सामाजिक

शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या पश्‍चिम महाराष्ट्र सहसंपर्कप्रमुखपदी सतीश सावंत यांची निवड

शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या पश्‍चिम महाराष्ट्र सहसंपर्कप्रमुखपदी सतीश सावंत यांची निवड

सांगोला (प्रतिनिधी): शिवसेना वैद्यकीय मदत पक्षाच्या पश्‍चिम महाराष्ट्राच्या सहसंपर्क प्रमुखपदी सतीश सावंत यांची निवड करण्यात आली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे ओएसडी व शिवसेना वैद्यकीय मदत पक्षाचे संस्थापक अध्यक्ष मंगेश चिवटे यांनी त्यांना निवडीचे पत्र दिले.

शिवसेना वैद्यकीय मदत पक्षाच्या पंढरपूर विभागाचे प्रमुख असताना सतीश सावंत यांनी रुग्णांना अविरतपणे मदत केली. महात्मा फुले जन आरोग्य योजनेतून अनेक गरजू रुग्णांना भरीव मदत केली. अनेक रुग्णांच्या शस्त्रक्रिया मोफत केल्या. अनेक हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांना भेटून बिलामध्ये सवलती देण्याचा प्रयत्न केला. मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून अनेक रुग्ण आर्थिक मदत करून अनेक रुग्णांचे प्राण वाचवले याची दखल घेऊन राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वखाली शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे संस्थापक अध्यक्ष मंगेश चिवटे यांनी हिंदुहृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या पश्‍चिम महाराष्ट्र सहसंपर्कप्रमुखपदी सतीश सावंत यांची निवड केली आहे.
शिवसेना वैद्यकीय मदत पक्षाचे पश्‍चिम महाराष्ट्र सहसंपर्कप्रमुख म्हणून राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे, खासदार श्रीकांत शिंदे, ओएसडी मंगेश चिवटे यांनी माझ्यावर जो विश्‍वास टाकून मला रुग्णांची सेवा करण्याची संधी दिली. टाकलेल्या विश्‍वासास मी कायमच पात्र राहणार आहे. शिवसेना वैद्यकीय मदत पक्षाच्या माध्यमातून रुग्णांना 24 तास मदत करून त्यांचे प्राण वाचवण्यासाठी कटिबद्ध आहे. सांगोला तहसील कार्यालयासमोर शिवसेना वैद्यकीय मदत पक्षाच्या संपर्क कार्यालयात रुग्णांच्या मदतीसाठी 24 तास उपलब्ध राहुन रूग्णंना मदत करणार आहे. – सतीश सावंत, सहसंपर्कप्रमुख पश्‍चिम महाराष्ट्र शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!