शिरभावी पाणीपुरवठा योजनेची ५८ गावांकडे १ कोटी ६२ लाखांची थकबाकी
आठ वर्षांनंतरही मंगळवेढा–पंढरपूर पंचायत समितीकडील बिले प्रलंबित

शिरभावी पाणीपुरवठा योजनेची ५८ गावांकडे १ कोटी ६२ लाखांची थकबाकी
आठ वर्षांनंतरही मंगळवेढा–पंढरपूर पंचायत समितीकडील बिले प्रलंबित
सांगोला (प्रतिनिधी): सांगोला तालुक्याची जीवनदायिनी ठरलेली महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या उपविभागांतर्गत कार्यरत शिरभावी व ८१ गावांच्या प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजनेवर थकबाकीचे संकट गडद झाले आहे. एप्रिल २०२६ अखेर ५८ गावांकडे तब्बल १ कोटी ६२ लाख ६७ हजार १६१ रुपये इतकी थकबाकी जमा झाली असून योजनेच्या आर्थिक व्यवस्थापनावर ताण निर्माण झाला आहे. सावे, चिंचोली, महूद बु., खवासपूर, लक्ष्मीनगर, वाढेगाव, मेथवडे, मांजरी, कोळा, वाकी नरळे वस्ती, जुजारपूर आदी गावे थकबाकीत आघाडीवर असल्याचे चित्र आहे.

शिरभावीसह ८१ गावांना वर्षभर अखंडितपणे पाणीपुरवठा करणारी योजना म्हणून या योजनेचा राज्यात नावलौकिक आहे. पण वेळोवेळी थकबाकीची रक्कम वाढत असल्याने ही योजना आर्थिक संकटात सापडली आहे. अनेक गावांची थकबाकी मोठया प्रमाणावर आहे. दुष्काळी असलेल्या सोलापूर जिल्ह्यात ऐन उन्हाळ्यात देखील वेळेवर पाणीपुरवठा होणारा तालुका म्हणून सांगोला तालुक्याची ओळख आहे. सांगोला तालुक्याची जीवनदायिनी ठरलेली शिरभावी पाणीपुरवठा योजना थकबाकीमुळे आर्थिक संकटात सापडली आहे. सोलापूर जिल्ह्यात ऐन उन्हाळ्यातही वेळेवर पाणीपुरवठा होणारा तालुका अशी सांगोल्याची ओळख या योजनेमुळेच निर्माण झाली. मात्र वाढत्या थकबाकीमुळे योजनेच्या देखभाल, दुरुस्ती व नियमित खर्च भागविणे कठीण होत चालले आहे. अनेक गावांची थकबाकी लाखोंच्या घरात पोहोचल्याने प्रशासन चिंतेत आहे.

शिरभावी पाणीपुरवठा योजनेतील थकबाकी असलेली गावे पुढीलप्रमाणे, कंसात थकबाकीची रक्कम , शिरभावी (२,५८,८१९), संगेवाडी (९६,९०८), मेथवडे (१२,५६,९९८), मेथवडे माळी वस्ती (२,५२,३२६), देवळे (१,२२,२४५), मांजरी (९,६७,५५८), बामणी (२,७२,४३७), सावे (३,९४,२३३), धायटी (१,०४,०९०), चिंचोली (३,२९,७४९), हलदहिवडी (७४,०४७), वाकी शिवणे (२,८६,७३४), शिवणे (२,३४,७१८), खिलारवाडी (६१,७१५), महूद बु. (२८,००,५९८), महिम (१,७७,९४४), गायगव्हाण (१९,११५), देवकतेवाडी (२,७७,४८२), खवासपूर (४,४२,५३७), एखतपुर (९२,९३५), लोटेवाडी (२,३७,०८९), कटफळ (४,४०२), अचकदाणी (२,९२,०५४), लक्ष्मीनगर (५,३०,३२३), सोनलवाडी (१७३), बागलवाडी (६०), वाकी नरळे वस्ती (४,६५,२२९), वाकी घेरडी (६५३), वाणीचिंचाळे (७०२), आलेगाव (२,२२,०३०), घेरडी (८७,३०३), मेडशिंगी (२०), वाढेगाव (१३,७३,२५९), लोणविरे (२७,९६९), हणमंतगाव (१,१०५), कडलास (३१,५५८), आगलावेवाडी (२८,३२५), बुरुंगेवाडी (६,२८०), जवळा (१,३७,२९२), राजूरी (९८), कारंडेवाडी (२,८३,६३४), तरंगेवाडी (७२,२७७), भोपसेवाडी (२,७४,१४८), नाझरे (७५११३), वझरे (३,८१,२५५), अनकढाळ (४,३६०), अजनाळे (१३५), य. मंगेवाडी (९०,७००), गोडसेवाडी (१२,६२७), कमलापूर (३,५७८), अकोला वा. (२,६२,६०८), कोळा (६,९९,९८६), बुद्धेहाळ (१९,३५६), सोमेवाडी (९५,८६०), राजापूर (८९,९१९), हबीसेवाडी (१,३७,६९८), डिकसळ (४,०६३), हंगीरगे (१,४३,११२), जुजारपूर (२,३७,२९१), हायवे कोळा (२०,८९८) अशी एकूण ५९ गावांकडे तब्बल १ कोटी ४८ लाख ७६ हजार १९५ रुपयांची थकबाकी आहे.

तसेच शेतकरी सूत गिरणीकडे ७ लाख ७८ हजार २३७ रुपये, महिला सूत गिरणीकडे २७ हजार ०१०, मंगळवेढा पंचायत समितीकडे २ लाख ८९ हजार २२६, पंढरपूर पंचायत समिती ४३ हजार २००, सांगोला तहसील कार्यालयाकडे २ लाख ५३ हजार २९४ अशी एकूण शिरभावी पाणीपुरवठा योजनेची थकबाकी १३ लाख ९० हजार ९६६ रुपये इतकी आहे. तर मेटकरवाडी, चिकमहुद, इटकी, मानेगाव, डोंगरगाव, सोनंद, उदनवाडी, बलवडी, चिणके, निजामपूर, वाटंबरे, वासूद, केदारवाडी, पाचेगाव बुद्रुक, गौडवाडी, चोपडी, बलवडी, नराळे, पारे, जुनोनी, हटकर मंगेवाडी, हातीद, पाचेगाव खुर्द या २५ गावांनी थकबाकी भरली आहे.

वाढत्या थकबाकीचा प्रश्न निकाली काढण्यासाठी प्रशासनाने संबंधित गावांना व संस्थांना तातडीने देयके भरण्याचे आवाहन केले आहे. अन्यथा भविष्यातील पाणीपुरवठ्याच्या नियोजनावर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. सांगोला तालुक्याच्या पाणी सुरक्षेसाठी शिरभावी योजनेचे आर्थिक सुदृढीकरण अत्यावश्यक असल्याचे मत नागरिकांतून व्यक्त होत आहे.
२०१८ च्या दुष्काळात नागरिकांना पिण्याचा पाण्याचा पुरवठा करण्यासाठी शिरभावी योजनेमधून मंगळवेढा व पंढरपूर पंचायत समितीच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाला टँकर भरण्यासाठी पाणी उपलब्ध करून दिले होते. परंतु सहा वर्षांनंतरही मंगळवेढा व पंढरपूर पंचायत समितीने शिरभावी योजनेची बिले थकवली आहेत. मंगळवेढा पंचायत समितीकडे २ लाख ८९ हजार २२६ रुपये, पंढरपूर पंचायत समितीकडे ४३ हजार २०० रुपये, सांगोला तहसिल कार्यालयाकडे २ लाख ४५ हजार १८५ इतकी थकबाकी आहे.
शिरभावी पाणीपुरवठा योजनेच्या नूतनीकरणाची कामे २७ जुलै २०२४ पासून सुरू आहेत. सदर योजनेच्या नूतनीकरणाचे काम सुरू असून यासाठी ३०० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे. ६०० किमीचे पाईपलाइनचे काम ९० टक्के पूर्णत्वास आले आहे. सदर योजनेच्या माध्यमातून पूर्ण क्षमतेने पाणीपुरवठा करण्यासाठी चाचणी सुरू आहे. शिरभावी पाणीपुरवठा योजनेची कामे अंतिम टप्प्यात आहे.



