महाराष्ट्र

सांगोला तालुक्याच्या विकासाला गती; आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांच्या पाठपुराव्याला मोठे यश

रस्ते विकासासाठी तब्बल १० कोटींचा निधी मंजूर; २८ महत्त्वाच्या रस्त्यांचे होणार रूपांतर

सांगोला तालुक्याच्या विकासाला गती; आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांच्या पाठपुराव्याला मोठे यश

रस्ते विकासासाठी तब्बल १० कोटींचा निधी मंजूर; २८ महत्त्वाच्या रस्त्यांचे होणार रूपांतर

सांगोला (प्रतिनिधी): सांगोला विधानसभा मतदारसंघातील ग्रामीण भागातील रस्ते विकासासाठी आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला मोठे यश मिळाले असून तालुक्यातील विविध रस्ते विकास व दुरुस्ती कामांसाठी तब्बल १० कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. या निधीमुळे तालुक्यातील अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या रस्त्यांच्या समस्या मार्गी लागणार असून शेतकरी, विद्यार्थी, व्यापारी आणि सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

आमदार डॉ. देशमुख यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास व पंचायतराज मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्याकडे विशेष पाठपुरावा करून सांगोला तालुक्यातील रस्त्यांसाठी निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती. त्यांच्या या मागणीची सकारात्मक दखल घेत पालकमंत्री गोरे यांनी तातडीने ७ कोटी रुपये आणि त्यानंतर आणखी ३ कोटी रुपये असा एकूण १० कोटी रुपयांचा निधी मंजूर केला.

सांगोला तालुक्यातील (शिरभावी) मांजरी सावे इमडेवाडी रस्ता, (भोपसेवाडी) मानेवाडी रस्ता, (घेरडी) मानेवस्ती ते ग्रामा १९० रस्ता, ढोलेमळा रस्ता ते संगेवाडी, इजिमा ५५ ते मेडशिंगी रस्ता, सोनंद मासाळवस्ती ते आगलावेवाडी रस्ता, गौडवाडी जुजारपूर गुणाप्पाचीवाडी ते वाळेखिंडी ते जि. हद्द रस्ता, हतीद ते ह. मंगेवाडी रस्ता, पाचेगांव बु. ते किडबिसरी रस्ता, कोळे ते बाणुरगड रस्ता, महुद ते (हलदहीवडी) इजिमा ९१ रस्ता, रामा १२४ ते (शिवणे म्हसोबा देवस्थान) प्र.१८२ रस्ता, शिवणे घाडगेवस्ती ते हलदहिवडी रस्ता, वाकी घेरडी निमग्रेवाडी ते कडलास रस्ता या कामांना प्रत्येकी ५० लाख असे एकूण ७ कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

तसेच देवळे महमदाबाद ग्रामा १२८ सा क्र ०/००० ते २/००० मध्ये रस्ता दुरुस्ती करणे, कोळे तिप्पेहळ्ळी घोरपडी ते जिल्हाहद्द ग्रामा ११७ सा क्र ०/००० ते ४/००० मध्ये रस्ता दुरुस्ती करणे,इ.९२ ते (धायटी) सरगरवस्ती ग्रामा १५८ सा क्र ०/००० ते १/००० मध्ये रस्ता दुरुस्ती करणे,महिम ते गार्डी ग्रामा ६५ सा क्र ०/००० ते ४/००० मध्ये रस्ता दुरुस्ती करणे, इ.१३३ ते हबीसेवाडी सरगरवस्ती खरातवस्ती ग्रामा १९९ सा क्र ०/००० ते ४/००० मध्ये रस्ता दुरुस्ती करणे, इ.१३३ (पारे) येळीव जिल्हा हद्द ग्रामा १०४ सा क्र ०/००० ते २/००० मध्ये रस्ता दुरुस्ती करणे, नरळे कोंडग बाबरवस्ती ग्रामा १९८ सा क्र ०/००० ते ३/००० मध्ये रस्ता दुरुस्ती करणे, चिंचोली शिनगारेवस्ती रस्ता ग्रामा ३२७ सा क्र ०/००० ते ५/००० मध्ये रस्ता दुरुस्त करणे, जवळा आगलावेवाडी रस्ता ग्रामा ११६ सा क्र ०/००० ते ५/००० मध्ये रस्ता दुरुस्ती करणे, प्ररामा-६ (अनकढाळ) बंडगरपाटी ते राजुरी ग्रामा ४८ सा क्र ०/००० ते ३/००० मध्ये रस्ता दुरुस्ती करणे, वाणी चिंचाळे सोपेवस्ती ग्रामा २७२ सा क्र ०/००० ते १/५०० मध्ये रस्ता दुरुस्ती करणे,नाझरे ते अजनाळे ग्रामा २९ सा क्र ०/००० ते ७/००० मध्ये रस्ता दुरुस्ती करणे, प्रजिमा १६३ शिरभावी मांजरी सावे इमलेवाडी रस्ता इजिमा १४९ सा.क्र.०/०० ते ७/०० मध्ये रस्ता दुरुस्ती करणे, हटकर मंगेवाडी बेरडमळा ते प्र.७२ ग्रामा १८५ सा क्र ०/००० ते २/००० मध्ये रस्ता दुरुस्ती करणे. या सर्व कामांना एकूण ३ कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

ग्रामीण भागातील खराब रस्त्यांमुळे शेतमाल वाहतूक, शालेय विद्यार्थ्यांची ये-जा, रुग्णवाहिका सेवा तसेच दैनंदिन प्रवासात मोठ्या अडचणी निर्माण होत होत्या. अनेक गावांतील शेतकऱ्यांना बाजारपेठेत शेतमाल पोहोचवण्यासाठी अतिरिक्त खर्च आणि वेळ खर्च करावा लागत होता. आता या निधीमुळे रस्त्यांचे जाळे मजबूत होणार असून ग्रामीण भागाच्या आर्थिक विकासाला चालना मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. रस्ते विकासासाठी निधी मंजूर झाल्याने तालुक्यात समाधानाचे वातावरण निर्माण झाले असून विविध गावांतील ग्रामस्थ आणि शेतकऱ्यांनी आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांच्या प्रयत्नांचे स्वागत केले आहे. दरम्यान, हा निधी मंजूर करून सांगोला तालुक्याच्या विकासाला ताकद दिल्याबद्दल आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांचे आभार व्यक्त केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!