राजकीय

जिल्हा बँक निवडणुकीसाठी २३८ अर्ज दाखल; सोमवारच्या छाननीनंतर बिनविरोधचे चित्र होणार स्पष्ट

अर्ज माघारीनंतर राऊत, पाटील, आवताडे यांच्या बिनविरोधची शक्यता

जिल्हा बँक निवडणुकीसाठी २३८ अर्ज दाखल; सोमवारच्या छाननीनंतर बिनविरोधचे चित्र होणार स्पष्ट

अर्ज माघारीनंतर राऊत, पाटील, आवताडे यांच्या बिनविरोधची शक्यता

सोलापूर (प्रतिनिधी): शुक्रवारी दाखल झालेल्या १६९ सह एकूण २३८ उमेदवारांचे अर्ज दाखल झाले आहेत. शुक्रवारी खासदार, आमदार, माजी आमदार तसेच विविध संस्थांवर काम केलेल्यांनी अर्ज दाखल करण्यासाठी गर्दी केली होती. एक खासदार, सहा विद्यमान आमदार, आठ माजी आमदार यांच्यासह अनेक मात्र नेतेमंडळींनी सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळ निवडणुकीसाठी दाखल झालेल्या अर्जांची छाननी सोमवारी बँकेच्या सभागृहात होणार आहे. बार्शी, मोहोळ आणि मंगळवेढा विकास सोसायटी मतदारसंघात एकाच कुटुंबातील अर्ज असल्याने माघारीनंतर राऊत, पाटील अन् आवताडे यांची बिनविरोध निवड होण्याची शक्यता असून, कोण माघार घेणार, याकडे लक्ष लागले आहे.

विकास सोसायटी मतदार संघ
शुक्रवारी संजीव सिद्रामप्पा पाटील (अक्कलकोट), आमदार राजेंद्र राऊत (चार अर्ज, बार्शी), शंभुराजे जयवंतराव जगताप, माजी आमदार जयवंतराव जगताप, सुभाष गुळवे (करमाळा), सुभाष निंबाळकर, माजी आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील, अर्जुनसिंह मोहिते-पाटील, संग्रामसिंह जहागीरदार, शहाजीराव पाटील, ज्ञानराज पाटील (माळशिरस), माजी आमदार संजयमामा शिंदे, यशवंत शिंदे, गणपतराव साठे, भारत शिंदे, संजय कोकाटे (माढा), सुशील बबनराव अवताडे (मंगळवेढा), माजी आमदार प्रशांतराव परिचारक, प्रणव मुकुंद परिचारक, उमेश प्रभाकर परिचारक (पंढरपूर), माजी पंचायत समिती सदस्या रुपाली दादासाहेब लवटे, सुभाष पाटील, मारुती ढाळे, गजेंद्र कोळेकर, आमदार डॉ.बाबासाहेब देशमुख, सभापती चेतनसिंह केदार सावंत, विलास पाटील, संजय इंगोले, जिल्हा परिषद सदस्य अतुल पवार, सिद्धेश्वर मेटकरी (सांगोला), माजी आमदार दिलीप माने, पृथ्वीराज माने, धनंजय भोसले, बाळासाहेब पाटील (उत्तर सोलापूर), सुरेश हसापुरे (दक्षिण सोलापूर).

महिला मतदार संघ –
माजी महापौर शोभा बनशेट्टी, इंदुमती अलगोंडा, माजी पंचायत समिती सदस्या रुपाली दादासाहेब लवटे, निता देवानंद गुंड, प्रियंका उमाकांत भगत, आशा धावरे, रुपमती दिपकआबा साळुंखे पाटील, माजी आमदार शामल दिगंबरराव बागल, जिल्हा परिषद सदस्या रश्मी बागल, वनिता सुभाष गुळवे, अश्विनी सुजित बागल, वनीता मारुती लवटे, राणी संतोष वारे, पूजा संतोष चौगुले, सिंधू प्रताप पाटील, सुवर्णा सुशीलकुमार दळवे, नंदाबाई हरीदास केवारे, रुक्मिणी विठ्ठल रणदिवे, वैशाली भगवान चौगुले, अर्चना दिलीप घाडगे, मिनल गणपतराव साठे, विणा सुधाकर जोकारे, सविता प्रदीप खुने, छायादेवी सोपान नारनवर, त्रिवेणी शाम आकळे, कविता दत्तात्रय खडतरे.

अनुसूचित जाती जमाती मतदार संघ- वाघमारे विष्णु अंबादास, साळे जयंत तानाजी, भोसले अरविंद आण्णा, साबळे महादेव मुरलीधर, नाईकनवरे नानासाहेब पंढरीनाथ, कांबळे महादेव किसन, ढोबळे मल्हारी बापू, सातपुते किसन निवृत्ती, दुपारगुडे येदा तुकाराम, वाघमारे पूर्वा भारत, माजी आमदार सातपुते राम विठ्ठल, खडतरे दत्तात्रय तात्या, खडतरे कविता दत्तात्रय.

इतर मागासवर्गीय मतदार संघ-
येडवे भिमराव नारायण, पाटील अजिंक्यराणा राजन, कदम नागनाथ उध्दव, माजी आमदार म्हेत्रे सिद्धाराम सातलिंगप्पा, सुतार जमीर बादशहा, पाटील बसवराज रामगोंडा, बनशेट्टी श्रीशैल रेवणसिध्द, बनशेट्टी शोभा श्रीशैल, हसापुरे सुरेश सिद्रामप्पा, हसापुरे श्रीदिप सुरेश, माने पृथ्वीराज दिलीप, माने जयकुमार ब्रह्मदेव, स्वामी चिदानंद विरभद्र, शिंदे नागनाथ देवराव, कवारे विशाल हरिदास, शिंदे यशवंत संजयमामा, आवताडे सिद्धेश्वर बबनराव, तांबोळी लतीफ हिरालाल, आकळे शाम तुकाराम.

नागरी सहकारी बँका, नागरी व ग्रामीण पतसंस्था, पगारदार नोकरांच्या पतसंस्था मतदार संघ
आवताडे सिद्धेश्वर बबनराव, पाटील अजिंक्यराणा राजन, देशमुख मनिष सुभाष, आमदार देशमुख सुभाष सुरेशचंद्र, पाटील प्रकाश शामराव, गायकवाड अस्मिता सुरेश, काळे कल्याण वसंतराव, जमादार (कोळी) भिमाशंकर नागप्पा, चाकोते सिद्धाराम बाबुराव, शिंदे रणजित बबनराव, शिंदे अमोल बाळासाहेब, तडवळकर रोहिणी रामचंद्र, पवार शहाजी गुलचंद्र, गंगदे राजेंद्र शिवराया, देवी कन्हैयालाल गिरधरदास, बनशेट्टी श्रीशैल रेवणसिध्द, बनशेट्टी शोभा श्रीशैल, गायकवाड सोमराज संदिपान, साळुंखे सुर्यादित्य दीपक, गुंड देवानंद रावसाहेब, गुंड निता देवानंद, काळेल अरविंद श्रीमंत, कौडुभैरी चंद्रशेखर जयनारायण, गुळवे सुभाष जगन्नाथ, जाधव भारत हरिभाऊ, पाटील शंकर मल्लिकार्जुन, काटकर बाळासाहेब निवृत्ती, कोंडले श्रीथर उपेंद्रम, केवारे विशाल हरिदास, परिचारक प्रणव मुकुंद, हंचाटे राजकुमार बाबुराव, आमदार आवताडे समाधान महादेव.

भटक्या विमुक्त जाती-जमाती मतदार संघ-
मासाळ हणमंत तातोबा, राठोड युवराज भिमराव, गडदे पोपट रामचंद्र, घुटुकडे राहुल बाबा, लेंगरे विलास भिवा, राठोड संजय तुकाराम, टेकाळे प्रताप रामचंद्र, लवटे रूपाली दादासाहेब, पाटील प्रथमेश वसंतराव, देशमुख अनिकेत चंद्रकांत, कांबळे शिवाजी अंबादास, लवटे मारूती भिमराव, वाघमोडे राहुल बाजीराव, कोळी बिरमल भिमराव, बंदिछोडे राजेंद्र धुळप्पा, कोंडले श्रीधर उपेंद्रम, वाघमोडे तानाजी मारूती, वाकसे रमेश अंतराम, पाटील विलास नारायण, पाटील ज्ञानराज संजय, खटके महेंद्र मनोहर, राठोड प्रमोद विश्वनाथ, सुळ हणमंत देवबा.

कृषी पणन संस्था व शेती माल प्रक्रिया मतदारसंघ 
आवताडे सुशील बबनराव, पाटील अजिंक्यराणा राजन, शिंदे रणजित बबनराव, गायकवाड बाबुराव रामचंद्र, साळुंखे सुर्यादित्य दिपकराव, जाधव-पाटील रमेश पांडूरंग, मोहिते पाटील अर्जुनसिंह मदनसिंह, ताटे विजय नारायण, खासदार मोहिते पाटील धैर्यशील राजसिंह, माजी आमदार मोहिते पाटील रणजितसिंह विजयसिंह, जहागिरदार संग्रामसिंह अजितसिंह, कल्याणशेट्टी मिलन मलप्पा, कुंभार नागराज इरण्णा, शिंदे यशवंत संजयमामा, आमदार आवताडे समाधान महादेव, आमदार पाटील अभिजित धनंजय.

इतर शेती संस्था (दुग्ध संस्था- व्यक्ती सभासद) मतदार संघ-

शिंदे रणजित बबनराव, गायकवाड मल्हारी भाऊसाहेब, साळुंखे सुर्यादित्य दिपकराव, माजी आमदार मोहिते पाटील रणजितसिंह विजयसिंह, खासदार मोहिते पाटील धैर्यशील राजसिंह, मोहिते पाटील अर्जुनसिंह मदनसिंह, लवटे मारुती भिमराव, लवटे वनिता मारुती, चौगुले पूजा संतोष, पाटील शिवाजी बलभिम, माळी बाळासाहेब महादेव, घाडगे अभिजीत दिलीप, आमदार आवताडे समाधान महादेव.

विकास सोसायटी मतदारसंघात बार्शी तालुक्यात आमदार राजेंद्र राऊत आणि त्यांचे पुत्र रणवीर राऊत, मोहोळमध्ये माजी आमदार राजन पाटील आणि त्यांचे पुत्र विक्रांत पाटील यांनी अर्ज दाखल केले आहेत. मंगळवेढ्यात बँकेचे माजी उपाध्यक्ष बबनराव आवताडे आणि त्यांची मुले सिद्धेश्वर आवताडे व सुशील आवताडे यांनी उमेदवारी अर्ज भरले आहेत. करमाळ्यात जयवंतराव जगताप यांच्यासह त्यांचे पुत्र शंभूराजे जगताप आणि माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुभाष गुळवे यांचा अर्ज आहे. पंढरपूरमध्ये माजी आमदार प्रशांत परिचारक कुटुंबातील तिघांनी, तर कल्याण काळे यांनी एकमेव अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे अर्ज छाननीनंतर होणाऱ्या माघारी आणि संभाव्य बिनविरोध निवडीबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.

जिल्हा बँक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी सोसायटी मतदारसंघात ११ जागांसाठी ७२ उमेदवारांचे ७८ अर्ज अणि अर्ज दाखल झाले. महिला मतदारसंघात २ जागांसाठी ३४ उमेदवार अर्ज, ३६ अर्ज दाखल झाले. अनु. जाती-जमातीतून १ जागेसाठी १६ उमेदवारांचे अर्ज आहेत. इतर मागासवर्गातून १ जागेसाठी १७ उमेदवारी अर्ज दाखल आहेत. व्हीजीएनटीमधून १ जागेसाठी २३ उमेदवार असून, २४ अर्ज दाखल झाले आहेत. कृषी व पणन संस्था मतदार संघातून १ जागेसाठी १६ उमेदवार असून, १९ अर्ज दाखल आहेत. दूध संस्था मतदार संघातून १ जागेसाठी १३ उमेदवार अर्ज १७ अर्ज दाखल आहेत. नागरी बँक/ पतसंस्था मतदारसंघातून १ जागेसाठी ३२ उमेदवार आणि ३७ अर्ज दाखल झाले आहेत. एकूण १९ जागांसाठी २०१ उमेदवार आणि २३८ अर्ज दाखल झाले आहेत.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!