कृषी सल्लासामाजिक

प्रत्येक गावात कृषी उद्योजक घडविण्याचा नाविन्यपुर्ण उपक्रम; ग्रामीण युवक-युवतींसाठी व्यवसायाची सुवर्णसंधी : नितीन इंगोले

प्रत्येक गावात कृषी उद्योजक घडविण्याचा नाविन्यपुर्ण उपक्रम; ग्रामीण युवक-युवतींसाठी व्यवसायाची सुवर्णसंधी : नितीन इंगोले

 

सांगोला (प्रतिनिधी (: ग्रामीण भागातील सुशिक्षित युवक-युवतींना गावातच रोजगार व स्वावलंबनाची संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने माणगंगा परिवार व ई-ॲग्री दुकान यांच्या संयुक्त विद्यमाने कृषि उद्योजक निवड अभियान २०२६” राबविण्यात येत असल्याची माहिती माणगंगा परिवाराचे अध्यक्ष नितीन इंगोले यांनी दिली.

या कृषी उद्योजकाविषयी अधिक माहिती देताना माणगंगा परिवाराचे अध्यक्ष नितीन इंगोले पुढे म्हणाले की, जिल्ह्यातील प्रत्येक गावात एक पुरुष व एक महिला अशा दोन ई-ॲग्री (कृषी ) उद्योजकांची निवड करण्यात येणार असून, या माध्यमातून शेतीपूरक व्यवसायाला चालना मिळणार आहे. आधुनिक शेती, कृषी निविष्ठा, तांत्रिक मार्गदर्शन, शेतकरी सल्ला, पीक व्यवस्थापन, कृषी औषधे, बियाणे, खते तसेच डिजिटल कृषी सेवांचा लाभ शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्याचे काम हे उद्योजक करणार आहेत. त्यामुळे गावातील शेतकऱ्यांना दर्जेदार सेवा स्थानिक पातळीवर उपलब्ध होणार असून युवकांनाही स्वतःचा व्यवसाय उभारण्याची संधी मिळणार आहे.या अभियानासाठी कोणत्याही शाखेचा पदवीधर, किंवा शेती क्षेत्रात काम करण्याचा 5 वर्षे अनुभव, वय २६ वर्षांपेक्षा कमी असलेले तसेच प्रभावी संवाद कौशल्य आणि शेतकऱ्यांसोबत काम करण्याची तयारी असलेले युवक-युवती अर्ज करू शकतात.

निवड झालेल्या उद्योजकांना माणगंगा परिवारामार्फत व्यवसाय प्रशिक्षण, आर्थिक सहाय्य, संपूर्ण मार्गदर्शन तसेच व्यवसाय वाढीसाठी सातत्यपूर्ण सहकार्य दिले जाणार आहे.ई-ॲग्री दुकान हे केवळ कृषी उत्पादन विक्री केंद्र नसून आधुनिक शेतीसाठी आवश्यक असलेले मार्गदर्शन, तांत्रिक सेवा, पीक नियोजन, कृषी सल्ला ,ड्रोन पीक फवारणी, उपग्रह आधारित हवामाण अंदाज आणि इतर विश्वासार्ह व्यावसायिक सेवा देणारे केंद्र म्हणून विकसित करण्यात येणार आहे. या माध्यमातून ग्रामीण भागात कृषी क्षेत्रातील नवउद्योजक तयार होऊन रोजगारनिर्मितीला चालना मिळेल, असा विश्वास नितीन इंगोले यांनी व्यक्त केला.या उपक्रमात सहभागी होण्यासाठी इच्छुक युवक-युवतींनी तातडीने अर्ज करून संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहनही नितीन इंगोले यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी श्री. स्वप्नील कुलकर्णी (मो. ७४४८२३३८६४) /श्री पांडुरंग मते (9975745380) यांच्याशी संपर्क साधावा, असेही त्यांनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!