगे पक्के रस्ते, आरोग्याच्या दृष्टीने लागणाऱ्या सर्व प्रकारच्या सुविधा, अतिक्रमण व धुळमुक्त शहर, महापुरुषांच्या पुतळ्या सभोवतालची स्वच्छता, दुचाकी, चारचाकी वाहनांची पार्किंग व्यवस्था उत्तम दर्जाची मिळावी, या सांगोला शहरातील नागरिकांच्या अपेक्षा पूर्णत्वास जातील असा ठाम विश्वास आहे..
निवडणुकीपूर्वी वाढता जनाधार
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात विविध गट, कार्यकर्ते आणि नागरिक विश्वेश झपके यांच्याशी सातत्याने संपर्क साधत आहेत. अनेक नागरिक, विविध संघटनानी त्यांच्या पाठिशी ठाम उभे राहण्याचा निर्णय घेतला आहे.यामध्ये कालच शहराच्या विकासासाठी स्वच्छ प्रतिमा, आधुनिक दृष्टी आणि तंत्रज्ञानाची जाण असलेल्या नेतृत्वाची गरज आहे. विश्वेश झपके हे प्रामाणिक, सुशिक्षित आणि विकासाच्या स्पष्ट आराखड्यासह काम करणारे उमेदवार आहेत. त्यांच्या हातात शहर सुरक्षित राहील असे सांगत नगराध्यक्ष पदाचे अपक्ष उमेदवार मोहसीन खतीब यांनी आपला पाठिंबा जाहीर केला आहे.
परिवर्तनाचा सर्वसामान्य मतदारांना विश्वास…
परिवर्तनाची हाक देणारा सांगोलकरांचा मतप्रवाह येणाऱ्या निवडणुकीमध्ये महत्त्वाचा ठरणार आहे. लोकांचा शिक्षित उमेदवाराकडे कल वाढला असून स्थानिक नागरिकांमध्ये अपक्ष उमेदवाराची चर्चा सध्या जोरात रंगत आहे. झपके कुटुंबांची शैक्षणिक, राजकीय व सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय सेवा हा विश्वेश झपके यांचा मोठा आधार बिंदू ठरत असल्याचे दिसून येत आहे. सांगोल्यात व्यक्ती आणि त्याचे आदर्श काम या घटकांना मतदार अधिक महत्त्व देऊ लागले आहेत त्यामुळे शाश्वत विकासाचा ध्यास घेतलेले विश्वेश झपके या निवडणुकीत नक्कीच विजयी होतील यात शंका नाही…



