महाराष्ट्र

सूर्योदय परिवार आणि शिवरत्न मेडशिंगी आयोजित सूर्योदय चषक क्रिकेट स्पर्धेचा आज समारोप

चित्तथरारक अंतिम सामन्या करिता क्रिकेटवीर कृष्णा सातपुते यांच्यासह मान्यवर उपस्थित राहणार

सूर्योदय परिवार आणि शिवरत्न मेडशिंगी आयोजित सूर्योदय चषक क्रिकेट स्पर्धेचा आज समारोप

चित्तथरारक अंतिम सामन्या करिता क्रिकेटवीर कृष्णा सातपुते यांच्यासह मान्यवर उपस्थित राहणार

सांगोला (प्रतिनिधी.): संपूर्ण महाराष्ट्रभर सहकार, कृषी, उद्योग आणि सामाजिक बांधिलकी अशी चौफेर भरारी घेणारा सूर्योदय परिवार आणि शिवरत्न मेडशिंगी यांच्या संयुक्त विद्यमाने मेडशिंगी येथील कै शिवाजीराव शेंडे जिमखाना या सुसज्ज मैदानावर सांगोला तालुकास्तरीय ‘भव्य डे नाईट टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे’ आयोजन करण्यात आले असून दिनांक 16 मे पासून सुमारे 11 दिवस क्रिकेट रसिकांच्या अलोट गर्दीत सुरू असलेल्या या स्पर्धेचा अंतिम दिवशीचा सेमी फायनल आणि फायनल सामन्याचा चित्तवेधक थरार मंगळवार दिनांक 26 मे रोजी सायंकाळी संपन्न होणार असल्याची माहिती सूर्योदय परिवाराचे संस्थापक आणि सूर्योदय चषकचे संकल्पक अनिलभाऊ इंगवले यांनी दिली.

या अंतिम सामन्यासाठी भारतीय टेनिस बॉल क्रिकेट संघाचा कर्णधार राहिलेला आणि सोलापूर जिल्ह्याच्या क्रिकेट विश्वातील मानबिंदू कृष्णा सातपुते यांच्यासह कला, क्रीडा राजकारण व समाजकारणातील विविध मान्यवर उपस्थित राहणार असल्याची माहितीही यावेळी अनिलभाऊ इंगवले यांनी दिली. एलकेपी मल्टीस्टेट, सूर्योदय अर्बन यासारख्या वित्तीय संस्था तसेच दूध विभाग आणि सूर्योदय मॉल सारख्या उद्योगांच्या माध्यमातून हजारो तरुणांच्या हाताला काम उपलब्ध करून देणाऱ्या सूर्योदय ग्रुपच्या वतीने सामाजिक बांधिलकी देखील मोठ्या प्रमाणात जपण्यात येते. अलीकडील काळात मोबाईलच्या अतिवापरामुळे खेळासाठी घराबाहेर देखील जायला नकार देणाऱ्या तरुणाईला जगप्रसिद्ध अशा क्रिकेट स्पर्धांच्या अशा प्रकारच्या आयोजनातून मर्दानी खेळासाठी मैदानावर जायला प्रेरणा मिळते. क्रिकेटमुळे उत्तम शारीरिक व्यायाम आणि मनाची खंबीरता प्राप्त होत असून निर्णय क्षमता, वेळेचे अचूक नियोजन, खिलाडू वृत्ती, चपळता ,सांघिक भावना, एकोपा अशा कितीतरी गुणांचा विकास तरुणांमध्ये होतो. मनोरंजना बरोबरच अशा अनेक वैशिष्ट्यांमुळे हा खेळ जगभर लोकप्रिय झालेला आपल्याला पहावयास मिळतो. मेडशिंगी गावचे सुपुत्र आणि सांगोला येथील आनंद हॉस्पिटलचे डॉ अमर शेंडे यांनी या खेळासाठी सुविधायुक्त आणि अत्यंत सुसज्ज असे मैदान उपलब्ध करून दिले असून या मैदानावर सूर्योदय परिवाराच्या सहकार्याने आणि मेडशिंगी येथील शिवरत्न क्रीडा टीमच्या मेहनतीने अत्यंत शिस्तबद्ध आणि नेटके नियोजन करण्यात आले आहे.

‘सूर्योदय चषक’ मधील हे सर्व सामने चित्त थरारक आणि क्षणाक्षणाला उत्कंठा वाढवत अत्यंत चूरशीने खेळले जात आहेत. सांगोला तालुक्यातील नावाजलेल्या सुमारे 24 क्रिकेट टीमनी यामध्ये सहभाग घेतलेला असून शिवरत्न मेडशिंगीसह आलेगाव, वाढेगाव, कडलास, चिनके, एखतपुर, शिवणे, बिलेवाडी, खारवटवाडी, जवळा, अकोला, डिकसळ, शिरभावी, अजनाळे, अनकढाळ, सोनंद, हातीद, मांजरी, घेरडीतील दोन तसेच सांगोल्यातील चार संघांनी सूर्योदय चषक मध्ये यशस्वी सहभाग नोंदवलेला आहे. यातील जिव्हाळा एखतपुर, देवा स्पोर्टस सांगोला, शिवसंग्राम कडलास, आदर्श स्पोर्ट्स जवळा, राजनंदिनी दोस्ती सांगोला, राम रहीम सांगोला, न्यू चॅलेंज स्पोर्ट्स हातीद आणि शिवरत्न मेडशिंगी या आठ संघांनी क्वार्टर फायनलला धडक मारली असून यातून विजयी झालेल्या संघांचा सेमी फायनल आणि फायनल ‘महासंग्राम’ आज पहावयास मिळणार आहे. या स्पर्धांसाठी प्रथम क्रमांकाचे बक्षीस रोख रक्कम रुपये एक लाख आणि मानाचा चषक सूर्योदय उद्योग समूह यांच्या वतीने देण्यात येत असून द्वितीय क्रमांकाचे बक्षीस रोख रक्कम रुपये पन्नास हजार आणि चषक मंगळवेढा तालुक्यातील लवंगी येथील कृष्णा पतसंस्थेचे चेअरमन डॉ श्रीनाथ निकम यांच्या वतीने देण्यात येणार आहे.

तृतीय क्रमांकाचे बक्षीस व रक्कम रुपये तीस हजार आणि चषक प्रगती पतसंस्थेचे चेअरमन प्रशांत इंगवले पाटील यांच्या वतीने देण्यात येणार असून चतुर्थ क्रमांकाचे बक्षीस रोख रक्कम रुपये वीस हजार आणि चषक शोभा राणी महिला अर्बन पतसंस्था मेडशिंगी यांच्या वतीने दिले जाणार आहे. इतरही अनेक बक्षिसे विविध बक्षीस दात्यांकडून दिली जात असून मेडशिंगी सारख्या ग्रामीण भागात आकर्षक लाईट व्यवस्था, भव्य स्टेजव्यवस्था, शिस्तबद्ध आणि उत्कृष्ट नियोजनामध्ये अत्यंत देखण्या आणि प्रेक्षणीय स्पर्धा पार पडत असून आज संपन्न होणाऱ्या अंतिम सामन्यांचा मनमुराद आनंद लुटण्यासाठी तालुक्यातील क्रीडाप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थिती दाखवावी असे आवाहन सूर्योदय दूध विभागाचे चेअरमन डॉ बंडोपंत लवटे, सूर्योदय उद्योग समूहाचे सह संस्थापक जगन्नाथ भगत गुरुजी, एल के पी मल्टीस्टेटचे व्हॉ.चेअरमन सुभाष दिघे गुरुजी तसेच मेडशिंगी शिवरत्नचे विश्वास पाटील सर, अशपाक पठाण सर आणि कर्णधार विशाल घाडगे व टीम यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!