महाराष्ट्र

अखिल भारतीय डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या केंद्रीय अध्यक्षपदी राजा माने

महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सतीश सावंत तर प्रदेश महासचिवपदी विकास भोसले

अखिल भारतीय डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या केंद्रीय अध्यक्षपदी राजा माने

महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सतीश सावंत तर प्रदेश महासचिवपदी विकास भोसले

कोल्हापूर (प्रतिनिधी): अखिल भारतीय डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या केंद्रीय अध्यक्षपदी संपादक राजा माने यांची बिनविरोध निवड केंद्रीय व राज्य कार्यकारणी समितीच्या कोल्हापूर येथे झालेल्या बैठकीत करण्यात आली. यावेळी महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सांगोला सोलापूर येथील सतीशभाऊ सावंत, राज्य महासचिवपदी कराड येथील विकास भोसले, प्रदेश उपाध्यक्षपदी अहिल्यानगर येथील इकबाल शेख, केंद्रीय उपाध्यक्षपदी महेश कुगावकर व अमोल पाटील यांची तर राष्ट्रीय सचिवपदी तेजस राऊत, संघटनेच्या साप्ताहिक विभागाच्या प्रदेशाध्यक्षपदी संजय कदम, गोवा प्रदेशाध्यक्षपदी अनिल पाटील तर मध्यप्रदेश प्रदेशाध्यक्षपदी प्रवीण कुमार खारीवाल यांच्या निवडी करण्यात आल्या.

यावेळी प्रतिबिंब प्रतिष्ठानचे विश्वस्त दीपक नलवडे, संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष सुहास पाटील, पश्चिम महाराष्ट्र संघटक विनायक कलढोणे, राज्य कार्यकारणी सदस्य सचिन भिलारे, राज्य समन्वयक गणेश बोतालजी, उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष सुभाष चिंधे, सातारा जिल्हाध्यक्ष संतोष शिराळे, सांगली जिल्हाध्यक्ष मनोहर पवार, कोल्हापूर जिल्हाध्यक्ष भाऊसाहेब फास्के, छत्रपती संभाजीनगर जिल्हाध्यक्ष रमेश नेटके, पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष धनंजय पानसांडे, सातारा जिल्हा कार्याध्यक्ष सोमनाथ साखरे यांच्यासह राज्याभरातून आलेल्या पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.

निवडीनंतर नूतन प्रदेशाध्यक्ष सतीश सावंत यांनी निवडीनंतर संस्थेचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष राजा माने यांच्या नेतृत्वाखाली राज्यातील सर्व पत्रकारांना न्याय देऊन त्यांच्या मागण्या शासनदरबारी मांडून सोडवण्यासाठी प्रयत्न करणार आहे. त्याचबरोबर पत्रकारांच्या आरोग्याचा प्रश्न टोलमाफीचा प्रश्न यासह अन्य प्रश्नावर वाचा फोडून न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात व प्रत्येक गावात पत्रकारांचे संघटन बळकट करू असा विश्वास सतीश सावंत यांनी उपस्थित पत्रकारांना दिला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!