राजकीय

सांगोला मतदार संघाच्या दुष्काळी संकटावर तातडीच्या उपाययोजना करा; आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

दुष्काळाने संपूर्ण मतदारसंघ होरपळतोय; पाणीटंचाई आणि चारा प्रश्न तात्काळ सोडवण्याची मागणी

सांगोला मतदार संघाच्या दुष्काळी संकटावर तातडीच्या उपाययोजना करा; आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

दुष्काळाने संपूर्ण मतदारसंघ होरपळतोय; पाणीटंचाई आणि चारा प्रश्न तात्काळ सोडवण्याची मागणी

सांगोला (प्रतिनिधी) : सांगोला तालुक्यासह संपूर्ण मतदार संघाची दुष्काळी परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत असून शेतकरी, शेतमजूर आणि पशुधनासमोर मोठे संकट उभे राहिले आहे. या पार्श्वभूमीवर आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी सोलापूर येथे जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांची शुक्रवार दिनांक 30 ऑक्टोबर रोजी भेट घेऊन सांगोला तालुक्यासह संपूर्ण मतदारसंघाच्या दुष्काळी परिस्थितीची सविस्तर माहिती दिली. तसेच पाणीटंचाई, प्रलंबित पाणीपुरवठा योजना आणि पशुधनासाठी चारा उपलब्धतेच्या प्रश्नांवर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली.

सांगोला तालुक्यासह संपूर्ण मतदारसंघांमध्ये दुष्काळाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून शेतकरी, शेतमजूर आणि पशुधनासमोर गंभीर संकट उभे राहिले आहे. या परिस्थितीत तालुक्यातील काही गावांमधील महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या सांगोला पाणीपुरवठा योजनेची उर्वरित कामे तातडीने पूर्ण करून तालुक्यातील सर्व गावांना पाणी उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी आमदार डॉ बाबासाहेब देशमुख यांनी केली.सध्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरण योजनेतून 82 गावांपैकी 51 गावांना पाणीपुरवठा होत आहे. मात्र, अद्याप काही गावांमध्ये योजनेची कामे प्रलंबित असल्याने तेथील नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे उर्वरित गावांतील प्रलंबित कामे युद्धपातळीवर पूर्ण करून सर्व गावांना योजनेचा लाभ मिळावा, असे त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिले.

सांगोला तालुक्यासह संपूर्ण मतदारसंघांमध्ये दुष्काळाची तीव्रता वाढत असून पशुधनाच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे. शेतकरी आणि पशुपालकांसमोर जनावरांचे संगोपन करण्याचे मोठे आव्हान उभे राहिले आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने विलंब न करता संपूर्ण मतदारसंघांमध्ये चार चारा छावणी डेपो तातडीने सुरू करावेत. त्यासाठी आवश्यक नियोजन करून पशुधनाला पुरेसा चारा उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांच्याकडे केली. दुष्काळाच्या संकटात शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी चारा डेपो सुरू करणे आवश्यक असल्याचे त्यांनी यावेळी निदर्शनास आणून दिले.दुष्काळी परिस्थितीवर तातडीने ठोस उपाययोजना करून सर्वसामान्य नागरिक, शेतकरी आणि पशुधनाला दिलासा देण्याची अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली.

आमदार डॉ.बाबासाहेब देशमुख यांच्या मागण्यास जिल्हाधिकाऱ्यांचा सकारात्मक प्रतिसाद…सांगोला तालुक्यासह संपूर्ण मतदारसंघातील दुष्काळी परिस्थिती, पाणीटंचाई आणि पशुधनाच्या चारा प्रश्नाबाबत आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी मांडलेल्या मागण्यांची जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांनी सकारात्मक दखल घेतली. तालुक्यातील उर्वरित गावांना पाणीपुरवठा करण्यासाठी प्रलंबित कामे तसेच चार चारा छावणी डेपो सुरू करण्याच्या मागणीबाबत प्रशासनाकडून आवश्यक कार्यवाही करण्याबाबत सकारात्मक भूमिका दर्शविली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!