जिल्ह्यात ६९ लाख मे.टन ऊसाचे गाळप, ५५ लाख ८९ हजार क्विंटल साखरेचे उत्पादन
पिंपळनेरचा विठ्ठलराव शिंदे साखर कारखाना ऊस गाळपात आघाडीवर

जिल्ह्यात ६९ लाख मे.टन ऊसाचे गाळप, ५५ लाख ८९ हजार क्विंटल साखरेचे उत्पादन
पिंपळनेरचा विठ्ठलराव शिंदे साखर कारखाना ऊस गाळपात आघाडीवर
सांगोला (दिलीप घुले): यंदाच्या २०२५- २६ या गाळप हंगामात सोलापूर जिल्ह्यातील १० सहकारी आणि २१ खाजगी अशा ३१ साखर कारखान्यांनी १९ डिसेंबर अखेर ६९ लाख ४१ हजार २३७ मे.टन ऊसाचे गाळप केले असून सरासरी ८.०५ टक्के साखर उताऱ्याने ५५ लाख ८९ हजार ६५५ क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे. ऊस गाळपात पिंपळनेरचा विठ्ठलराव शिंदे साखर कारखाना तर सरासरी साखर उताऱ्यात अनगरचा लोकनेते बाबुराव पाटील ऍग्रो इंडस्ट्रीज जिल्ह्यात आघाडीवर आहेत.
सोलापूर जिल्ह्यातील १० सहकारी तर २१ खाजगी अशा ३१ साखर कारखान्यांनी यंदाचा गाळप हंगाम सुरू केला. १९ डिसेंबर अखेर १० सहकारी साखर कारखान्यांनी ३० लाख २८ हजार ८८५ मेट्रिक टन उसाचे गाळप केले असून २४ लाख ३८ हजार १५० क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे. साखर उतारा ८.०५ टक्के राहिला आहे. तर २२ खाजगी साखर कारखान्यांनी ३९ लाख १२ हजार ३५२ मेट्रिक टन उसाचे गाळप करून ३१ लाख ५१ हजार ५०५ क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे. तर साखर उतारा ८.०६ टक्के राहिला आहे.
संत दामाजी सहकारी साखर कारखाना मंगळवेढा १,३३,९०५ मे.टन गाळप,१,१५,५२० क्विंटल साखर, विठ्ठल कार्पोरेशन म्हैसगांव १,४८,०२८ मे.टन गाळप, ८२,५०० क्विंटल साखर, जयहिंद शुगर प्रा. लि. आचेगाव १,८१,१८६ मी.टन गाळप, १,१३,८०० क्विंटल साखर, दि सासवड माळी शुगर माळीनगर १,९४,१४० मे.टन गाळप, १६२,०८० क्विंटल साखर, श्री विठ्ठल सहकारी साखर कारखाना पंढरपूर ४,९५,९६५ मे.टन गाळप, ४,५६,९०० क्विंटल साखर, लोकमंगल शुगर इथेनॉल अँड कोजनरेशन इंडस्ट्रीज भंडारकवठे १,६४,३४५ मे.टन गाळप, १,०५,२५० क्विंटल साखर, श्री सिद्धेश्वर साखर कारखाना कुमठे १,९४,०६० मे. टन गाळप, १,७३,१६५ क्विंटल साखर, जकराया शुगर वटवटे १,७२,२२४ मे. टन गाळप, ८८,१५० क्विंटल साखर, श्री पांडुरंग श्रीपुर ४,४९,१५४ मे.टन गाळप, ३,९९,०६५ क्विंटल साखर, येडेश्वरी ऍग्रो प्रॉडक्ट्स खामगाव, बार्शी १,५२,०४५ मे. टन गाळप,१,३०,३५० क्विंटल साखर, सिताराम महाराज खर्डी २,०७,२७० मे.टन गाळप, १,७५,५२० क्विंटल साखर, भैरवनाथ शुगर आलेगाव १,९१,६२७ मे.टन गाळप, १,८०,८०० क्विंटल साखर, बबनरावजी शिंदे शुगर अँड अलाईड इंडस्ट्रीज तुर्क पिंपरी ३,०२,७१० मे.टन गाळप, २,९२,५५० क्विंटल साखर, युटोपियन शुगर कचरेवाडी २,३६,६९४ मे.टन गाळप, १,४४,५०० क्विंटल, व्ही.पी.शुगर तडवळ अक्कलकोट २,८९,९३९ मे.टन.गाळप, २,४३,५६० क्विंटल साखर, भैरवनाथ शुगर वर्क्स विहाळ ८३,४३० मे.टन गाळप, ७६,२५० क्विंटल साखर, श्री संत कुर्मदास पडसाळी ७२,३२० मे.टन गाळप, ४६,२१० क्विंटल साखर, सिद्धनाथ शुगर तिऱ्हे २,०६,८७५ मे.टन गाळप, १,४८,७५० क्विंटल साखर, सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील अकलूज ४,२७,०६१ मे.टन गाळप, ३,८३,९०० क्विंटल साखर, विठ्ठलराव शिंदे युनिट २ करकंब २,५८,७६९ मे.टन गाळप २,२३,९५० क्विंटल साखर, श्री.शंकर कारखाना सदाशिवनगर १,४६,४३९ मे.टन गाळप, १,१४,०५० क्विंटल साखर, आवताडे शुगर अँड डिस्टिलरीज प्रा. लि. नंदुर मंगळवेढा २,०१,४८० मे.टन.गाळप, १,९०,२०० क्विंटल साखर, लोकमंगल ऍग्रो इंडस्ट्रीज बीबीदारफळ १,०३,४१३ मे. टन गाळप, ६१,८३९ क्विंटल साखर, ओंकार साखर कारखाना चांदापुरी २,४७,०६१ मे.टन गाळप, २,०७,८५५ क्विंटल साखर, लोकनेते बाबुराव पाटील ऍग्रो इंडस्ट्रीज अनगर २,५७,३२५ मे.टन गाळप, २,५४,४५० क्विंटल साखर, धाराशिव साखर कारखाना (सांगोला) वाकी शिवणे १,०४,३७० मे.टन गाळप, ८३,९६० क्विंटल साखर, विठ्ठल रिफाईंड शुगर्स लि. पांडे करमाळा १,६०,७०४ मे.टन गाळप, १,३८,१०० क्विंटल साखर, विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखाना पिंपळनेर ७,४६,८४१ मे.टन गाळप, ४,४१,८०० क्विंटल साखर, आष्टी शुगर आष्टी १,८४,१६२ मे.टन गाळप, १,६१,१०० क्विंटल साखर, भैरवनाथ शुगर वर्क्स लवंगी १,९७,४४७ मे.टन गाळप, १,६९,८०० क्विंटल साखर, इंद्रेश्वर शुगर उपळाई ३०,२५८ मे.टन गाळप, २४,४०० क्विंटल साखर उत्पादन केले आहे.



