सामाजिक

शिक्षणमहर्षी, माजी राज्यपाल डी.वाय. पाटील यांचं कोल्हापूरमध्ये निधन, वयाच्या 90 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

शिक्षणमहर्षी, माजी राज्यपाल डी.वाय. पाटील यांचं कोल्हापूरमध्ये निधन, वयाच्या 90 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

कोल्हापूर (प्रतिनिधी):  जेष्ठ शिक्षणतज्ज्ञ, शिक्षण, आरोग्य आणि समाजकारण अशा विविध क्षेत्रांत आपल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटवणारे ऋषीप्रत व्यक्तिमत्त्व, त्रिपुरा, बिहार आणि पश्चिम बंगालचे माजी राज्यपाल पद्मश्री डॉ. ज्ञानदेव यशवंत पाटील अर्थात डी. वाय.पाटील (वय 91) यांचे कोल्हापुरात निधन झाले. त्यांच्या निधनामुळे केवळ महाराष्ट्रच नव्हे, तर देशातील शैक्षणिक आणि राजकीय वर्तुळात मोठी शोककळा पसरली आहे.

एका साध्या शेतकरी कुटुंबातून आपला प्रवास सुरू करून राज्यपाल पदापर्यंत पोहोचलेल्या डॉ. डी. वाय. पाटील यांच्या जाण्याने एका पर्वाचा अंत झाला आहे. महाराष्ट्राच्या शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रात त्यांचं मोठे योगदान होते. ते डी वाय पाटील समूहाचे संस्थापक होते. हजारो विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठी त्यांनी अनेक शाळा, महाविद्यालये आणि विद्यापीठांची स्थापना केली. त्यांच्या या उल्लेखनीय कार्यासाठी त्यांना भारत सरकारने ‘पद्मश्री’ पुरस्काराने सन्मानित केले.

22 ऑक्टोबर 1935 रोजी कोल्हापूर जिल्ह्यातील अंबप या छोट्याशा गावात डॉ. डी. वाय. पाटील यांचा जन्म झाला होता. ग्रामीण भागातील गुणवंत विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाचे शिक्षण मिळावे, हा ध्यास त्यांनी आयुष्यभर जपला. 1983 मध्ये नवी मुंबईत ‘रामराव आदिक इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी’ची स्थापना केली. आज त्यांच्या मार्गदर्शनाखाली कोल्हापूर, मुंबई आणि पुणे येथे 3 हून अधिक डीम्ड विद्यापीठ आणि 180 पेक्षा जास्त शिक्षण संस्था कार्यरत आहेत, जिथे लाखो विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. डॉ. डी. वाय पाटील यांची सार्वजनिक जीवनातील सुरुवात भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमधून झाली. 1957 ते 1962 या काळात त्यांनी कोल्हापूरचे महापौर म्हणून काम पाहिले होते. त्यानंतर 1967 आणि 1972 मध्ये ते पन्हाळा विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले होते. त्यांच्या प्रदीर्घ अनुभवाचा सन्मान म्हणून त्यांची त्रिपुरा आणि बिहारच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली, तसेच त्यांनी पश्चिम बंगालचा अतिरिक्त कार्यभारही समर्थपणे सांभाळला. 2018 मध्ये त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता.

शिक्षण आणि समाजसेवेतील अतुलनीय योगदानाबद्दल भारत सरकारने 1991 मध्ये त्यांना ‘पद्मश्री’ या पुरस्काराने सन्मानित केले होते. याशिवाय त्यांना विविध आंतरराष्ट्रीय विद्यापीठांकडून मानद डॉक्टरेट आणि शिवाजी विद्यापीठाकडून ‘डी.लिट’ पदवी प्रदान करण्यात आली होती. त्यांच्या पश्चात मुलगा डॉ. संजय डी. वाय. पाटील, माजी गृहराज्यमंत्री सतेज उर्फ बंटी पाटील, विजय पाटील, डॉ. अजिंक्य पाटील, मुलगी डॉ. नंदिता पालशेतकर आणि नातू ऋतुराज पाटील यांच्यासह मोठा आप्तपरिवार आहे.

भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे सदस्य असलेले डी.वाय. पाटील १९५७ ते १९६२ दरम्यान कोल्हापूर शहराचे महापौर होते. १९६७ व १९७२ साली ते पन्हाळा विधानसभा मतदारसंघामधून विधानसभेवर निवडून आले होते. सर्वसामान्य कार्यकर्त्यांपासून सुरु केलेली राजकीय कारकीर्द पुढे अनेक मोठमोठ्या पदांपर्यंत घेऊन गेली. कार्यकर्ता, महापौर ते अगदी राज्याचे राज्यपाल, असा विस्मयचकित करणारा प्रवास डॉ. डी. वाय पाटील यांचा आहे. भाजपप्रणित एनडीए सरकार केंद्रात सत्तेत आल्यानंतर अनेक राज्यातील राज्यपालांची उचलबांगडी करण्यात आली. त्यांच्या ठिकाणी नवे राज्यपाल नियुक्त करण्यात आले. मात्र, राजकारणाच्या पलिकडचे व्यक्तिमत्त्व असलेल्या डॉ. डी. वाय. पाटील यांचे राज्यपालपद कायम ठेवण्यात आले होते. तेव्हा डॉ. डी. वाय. पाटील हे बिहारचे राज्यपाल होते.

देश-विदेशात शिक्षण आणि वैद्यकीय संस्था, तसेच नवी मुंबईतील खेळाचे भव्य मैदान असो, ज्या क्षेत्रात पाऊल ठेवले. तिथे ठोस कामगिरी करत आपल्या नावाचं ब्रँड तयार केले. डी.वाय. पाटील ह्यांच्या नावाच्या अनेक संस्था महाराष्ट्रात आहेत. त्यामध्ये पद्मश्री डी.वाय. पाटील विद्यापीठ, सी.बी.डी. बेलापूर, नवी मुंबई, डॉ. डी.वाय. पाटील विद्यापीठ, पुणे, डॉ. डी.वाय. पाटील विद्यापीठ, कोल्हापूर, डॉ. डी.वाय. पाटील विद्यापीठ, पुणे, आंबी या विद्यापीठांचा समावेश आहे. शेकडो शिक्षण संस्थांचेव्यापक नेटवर्क असलेला व गुणवत्तेमुळेराज्यातच नव्हे, तर देशभरात ओळखला जाणारा डी. वाय. पाटील ग्रुप शैक्षणिक वटवृक्ष बनला आहे. ‘जे कराल तेमनापासून करा. जिथे जाल तिथे सर्वोच्च बना,’ असा संदेश पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील नेहमी देत असत.

डॉ. डी. वाय. पाटील यांचा परिवार शिक्षण, आरोग्य, उद्योग आणि सार्वजनिक जीवनात सक्रिय आहे. त्यांच्या कुटुंबात अनेक सदस्य विविध शैक्षणिक संस्थांच्या व्यवस्थापनाशी संबंधित आहेत. त्यांचे पुत्र डॉ. संजय डी.वाय.पाटील, सतेज उर्फ बंटी डी.वाय.पाटील, विजय डी.पाटील, डॉ.अजिंक्य डी.वाय.पाटील यांच्यासह कन्या डॉ. नंदिता पालशेतकर आणि इतर सदस्य शिक्षण व आरोग्य क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांचे नातू ऋतुराज पाटील हेही सार्वजनिक जीवनात सक्रिय आहेत.

२२ ऑक्टोबर १९३५ रोजी कोल्हापूर जिल्ह्यातील अंबाप या एका छोट्याशा शेतीप्रधान गावात त्यांचा जन्म झाला. एका साध्या बहुजन शेतकरी कुटुंबातून पुढे येत त्यांनी स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. त्यांच्या घरात राजकीय आणि सामाजिक वारसा आहे. त्यांचे पुत्र सतेज पाटील (माजी गृहराज्यमंत्री, महाराष्ट्र) आणि डॉ. संजय डी. पाटील, तसेच नातू ऋतुराज पाटील हे देखील राजकारण आणि समाजकारणात सक्रिय आहेत. (डी. वाय. पाटील ग्रुप) डी. वाय. पाटील यांनी वयाच्या पंचेचाळीसाव्या वर्षी सक्रिय राजकारणातून काहीसा संन्यास घेत शिक्षणाचा वटवृक्ष उभारण्यास सुरुवात केली. त्यांनी १९८३ मध्ये नवी मुंबईत ‘रामराव आदिक इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी’ (RAIT) या पहिल्या अभियांत्रिकी महाविद्यालयाची स्थापना केली. आज त्यांच्या डी. वाय. पाटील ग्रुप अंतर्गत कोल्हापूर, मुंबई, पुणे यांसारख्या शहरांमध्ये ३ हून अधिक डीम्ड युनिव्हर्सिटीज, ६ खाजगी विद्यापीठे आणि १८० पेक्षा जास्त शिक्षण संस्था कार्यरत आहेत. अभियांत्रिकी, वैद्यकीय (मेडिकल), फार्मसी, मॅनेजमेंट, आर्किटेक्चर आणि कृषी यांसारख्या विविध क्षेत्रांत त्यांचे उत्तम जाळे पसरलेले आहे.

१९५७ ते १९६२ या काळात ते कोल्हापूरचे महापौर होते. त्यानंतर १९६७ आणि १९७२ मध्ये ते पन्हाळा मतदारसंघातून विधानसभेवर आमदार म्हणून निवडून आले. त्यांच्या प्रदीर्घ अनुभवामुळे त्यांची भारताच्या विविध राज्यांचे राज्यपाल म्हणून नियुक्ती झाली. शिक्षणाच्या माध्यमातून समाजपरिवर्तन घडवून आणण्याचा ध्यास त्यांनी आयुष्यभर जपला. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनाही जागतिक दर्जाचे शिक्षण मिळावे, हा त्यांचा कायम प्रयत्न होता. डॉ. डी. वाय. पाटील यांनी सार्वजनिक जीवनाची सुरुवात स्थानिक स्वराज्य संस्थांमधून केली. 1957 मध्ये ते काँग्रेसच्या तिकिटावर कोल्हापूर नगरपालिकेवर निवडून आले. त्यानंतर 1967 आणि 1972 मध्ये पन्हाळा मतदारसंघातून  महाराष्ट्र  विधानसभेवर निवडून गेले. पुढे त्यांची राज्यपालपदी नियुक्ती झाली. त्यांनी त्रिपुराचे राज्यपाल, बिहारचे राज्यपाल, तसेच काही काळ पश्चिम बंगालच्या राज्यपालपदाचा अतिरिक्त कार्यभारही सांभाळला. राज्यपाल म्हणून त्यांनी शिक्षण, प्रशासन आणि सामाजिक उपक्रमांना प्रोत्साहन देणारे निर्णय घेतले.

शिक्षण क्षेत्रातील अमूल्य योगदानडॉ. डी. वाय. पाटील यांचे नाव घेतले की सर्वप्रथम आठवते ते म्हणजे त्यांनी उभारलेले विशाल शैक्षणिक साम्राज्य.डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ, पुणे, डी. वाय. पाटील डीम्ड टू बी युनिव्हर्सिटी, नवी मुंबई, डी. वाय. पाटील एज्युकेशन सोसायटी, कोल्हापूरवैद्यकीय, दंतवैद्यकीय, अभियांत्रिकी, व्यवस्थापन, नर्सिंग, फिजिओथेरपी, लॉ आणि इतर अनेक महाविद्यालयांचा समावेश आहे. देश-विदेशातील हजारो विद्यार्थी आज त्यांच्या संस्थांमध्ये शिक्षण घेत आहेत. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची संधी उपलब्ध करून देण्यात त्यांचे योगदान विशेष मानले जाते.क्रीडा क्षेत्रालाही दिले नवे व्यासपीठनवी मुंबईतील डॉ. डी. वाय. पाटील स्टेडियम हे त्यांच्या दूरदृष्टीचे प्रतीक मानले जाते. या स्टेडियममध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामने, आयपीएल, फुटबॉल स्पर्धा आणि विविध राष्ट्रीय- आंतरराष्ट्रीय कार्यक्रमांचे आयोजन झाले आहे.

नवी मुंबईतील नेरुळ येथे असलेले जागतिक दर्जाचे डी. वाय. पाटील स्टेडियम हे त्यांच्याच क्रीडा अकादमीच्या मालकीचे आहे. येथे अनेक आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामने आणि आयपीएल (IPL) चे सामने खेळवले जातात. त्यांनी गरिबांसाठी अनेक चॅरिटेबल हॉस्पिटल्स आणि वैद्यकीय संशोधन केंद्रे सुरू करून आरोग्य क्षेत्रात मोठे योगदान दिले आहे. शिक्षण आणि समाजसेवेतील त्यांच्या अतुलनीय योगदानाबद्दल भारत सरकारने १९९१ मध्ये त्यांना पद्मश्री या सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित केले. त्यांना अमेरिकेच्या ‘वर्ल्ड युनिव्हर्सिटी राउंडटेबल’ (१९८५), ब्रिटनच्या ‘नॉटिंगहॅम ट्रेंट युनिव्हर्सिटी’ (१९९६) आणि शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर (२०१५) कडून मानद डॉक्टरेट आणि ‘डी.लिट’ पदवी प्रदान करण्यात आली आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!