लागा तयारीला…अखेर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर

लागा तयारीला…अखेर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर
‘या’ तारखेला होणार नगरपंचायत व नगरपरिषदेची निवडणूक
सांगोला (प्रतिनिधी): स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे पडघम वाजायला सुरुवात झाली आहे. आज संध्याकाळी चार वाजता राज्य निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद संपन्न झाली. त्यात नगरपालिका व नगरपंचायत निवडणुकीची घोषणा करण्यात आली आहे. आज महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेतली आहे. यामध्ये २४६ नगरपरिषदा आणि ४२ नगरपंचायतीच्या निवडणुका जाहीर केल्या आहेत.
नगरपंचायतीसाठी उमेदवाराला २ लाखांची खर्च मर्यादा जाहीर करण्यात आली आहे.

गेल्या चार वर्षांपासून ज्या निवडणूक कार्यक्रमाची प्रतीक्षा महाराष्ट्रभरातील मतदारांना लागून राहिली होती, तो कार्यक्रम अखेर राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत या कार्यक्रमाची घोषणा करण्यात आली. त्यानुसार पहिल्या टप्प्यात राज्यभरात नगरपरिषद व नगरपंचायतीसाठी निवडणूक कार्यक्रमाची घोषणा करण्यात आली आहे.
कधी होतील निवडणुका ? तारीख काय ?
२४६ नगरपालिका आणि ४२ नगरपरिषदांच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. मतदारसंघनिहाय ७ नोव्हेंबरला मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात येणार आहे. मोबाईल अँपमधून आपले नाव तपासू शकता. मतदारांना उमेदवारांची माहिती देखील मिळणार आहे. दुबार मतदार संदर्भात आयोगाने दक्षता घेतली आहे. दुबार मतदाराच्या नावापुढे स्टार असणार आहे. अधिकारी त्यांची चौकशी करतील. अन्यत्र मतदान करणार नाही, याची हमी घेतली जाईल, असे आयोगाने सांगितले. दुबार मतदारांची वेगळी यादी असणार आहे.
निवडणूक कार्यक्रम..
नगरपालिका निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याची तारीख १० नोव्हेंबर आहे. तर अंतिम तारीख १७ नोव्हेंबर आहे. अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख २५ नोव्हेंबर आहे. मतदान २ डिसेंबर रोजी होईल, तर मतमोजणी ३ डिसेंबर रोजी होऊन निकालही त्याच दिवशी जाहीर होईल, अशी माहिती निवडणूक आयोगाने दिली.
विभागनिहाय नगरपरिषद-नगरपंचायती निवडणूक
कोकण – 17
नाशिक -49
पुणे -60
संभाजीनगर -52
अमरावती -45
नागपूर -55
उमेदवारांच्या खर्चात वाढ
यंदा नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांसाठी खर्च मर्यादा वाढवण्यात आली आहे. त्यानुसार अ वर्ग नगरपालिकांच्या अध्यक्षपदासाठी 15 लाखांची मर्यादा तर क वर्ग नगरपालिकांसाठी 7 लाखांची खर्च मर्यादा ठरवण्यात आली आहे.
मतदारांच्या सोयीसाठी नवीन अँपची निर्मिती करण्यात आली आहे. दुबार मतदानासंदर्भात योग्य खबरदारी घेतली आहे. संभाव्य दुबार मतदारांच्या पुढे डबल स्टारचे चिन्ह दाखवण्यात आले आहे. ज्या मतदारांच्या पुढे डबल स्टार असेल त्याच्याकडून दुसरीकडे मतदान करणार नाही असे डिक्लरेशन घेतलं जाईल.
कसा असेल निवडणूक कार्यक्रम?
अर्ज दाखल करण्यास सुरुवात – १० नोव्हेंबर २०२५
अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत – १७ नोव्हेंबर २०२५
अर्जांची छाननी – १८ नोव्हेंबर २०२५
अर्ज माघारी घेण्याची अंतिम मुदत – २१ नोव्हेंबर २०२५
आक्षेप असलेल्या ठिकाणी अर्ज माघारी घेण्याची अंतिम मुदत – २५ नोव्हेंबर २०२५
निवडणूक चिन्ह व उमेदवारांची अंतिम यादी – २६ नोव्हेंबर २०२५
मतदान – २ डिसेंबर २०२५
मतमोजणी – ३ डिसेंबर २०२५
निकाल जाहीर करण्याचा दिवस – १० डिसेंबर २०२५



