काँग्रेसच्या सांगोला तालुकाध्यक्षपदी अजयसिंह इंगवले यांची निवड

काँग्रेसच्या सांगोला तालुकाध्यक्षपदी अजयसिंह इंगवले यांची निवड
सांगोला (प्रतिनिधी): काँग्रेसच्या सांगोला तालुकाध्यक्षपदी अजयसिंह रमेश इंगवले पाटील यांची निवड करण्यात आली. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी निवडीचे पत्र दिले. तालुक्यात संघटन आणि तालुकाध्यक्ष पदाचा अनुभव असलेल्या अजयसिंह इंगवले यांची तालुकाध्यक्षपदी निवड करण्यात आल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण झाला आहे. इंगवले यांनी तालुक्यात पक्षाचा विस्तार करण्याचे ध्येय ठेवले असून, काँग्रेसची ध्येय धोरणे जनमानसात पोहोचवून तालुक्यात संघटन मजबूत करण्याचा मानस व्यक्त केला आहे.
काँग्रेस पक्षाच्या सांगोला तालुकाध्यक्षपदासाठी मोठी रस्सीखेच सुरू असल्याने मागील काही महिन्यांपासून निवड रखडली होती. अखेर काँग्रेस पक्षाच्या तालुकाध्यक्षपदी अजयसिंह इंगवले यांची वर्णी लागली आहे. जिल्हाध्यक्ष काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी निवडीचे पत्र देऊन इंगवले यांचा सत्कार केला. पक्ष संघटन अधिक मजबूत करण्यासाठी युवा अभ्यासु व नेते अजयसिंह इंगवले यांची तालुकाध्यक्षपदी निवड केली आहे.
अजयसिंह इंगवले-पाटील हे गेल्या पंधरा वर्षापासून काँग्रेसमध्ये सक्रिय असून त्यांनी काँग्रेस पक्षाच्या विविध विभागांवरती यापूर्वीकाम केले आहे. यांच्या निवडीबद्दल प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, माणिकराव ठाकरे, खासदार प्रणिती शिंदे, सोलापूर ग्रामीण जिल्हाध्यक्ष सातलिंग शटकार यांचे आभार मानले आहेत. ग्रामीण भागातील सर्व तळागाळातील काँग्रेसवर प्रेम करणाऱ्या पदाधिकारी कार्यकर्ते यांना एकसंघ काँग्रेसमध्ये आणणार व आगामी सर्व निवडणुका काँग्रेस पक्षाच्या चिन्हावरती मोठ्या ताकतीने लढवणार असल्याचे काँग्रेसचे नूतन तालुकाध्यक्ष अजयसिंह इंगवले पाटील यांनी सांगितले.