सामाजिक

श्रींचे आगमन:सोलापूर शहरात ९७४ तर ग्रामीणमध्ये ३२४६ सार्वजनिक मंडळांत प्रतिष्ठापना; २५८ गावांत ‘एक गाव एक गणपती’

डीजे' लावल्यास होणार गुन्हे दाखल; जिल्ह्यातील १० ते १२ प्रमुख मंडळांचे १ हजार झाडे लावण्याचे नियोजन - अतुल कुलकर्णी, पोलिस अधीक्षक

‘श्रीं’चे आगमन:सोलापूर शहरात ९७४ तर ग्रामीणमध्ये ३२४६ सार्वजनिक मंडळांत प्रतिष्ठापना; २५८ गावांत ‘एक गाव एक गणपती’

‘डीजे’ लावल्यास होणार गुन्हे दाखल; जिल्ह्यातील १० ते १२ प्रमुख मंडळांचे १ हजार झाडे लावण्याचे नियोजन – अतुल कुलकर्णी, पोलिस अधीक्षक

सांगोला (प्रतिनिधी): ‘गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया’चा गगनभेदी जयघोष, ताशा-संबळ या पारंपरिक वाद्यांचा गजर आणि लेझीम तालावर थिरकणारी पावले अशा अत्यंत उत्साही वातावरणात सोमवारी सोलापूर शहर व परिसरात लाडक्या बाप्पाचे वाजतगाजत स्वागत करण्यात आले. यंदाचा गणेशोत्सव तब्बल १२ दिवसांचा असल्याने भाविकांमध्ये आनंदाचे उधाण आले आहे. सोलापूर शहरात पोलीस प्रशासनाची परवानगी घेतलेल्या ९७४ सार्वजनिक मंडळांसह हजारो घरांमध्ये विघ्नहर्त्याची विधिवत प्रतिष्ठापना झाली. तर दुसरीकडे, सोलापूर ग्रामीण भागातही गणेशोत्सवाचा अभूतपूर्व उत्साह असून ३ हजार २४६ सार्वजनिक मंडळांत बाप्पा विराजमान झाले आहेत. गणेशोत्सव मंडळांनी स्वागताची जय्यत तयारी केली आहे. जिल्ह्यातील ११ तालुक्यांमधील २५८ गावांमध्ये ‘एक गाव एक गणपती’ची संकल्पना साकारण्यात आली आहे.

लाडक्या गणरायाच्या स्वागताला लहान थोरांसह सर्वच जण आतुर झाले आहेत. सार्वजनिक गणेशोत्सवासह घरगुती गणपतीच्या आगमणाची तयारी करण्यात आली. जिल्ह्यात ३२४६ गणेश मंडळांकडून प्रतिष्ठापना करण्यात आली. तर जिल्ह्यात २५८ गावांमध्ये एक गाव एक गणपती बसवण्यात येणार आहे. गणरायाचे जल्लोषात स्वागत करण्याची तयारी गणेश मंडळांनी केली आहे. पारंपरिक वाद्याच्या गजरात मंडळांकडून स्वागत करण्यात येणार आहे.
गणेश मूर्ती खरेदीसाठी बाजारात आलेल्या भक्तांकडून पर्यावरणपूरक गणेशमूर्ती खरेदीकडे कल दिसून आला. मातीच्या गणेशमूर्तींना भक्तांनी पसंदी दिली. विविध आकाराच्या आणि वेशभूषेतील गणेश मूर्ती बाजारात उपलब्ध होत्या. बच्चे कंपनी गणेश मूर्तींची निवड करण्यात अग्रेसर असल्याचे दिसले. सार्वजनिक मंडळांचे उत्सव मंडप फुलांनी सजविण्यात आले असून, विद्युतरोषणाईही करण्यात आली आहे. मंडप उजळून निघाले आहेत. गणरायाच्या आगमनामुळे सोलापूर ग्रामीण भागात सर्वत्र आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. बाप्पाच्या स्वागतासाठी गणेशभक्त आणि मंडळांचे कार्यकर्ते सज्ज झाले आहेत. सकाळी वाजतगाजत मिरवणुकांना प्रारंभ झाला.

पोलिस ठाणेनिहाय ‘एक-गाव एक गणपती’

सोलापूर १५
मोहोळ ४६
मंद्रूप १०
कुर्डूवाडी ६
करमाळा १६
टेंभुर्णी ५
मंगळवेढा १५
करकंब १०
सांगोला १५
नातेपुते १
अकलूज १०
पंढरपूर ९
वेळापूर १
कामती ४
अक्कलकोट ४५
वळसंग ११
वैराग ७
बार्शी १४
पांगरी ७
माढा ११

असा आहे पोलिस बंदोबस्त

पोलिस अधिकारी – १२८
पोलिस अंमलदार – २००१
एसआरपीएफ कंपनी – ०१
होमगार्ड – ११००
आरसीपी टीम – ०३
क्यूआरटी – ०४
स्ट्राईकिंग – ०९

 

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी पर्यावरण संवर्धन आणि समाजोपयोगी उपक्रमांवर भर द्यावा. बाप्पाच्या आगमनानिमित्त कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सोलापूर ग्रामीण पोलिस प्रशासन पूर्णपणे सज्ज आहे. शांतता, सुरक्षितता, शिस्तीबरोबरच पोलिसांनी दिलेल्या सूचनांचे पालन करावे, डीजे लावल्यास कडक कायदेशीर कारवाई केली जाईल. चांगले काम करणाऱ्या मंडळांचा सन्मान केला जाईल. जिल्ह्यात यंदा ग्रामीण भागात साधारणपणे ३,२४६ हून अधिक मंडळांकडून श्रींची प्रतिष्ठापना होईल. ज्यामध्ये २५८ गावांत “एक गाव एक गणपती’ संकल्पना असेल. यंदाच्या वर्षी डीजेमुक्त उत्सव साजरा करण्याचे नियोजन आहे. पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला सकारात्मक प्रतिसाद मिळत असून, जिल्ह्यातील सुमारे १० ते १२ प्रमुख मंडळांनी १ हजार झाडे लावण्याचे नियोजन सुरू केले. – अतुल कुलकर्णी, पोलिस अधीक्षक.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!