कृषी सल्ला

आमदार डॉ.बाबासाहेब देशमुख यांच्या विशेष प्रयत्नांतून सांगोला तालुक्यातील ५ ग्रामपंचायतींना इमारत निधी मंजूर

आमदार डॉ.बाबासाहेब देशमुख यांच्या विशेष प्रयत्नांतून
सांगोला तालुक्यातील ५ ग्रामपंचायतींना इमारत निधी मंजूर

सांगोला (प्रतिनिधी): ग्रामपंचायत प्रशासनाचा कार्यभार व्यवस्थित पार पाडण्यासाठी ग्रामपंचायतींना नवीन इमारतीची आवश्यकता होती. सांगोला विधानसभा मतदारसंघातील सोनके व तिप्पेहळ्ळी ग्रामपंचायतींना प्रत्येकी २५ लाख आणि आगलावेवाडी, हटकर मंगेवाडी आणि सोनलवाडी यांना प्रत्येकी २० लाख असे पाच ग्रामपंचायतींना मा.बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजनेंतर्गत नविन ग्रामपंचायत इमारत बांधण्यासाठी एकूण १ कोटी १० लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांच्या मागणीला यश मिळाले आहे.

ग्रामपंचायतीचे पदाधिकारी व प्रशासकीय अधिकार्‍यांना गावचा कारभार पाहताना येणार्‍या अडचणी दूर व्हाव्या, यासाठी मतदार संघातील ५ ग्रामपंचायत कार्यालयांच्या नूतन इमारतीसाठी आमदार डॉ.बाबासाहेब देशमुख यांनी प्रत्येकी २५ लाख रुपयांचा निधी मिळवून दिला आहे. मतदार संघाच्या सर्वांगिण विकासाला गती देवून, शासकीय कार्यालयांचा देखील विकास करण्यावर आमदार डॉ.बाबासाहेब देशमुख यांनी भर दिला आहे. यामुळे प्रशासकीय अधिकार्‍यांची मोठी अडचण दूर होवून, नागरिकांना सेवा मिळण्याची सुविधा निर्माण झाली आहे.
ग्रामविकास, पंचायतराज मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्याकडे आमदार डॉ.बाबासाहेब देशमुख यांनी ग्रामपंचायतींना इमारत बांधण्यासाठी निधी उपलब्ध करून द्यावा ही मागणी अधिवेशनापूर्वी केली होती. या मागणीची दखल घेत ग्रामविकास मंत्री मा.ना.जयकुमार गोरे यांनी तत्काळ या ग्रामपंचायतींना मा.बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजनेंतर्गतनिधी मंजूर केला असून निधी मंजूर केल्याबद्दल आमदार डॅा.बाबासाहेब देशमुख यांनी मंत्री महोदयांचे आभार मानले.

ग्रामपंचायतींच्या नूतन इमारतींना प्रशासकीय मान्यता मिळाल्यामुळे नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. निधी मंजूर केल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, यांच्यासह ग्रामविकास मंत्री तथा सोलापूर जिल्हा पालकमंत्री मा.ना.जयकुमार गोरे यांचे आमदार डॉ.बाबासाहेब देशमुख यांनी आभार मानले.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!