कृषी सल्लापीकपेरणी

जिल्ह्यात सव्वा दोन लाख हेक्टरवर उडीद, सोयाबीनची  पेरणी..!

सव्वाचार लाख हेक्टरवर खरिपाच्या पेरण्या, उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता

सांगोला (दिलीप घुले): सर्वाधिक साखर कारखान्यांचा ऊसाचा जिल्हा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सोलापूर  जिल्ह्यात खरीपाच्या पेरणीने उच्चांक गाठला असून उसापाठोपाठ उडीद आणि सोयाबीनच्या पेरणीने उच्चांक गाठला आहे. पोषक पाऊस हवामानामुळे दोन लाख ६७ हजार हेक्टर क्षेत्रात उडीद व सोयाबीनचा पेरा झाला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ४ लाख २७ हजार ९९७ हेक्टर (१२७ टक्के) क्षेत्रावर खरीप हंगामातील पेरण्या झाल्या आहेत. यात सोयाबीनचा पेरा १ लाख २८ हजार ४८२ हेक्टर तर उडिदाचा पेरा १ लाख ०५ हजार ८९३ हेक्टर क्षेत्रात गेला आहे. सोयाबीन आणि उडीद या दोन्ही पिकांची मिळून दोन लाख ३४ हजार ३७५ हेक्टर क्षेत्रात पेरणी  झाली आहे.
        सोलापूर जिल्ह्यात कृषी विभागाने यंदा खरीपासाठी ३ लाख ३७ हजार ९६८ हेक्टर क्षेत्र गृहित धरुन हंगामाचे नियोजन केले होते. मात्र यंदा सोलापूर जिल्ह्यात जवळपास ४ लाख २७ हजार ९९६ हेक्टर क्षेत्रावर खरिपाच्या पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. तर यंदा सर्वाधिक १ लाख २८ हजार ४८२ हेक्टरवर सोयाबीनची पेरणी झालेली आहे. यंदा शेतकऱ्यांच्या हातात खरीप पीक लागणार असल्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. जिल्ह्याच्या ग्रामीण भागात झालेल्या पावसामुळे आणि त्यामुळे निर्माण झालेल्या पोषक वातावरणामुळे खरीपाच्या पेरण्यानी उच्चांक गाठला आहे.
       यंदाच्या हंगामात गळीत धान्यामध्ये सोयाबीन पिकाला शेतकऱ्यांनी सर्वाधिक पसंती दिल्याने जिल्ह्यात  सोयाबीनची सर्वाधिक पेरणी झाली आहे. यंदा पेरणी  विक्रमी झाली असल्याने यंदा खरिपाच्या उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता कृषी विभागाच्या वतीने वर्तविण्यात आली आहे. जिल्ह्यात सोयाबीनचे सरासरी लागवड क्षेत्र ८१ हजार २७० हेक्टर असताना प्रत्यक्षात १ लाख २८ हजार ४८२ हेक्टर (१५८ टक्के) क्षेत्रात सोयाबीनचा पेरा झाला आहे. मका ८१ हजार ७७९ हेक्टर (१७१ टक्के), तूर ७६ हजार ६२७ हेक्टर (८९ टक्के), मूग ६ हजार ३०३ हेक्टर (४३ टक्के), उडीद १ लाख ०५ हजार ८९३ हेक्टर (१८२ टक्के), बाजरी २२ हजार ५१० हेक्टर (६६ टक्के), सूर्यफूल ३ हजार ०९८ हेक्टर (३८ टक्के), भुईमुग ३ हजार ०९६ हेक्टर (५९ टक्के), खरीप ज्वारी २० हेक्टर, इतर कडधान्य १८ हेक्टर, तीळ ८ हेक्टर, कारळ ५ हेक्टर, कापूस १५९ हेक्टर, नवीन ऊस लागवड २३ हजार ६९७ हेक्टर क्षेत्रावर झाली आहे. जिल्ह्यात ३ लाख ३७ हजार ९६८ हेक्टर क्षेत्र खरिपाचे असून आतापर्यंत ४ लाख २७ हजार ९९६ हेक्टर (१२७ टक्के) क्षेत्रावर खरिपाच्या पेरण्या झाल्या आहेत. 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!