सामाजिक

वाढदिवसाचे औचित्य साधून शिवसेना शहरप्रमुख सोमेश यावलकर यांचा सामाजिक उपक्रमांचा स्तुत्य उपक्रम!

महाआरोग्य शिबिरासह विविध योजनांचा लाभ; गोशाळेत चारावाटप, वृद्धाश्रमात अन्नदान अन् नवजात कन्यांच्या नावे पाच हजारांची ठेव

वाढदिवसाचे औचित्य साधून शिवसेना शहरप्रमुख सोमेश यावलकर यांचा सामाजिक उपक्रमांचा स्तुत्य उपक्रम!

महाआरोग्य शिबिरासह विविध योजनांचा लाभ; गोशाळेत चारावाटप, वृद्धाश्रमात अन्नदान अन् नवजात कन्यांच्या नावे पाच हजारांची ठेव

सांगोला (प्रतिनिधी): वाढदिवस म्हणजे केवळ शुभेच्छांचा वर्षाव आणि उत्सव नव्हे, तर समाजाप्रती असलेली बांधिलकी जपत गरजूंच्या चेहऱ्यावर आनंद फुलविण्याची संधीही असते. याच सामाजिक भावनेतून माजी नगरसेवक तथा शिवसेना शहरप्रमुख सोमेश यावलकर यांच्या वाढदिवसानिमित्त गुरुवार, दि. ५ नोव्हेंबर २०२६ रोजी सांगोला शहर व परिसरात विविध सामाजिक, आरोग्यविषयक आणि लोककल्याणकारी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. S.Y. युथ फाउंडेशन यांच्या वतीने महाआरोग्य शिबिर, विविध शासकीय योजनांचे कॅम्प, गोशाळेत चारावाटप, मातोश्री वृद्धाश्रमात अन्नदान तसेच नवजात मुलींच्या नावे पाच हजार रुपयांची ठेव अशा उपक्रमांचे नियोजन करण्यात आले आहे.

माजी नगरसेवक तथा शिवसेना शहरप्रमुख सोमेश यावलकर यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या महाआरोग्य शिबिरातून नागरिकांना विविध वैद्यकीय तपासण्या, उपचार आणि आवश्यक शस्त्रक्रियांसाठी मार्गदर्शन व सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. हृदयरोग, मेंदू व मणक्याचे विकार, अस्थिरोग, मूत्ररोग, लहान मुलांचे आजार तसेच नेत्रविकार अशा विविध आरोग्यविषयक समस्यांसाठी हे शिबिर आयोजित करण्यात आले आहे. शिबिरामध्ये ईसीजी, सोनोग्राफी, रक्त तपासणी, एक्स-रे, CT-IVP, CT-KUB, RGU तपासणी, डायलेसिस आदी तपासण्या व सुविधांचा समावेश आहे. तसेच आवश्यकतेनुसार विविध आजारांवरील उपचार आणि शस्त्रक्रियांसाठी मदत उपलब्ध करून देण्याचे नियोजन आहे. मेंदू, मणका, हाडांचे विकार, सांधेदुखी, मुतखडा, किडनीचे आजार, प्रोस्टेट, अपेंडिक्स, हर्निया, पित्ताशयाचे आजार तसेच लहान मुलांच्या विविध आजारांवर उपचार व शस्त्रक्रियांसाठी मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

महाआरोग्य शिबिरात मोफत नेत्र तपासणीचे विशेष आयोजन करण्यात आले आहे. नागरिकांना अल्पदरात चष्मे उपलब्ध करून देण्याबरोबरच मोतीबिंदू शस्त्रक्रिया अल्पदरात करण्याची सुविधा नियोजित आहे. डोळ्यांतील मांस काढणे, पिंग्यूकुला, रेटिना तपासणी व उपचार अशा सुविधांचाही समावेश करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, केशरी, पिवळ्या तसेच शुभ्र पांढऱ्या रेशनकार्डधारकांनाही महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेच्या माध्यमातून मोफत आरोग्यसेवेचा लाभ मिळवून देण्यासाठी मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

नागरिकांना शासकीय योजनांचा लाभ मिळावा, या उद्देशाने विविध योजना कॅम्प आयोजित करण्यात आला आहे. यामध्ये महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या सवलतीच्या योजनांबाबत माहिती व नोंदणीसाठी मदत करण्यात येणार आहे. अमृत ज्येष्ठ नागरिक योजनेअंतर्गत ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना १०० टक्के तिकीट सवलत, ज्येष्ठ नागरिक योजनेअंतर्गत ६५ वर्षांवरील ज्येष्ठांना ५० टक्के तिकीट सवलत, तर महिला सन्मान योजनेंतर्गत महिलांना ५० टक्के तिकीट सवलतीचा लाभ मिळतो.या योजनांसाठी नोंदणी करताना आधारकार्ड, संबंधित व्यक्तीची उपस्थिती आणि मोबाईल क्रमांक आवश्यक राहणार आहे. नागरिकांची विविध शासकीय कामे सुलभ व्हावीत, यासाठी आधारकार्ड दुरुस्ती, नवीन आधारकार्ड काढणे तसेच नवीन मतदार नाव नोंदणीसाठी विशेष कॅम्प आयोजित करण्यात आला आहे. आवश्यक कागदपत्रांसह नागरिकांना या सुविधांचा लाभ घेता येणार आहे. या कॅम्पचा लाभ सांगोला शहरातील जास्तीत जास्त नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

समाजात मुलींच्या जन्माचे स्वागत व्हावे आणि मुलींच्या भविष्यासाठी आर्थिक सुरक्षिततेची जाणीव निर्माण व्हावी, या उद्देशाने ‘कन्या ठेव योजना’ हा विशेष उपक्रम राबविण्यात येणार आहे. गुरुवार, दि. ५ नोव्हेंबर २०२६ रोजी जन्मलेल्या मुलींच्या नावे प्रत्येकी ५ हजार रुपयांची ठेव ठेवण्यात येणार आहे. मुलींच्या जन्माचा आनंद सामाजिक पातळीवर साजरा करण्याबरोबरच त्यांच्या भविष्यासाठी आर्थिक हातभार लावण्याचा हा उपक्रम निश्चितच लक्षवेधी ठरणार आहे.

सामाजिक बांधिलकी केवळ माणसांपुरती मर्यादित न ठेवता मुक्या जनावरांप्रतीही आपुलकी जपण्याच्या भावनेतून गुरुवार, दि. ५ नोव्हेंबर रोजी दुपारी १२ वाजता बामणी येथील गोशाळेत चारावाटप करण्यात येणार आहे. या उपक्रमातून गोमातेच्या सेवेसाठी हातभार लावण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. वाढदिवसाच्या निमित्ताने गुरुवार, दि. ५ नोव्हेंबर रोजी दुपारी १ वाजता सांगोला येथील मातोश्री वृद्धाश्रमात अन्नदानाचा उपक्रम राबविण्यात येणार आहे. वृद्धाश्रमातील ज्येष्ठ नागरिकांसोबत आपुलकीचे क्षण व्यतीत करून त्यांना भोजन देण्याचा हा सामाजिक उपक्रम आयोजित करण्यात आला आहे.

माजी नगरसेवक तथा शिवसेना शहरप्रमुख सोमेश यावलकर यांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्यसेवा, शासकीय योजनांचा लाभ, मुलींच्या जन्माचे स्वागत, गोसेवा आणि ज्येष्ठ नागरिकांची सेवा अशा विविध क्षेत्रांना स्पर्श करणारे उपक्रम एकाच दिवशी आयोजित करण्यात आले आहेत. वाढदिवसाच्या निमित्ताने समाजातील विविध घटकांना मदतीचा हात देण्याचा हा प्रयत्न सांगोला शहरात लक्षवेधी ठरणार आहे. महाआरोग्य शिबिर व विविध योजना कॅम्पचे आयोजन मा. नगरसेवक सोमेश यावलकर जनसंपर्क कार्यालय, वज्राबाद पेठ, सांगोला येथे करण्यात आले आहे. तर चारावाटप बामणी येथील गोशाळेत आणि अन्नदान मातोश्री वृद्धाश्रम, सांगोला येथे होणार आहे. या सर्व उपक्रमांचे आयोजन S.Y. युथ फाउंडेशन, सांगोला शहर यांच्या वतीने करण्यात आले असून, सांगोला शहर व परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन उपलब्ध सुविधांचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!