राजकीय गणितं बदलण्याची ताकद असलेले ‘हुकमी एक्के’ भाजपात डेरेदाखल

राजकीय गणितं बदलण्याची ताकद असलेले ‘हुकमी एक्के’ भाजपात डेरेदाखल
भाजपचा राष्ट्रवादीसह शिंदे गटाच्या शिवसेनेला धक्का…
सांगोला (प्रतिनिधी): सोलापूर जिल्ह्यात राजकीय घडामोडींना वेग आला असून, अनेक नेत्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. राज्य सहकार परिषदेचे अध्यक्ष मोहोळचे माजी आ. राजन पाटील, माजी आ. यशवंत माने, जिल्हा दूध संघाचे चेअरमन रणजितसिंह शिंदे, विक्रांत पाटील, अजिंक्यराणा पाटील, नागनाथ क्षीरसागर, सोमेश क्षीरसागर यांच्यासह अनेक राष्ट्रवादीचे अनेक पदाधिकारी आणि हजारो कार्यकर्त्यांनी बुधवारी मुंबईतील प्रदेश कार्यालयात भाजपमध्ये प्रवेश केला. भाजपचे प्रदेशाध्यक्ष आ. रवींद्र चव्हाण यांनी सर्वांना पक्षात प्रवेश दिला. यावेळी सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार सचिन कल्याणशेट्टी, माजी आमदार राम सातपुते, भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत, शशिकांत चव्हाण उपस्थित होते. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी राज्यातील राजकीय पक्ष कामाला लागले आहेत. या पार्श्वभूमीवर सर्वत्र पक्षांमध्ये इनकमिंग सुरू आहे. मात्र यामध्ये भाजप जास्तच आघाडीवर आहे.

भाजपने आता राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या मित्र पक्षांना सुरूंग लावत ‘हुकमी एक्के’ गळाला लावले आहेत. त्यात मोहोळ आणि माढा तालुक्यातील राष्ट्रवादीचे माजी आमदार राजन पाटील आणि यशवंत माने, माजी आमदार बबनदादा शिंदे यांचे पुत्र तथा जिल्हा दूध संघाचे चेअरमन रणजितसिंह शिंदे आणि त्यांचे बंधू हे भाजपमध्ये डेरेदाखल झाले आहेत. या प्रवेशामुळे मोहोळ आणि माढा तालुक्यात राजकीय गणित बदलणार एवढं नक्की.

यावेळी मोहोळ आणि माढा तालुक्यातील राष्ट्रवादीचे माजी आमदार राजन पाटील आणि यशवंत माने यांच्यासह विक्रांत पाटील, अजिंक्यराणा पाटील, प्रकाश चौरे, दीपक माळी, अस्लम चौधरी, भरत सुतकर, विक्रांत माने, सज्जन पाटील, जालिंदर लांडे, प्रमोद डाके, कुंदन धोत्रे, राजाभाऊ गुंड यांच्यासह अनेक आजी माजी पदाधिकारी व शेकडो कार्यकर्त्यांसह हा पक्ष प्रवेश पार पडला आहे. तर माजी आमदार बबनराव शिंदे यांचे दोन्ही पुत्र रणजितसिंह शिंदे व विक्रमसिंह शिंदे हे भाजपमध्ये आले आहेत. तसेच भाजपने केवळ अजित पवार यांनाच नाही तर शिंदेंना देखील धक्का दिला आहे.

या पक्षप्रवेशावेळी बोलताना राजन पाटील म्हणाले की, सत्तेसाठी राजकारण करण्याचा आमचा वारसा नाही. आम्ही निष्ठेने एकाच पक्षात राहिलो आहोत. त्यामुळे आम्ही याठिकाणी स्थानिक भाजप कसा भक्कम होईल. येथे एकट्या भाजपचा झेंडा कसा लावला जाईल. यावर आम्ही काम करणार आहोत. आम्ही पक्ष बदलणारी माणसं नाही. जो पर्यंत जिवंत आहोत तोपर्यंत कमळच हाती ठेऊ. तर यशवंत माने म्हणाले की, भाजप एका विचाराने वाढत आहे. कोणतीही निवडणूक स्वबळावर कमळ चिन्हावर निवडणूक लढवून सगळीकडे कमळ दिसेल. अशी प्रतिक्रिया त्यांनी दिल्या.
मोहोळच्या क्षीरसागर पिता-पुत्रांची पाच वर्षांनी भाजपमध्ये घरवापसी
दुसरीकडे भाजपने केवळ अजित पवार यांनाच नाही तर शिंदेंना देखील धक्का दिला आहे. मात्र त्यांनी राजन पाटील यांचे कट्टर प्रतिस्पर्धी असलेल्या शिंदे गटाच्या
नागनाथ क्षीरसागर आणि सोमेश क्षीरसागर यांना पक्ष प्रवेश दिला आहे. मोहोळच्या क्षीरसागर पिता-पुत्रांची पाच वर्षांनी भाजपमध्ये घरवापसी होत आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर आल्याने राजकीय घडामोडींना वेग आला आहे. मोहोळमधील शिवसेनेचे ज्येष्ठ नेते नागनाथ क्षीरसागर आणि त्यांचे चिरंजीव सोमेश क्षीरसागर हे पितापुत्र सुमारे पाच वर्षांनंतर भारतीय जनता पक्षात घरवापसी करत आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर आल्याने राजकीय घडामोडींना वेग आला आहे. त्यामुळे या ठिकाणी भाजपने दिग्गजांना पक्षात घेतले असून स्थानिक स्वराज्य संस्थांना या ठिकाणी गणितं बदलणार हे आता निश्चित झालं आहे. दरम्यान या पक्ष प्रवेशामुळे भाजपला ताकदीचे नेते मिळाले आहेत. तर अजित पवार आणि शिंदेंना मात्र याचा स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये मोठा फटका बसू शकतो.
२५ वर्षांची अजित पवारांची साथ सोडून माजी आमदार यशवंत माने भाजपमध्ये
भाजपच्या ऑपरेशन लोटसने महायुतीमधील मित्र पक्षांना जोर का झटका दिला आहे. मोहोळ विधानसभा मतदारसंघांचे माजी आमदार यशवंत माने यांनी अजित पवारांची 25 वर्षानी साथ सोडली असून त्यांनी मुंबई येथे शेकडो पदाधिकारी कार्यकर्ते व माजी आमदार राजन पाटील यांच्या समवेत भाजप पक्षात जाहीर प्रवेश झाला आहे.
मोहोळ आणि माढा या दोन्ही तालुक्यात भाजपाला म्हणावे तसे यश आतापर्यंत मिळवता आलेले नाही. पाटील आणि शिंदेंच्या माध्यमातून पहिल्यांदाच भाजप दोन्ही तालुक्यात बळकट झाली आहे. आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगरपरिषद निवडणूकीत याचा परिणाम होण्याची चिन्हे आहेत. पाटील आणि शिंदेंच्या भाजप प्रवेशामुळे दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचा पारंपरिक बालेकिल्ला असलेला जिल्हा हादरला असून, आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकांपूर्वी राजकीय समीकरणात मोठा बदल होण्याची चिन्हे आहेत.



