प्रभाग क्रमांक 11 मधून नितीन (आबासाहेब) इंगोले यांचा उमेदवारी अर्ज दाखल

प्रभाग क्रमांक 11 मधून नितीन (आबासाहेब) इंगोले यांचा उमेदवारी अर्ज दाखल
सांगोला (प्रतिनिधी): सांगोला शहराला सर्वोत्तम बनवण्याचे स्वप्न घेऊन प्रभाग क्रमांक ११ मधून माणगंगा परिवाराचे संस्थापक अध्यक्ष नितीन (आबासाहेब) इंगोले यांनी शिवसेना व अपक्ष असे दोन उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. शेतकरी बांधव, दुग्ध व्यावसायिक, महिला व बालविकास, व्यापारी, तसेच कष्टकरी वर्गाच्या सर्वोत्तम नागरी सुविधा निर्माण करण्याचे स्वप्न उराशी बाळगून आपण ही निवडणूक लढवणार असल्याचे प्रभाग क्रमांक 11 चे उमेदवार नितीन (आबासाहेब) इंगोले यांनी सांगितले आहे.
सांगोला नगरपरिषद निवडणुकीत प्रभाग क्रमांक 11 मधून माणगंगा परिवाराचे संस्थापक अध्यक्ष नितीन (आबासाहेब) इंगोले यांनी रविवारी शिवसेना व अपक्ष असे दोन उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, माजी आमदार शहाजीबापू पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना (शिंदे) पक्षाचे सर्व प्रमुख नेते आणि कार्यकर्ते यांच्या पाठिंब्यावर ही निवडणूक लढवणार असल्याचे नितीन (आबासाहेब) इंगोले यांनी सांगितले.
उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी उमेदवार नितीन (आबासाहेब) इंगोले, माणगंगा परिवार अर्बन बँकेच्या चेअरमन सौ.अर्चना इंगोले, संचालक सचिन इंगोले, अण्णा पाटील, दगडू भूईटे, पांडुरंग माने, रामचंद्र सुरवसे, सिताराम झरे, तानाजी सुरवसे, भारत दिघे, मधुकर केदार, अनिल भूईटे, सिताराम इंगोले, बाळासो इंगोले, औदुंबर इंगोले, संजय इंगोले, नवनाथ इंगोले, पोपट केदार, रमेश केदार, किरण सुरवसे, किरण केदार, अतुल केदार, सतीश केदार, बंडू केदार, शनी भुईटे, प्रशांत तेली, विकास बाबर, अब्बास मुलाणी, निलेश इंगोले, सागर सुरवसे, गणेश लेंडवे, प्रथमेश काकेकर, वैभव इंगोले, समाधान इंगोले, विजय इंगोले, शरद केदार, दिलीप शिंदे, संजय इंगोले, निलेश केदार, संदीप केदार आदी उपस्थित होते.



