सामाजिक

दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या बळीराजाला खंडागळे हॉस्पिटलचा आरोग्याचा आधार!

शेतकरी, शेतमजुरांसाठी मोफत व सवलतीच्या दरात उपचार; ओपीडीपासून शस्त्रक्रियांपर्यंत मोठा दिलासा

दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या बळीराजाला खंडागळे हॉस्पिटलचा आरोग्याचा आधार!

शेतकरी, शेतमजुरांसाठी मोफत व सवलतीच्या दरात उपचार; ओपीडीपासून शस्त्रक्रियांपर्यंत मोठा दिलासा

सामाजिक बांधिलकीतून डॉ. परेश खंडागळे यांचा पुढाकार; २४ तास आपत्कालीन सेवेसह अत्याधुनिक आरोग्य सुविधा उपलब्ध

सांगोला (प्रतिनिधी) : निसर्गाच्या लहरीपणामुळे निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीचा फटका शेतकरी, शेतमजूर आणि सर्वसामान्य नागरिकांना बसत आहे. पाण्याची टंचाई, शेतीतील घटलेले उत्पन्न, रोजगाराचा अभाव आणि वाढता आर्थिक ताण यामुळे ग्रामीण भागातील अनेक कुटुंबांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. अशा परिस्थितीत कुटुंबातील एखाद्या व्यक्तीचे आजारपण किंवा अचानक उद्भवणारी आरोग्यविषयक समस्या म्हणजे या कुटुंबांसाठी आणखी एक मोठे संकट ठरत आहे. आर्थिक अडचणींमुळे अनेकदा रुग्ण उपचार घेण्यास विलंब करतात. हीच बाब लक्षात घेऊन सांगोला येथील खंडागळे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे सर्वेसर्वा डॉ.परेश खंडागळे यांनी सामाजिक बांधिलकी जपत शेतकरी, शेतमजूर आणि गरजू रुग्णांसाठी मोफत तसेच सवलतीच्या दरात आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.

खंडागळे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलने घेतलेला हा निर्णय केवळ वैद्यकीय सवलती देण्यापुरता मर्यादित नसून संकटाच्या काळात ग्रामीण भागातील शेतकरी, कष्टकरी आणि गरजू कुटुंबांना मानसिक व आरोग्यविषयक आधार देणारा आहे. आर्थिक अडचणींमुळे उपचार पुढे ढकलण्याची वेळ कोणावरही येऊ नये, यासाठी हॉस्पिटल प्रशासनाने उचललेले हे पाऊल निश्चितच दिलासादायक ठरणार आहे. सांगोला तालुक्यासह परिसरातील दुष्काळग्रस्त शेतकरी, शेतमजूर आणि गरजू नागरिकांनी या उपक्रमाचा लाभ घ्यावा. आरोग्याच्या कोणत्याही समस्येकडे दुर्लक्ष न करता वेळेत तपासणी करून घ्यावी, असे आवाहन खंडागळे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

या उपक्रमांतर्गत बाह्यरुग्ण तपासणी (OPD), विविध लॅब व इतर वैद्यकीय तपासण्या, रुग्णालयात ॲडमिट राहण्याचा खर्च तसेच विविध शस्त्रक्रियांच्या (ऑपरेशन्स) शुल्कात मोठी सवलत दिली जाणार आहे. हॉस्पिटलचे संचालक डॉ. परेश खंडागळे (जनरल फिजिशियन व स्त्रीरोग प्रसूतीशास्त्र तज्ञ) यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविला जात असून, दुष्काळात आर्थिक विवंचनेमुळे उपचारांपासून कोणीही वंचित राहू नये, हा यामागील मुख्य उद्देश आहे.

हॉस्पिटलमध्ये उपलब्ध प्रमुख सेवा व सुविधा:

स्त्रीरोग व प्रसूती विभाग: गरोदर मातांची विशेष तपासणी, प्रसूती पूर्व व पश्चात आरोग्य तपासणी, नॉर्मल डिलिव्हरी व सिझेरियन, वंध्यत्व निवारण, गर्भाशयाची पिशवी काढणे, पिशवी साफ करणे, टाका टाकणे, गाठी काढणे, अंगावर पांढरे किंवा लाल जाणे तसेच मुलींच्या व महिलांच्या मासिक पाळीविषयक सर्व समस्यांवर अनुभवी डॉक्टरांकडून खात्रीशीर उपचार.

शासकीय आरोग्य योजना: महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना (MJPJAY) तसेच प्रधानमंत्री जन आरोग्य योजना (आयुष्मान भारत) अंतर्गत पात्र रुग्णांना मोफत व सवलतीच्या उपचारांची सुविधा उपलब्ध.

२४ तास आपत्कालीन सेवा (24×7 Emergency Services): रुग्णांच्या सोयीसाठी २४ तास इमर्जन्सी व कॅज्युअल्टी विभाग, अतिदक्षता विभाग (ICU), नवजात अतिदक्षता विभाग (NICU), तत्पर ॲम्ब्युलन्स सुविधा आणि २४ तास मेडिकल स्टोअर उपलब्ध.

सांगोला व परिसरातील दुष्काळग्रस्त शेतकरी, मजूर आणि गरजू नागरिकांनी आरोग्याच्या समस्या उद्भवल्यास या सवलतीचा आणि सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन खंडागळे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

रुग्णसेवेसाठी संपर्क व पत्ता
खंडागळे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल
कडलास रोड, कडलास नाका व सांगोला कॉलेजच्या मधे, सांगोला, जि. सोलापूर – ४१३३०७.
संचालक : डॉ. परेश खंडागळे
जनरल फिजिशियन व स्त्रीरोग व प्रसूतीशास्त्र तज्ज्ञ

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!