महाराष्ट्र

सूर्योदय अर्बनच्या मोहोळ आणि गादेगाव शाखांचे उद्घाटन उत्साहात संपन्न

जिल्ह्यामध्ये दहा शाखा कार्यरत तर आणखी सात शाखा नियोजित

सूर्योदय अर्बनच्या मोहोळ आणि गादेगाव शाखांचे उद्घाटन उत्साहात संपन्न

जिल्ह्यामध्ये दहा शाखा कार्यरत तर आणखी सात शाखा नियोजित

सांगोला (प्रतिनिधी): उद्योग व्यवसायिक तसेच पशुपालक व शेतकरी यांचा आर्थिक कणा समजली जाणारी आणि अलीकडील काळामध्ये सोनेतारण कर्ज प्रकारामध्ये जास्तीत जास्त मूल्यांकन करून जलद सेवा देणारी आर्थिक संस्था म्हणून सर्वत्र लौकिक असलेल्या सूर्योदय अर्बन महिला को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड सोलापूर या संस्थेच्या दोन नवीन शाखांचे उद्घाटन विविध मान्यवरांच्या उपस्थितीत उत्साहात संपन्न झाले असल्याची माहिती संस्थापक अनिलभाऊ इंगवले यांनी दिली.

पंढरपूर तालुक्यातील गादेगाव येथे संस्थेच्या नवव्या शाखेचे उद्घाटन विविध मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाले. यावेळी राष्ट्रवादी व्यापारी उद्योग प्रदेशाध्यक्ष नागेश पाटील, गव्हर्मेंट कॉन्ट्रॅक्टर उद्धव बागल, सरपंच दत्तात्रय बागल, उद्योजक संजय बागल, शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष समाधान फाटे, पद्माकर बागल, महादेव बागल, पोपट रेडे, सुरेश बागल, शांतिनाथ बागल, शशिकांत बागल, रणजीत बागल, नागेश फाटे यांच्यासह गादेगाव परिसरातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्याचबरोबर मोहोळ शहरात सूर्योदय महिला अर्बनच्या दहाव्या शाखेचे उद्घाटन नुकतेच मोठ्या उत्साहात संपन्न झाले. या कार्यक्रमासाठी मोहोळ पंचायत समितीचे सभापती असलम चौधरी, माजी सभापती यशवंतराव नरोटे, उद्योजक एन आर पाटील, सज्जनराव पवार, पुष्कराज पाटील, किसन जाधव, बाळासाहेब वसेकर, सिताराम भोसले, नामदेव कुचेकर इत्यादी मान्यवरांसह मोहोळ शहर आणि परिसरातून मोठ्या प्रमाणावर गर्दी झालेली होती. यामध्ये महिलांची उपस्थिती देखील लक्षणीय होती.

आर्थिक संस्था चालवण्याचा सुमारे वीस बावीस वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेले आणि सहकाराचा सखोल अभ्यास असलेले अनिलभाऊ इंगवले यांच्या मार्गदर्शनाखाली त्याचबरोबर डॉ बंडोपंत लवटे, जगन्नाथ भगत गुरुजी आणि सुभाष दिघे गुरुजी यांच्या सहकार्याने सूर्योदय महिला अर्बन ही संस्था सोलापूर जिल्ह्यामध्ये गेली आठ नऊ वर्षांपासून उत्कृष्टपणे सेवा देत असून त्वरित सोनेतारण कर्जासाठी ग्राहकांमध्ये विशेष लोकप्रिय आहे. यावेळी संस्थेची वाटचाल, ठेवी, विविध प्रकारची कर्जे, सोने तारण कर्ज तसेच संस्थेला यावर्षी झालेल्या नफा आणि संस्थेचा एकूण व्यवसाय याबद्दल सविस्तर माहिती अनिलभाऊ इंगवले यांनी आपल्या प्रास्ताविकामध्ये सांगितली. पतसंस्था चालवताना मोठमोठी आव्हाने समोर येत असतानाही सूर्योदय महिला अर्बन ची शाखा आमच्या भागात सुरू करून इथल्या व्यवसायिकांना, पशुपालकांना, शेतकऱ्यांना तसेच सर्व प्रकारच्या ग्राहकांना आपण एक मोठ्या न्याय दिला असून या भागातील अर्थकारणाला यामुळे मोठी चालना मिळणार असल्यामुळे सूर्योदय ग्रुपचे आम्ही विशेष कौतुक करतो. या संस्थेच्या पुढील वाटचालीसाठी आमचे कायम सहकार्य राहील अशा भावना या उद्घाटन प्रसंगी बोलताना विविध मान्यवरांनी व्यक्त केल्या.

मंगळवेढा, सांगोला शहर त्याचबरोबर तालुक्यामध्ये मेडशिंगी, सोनंद, शिरभावी, पंढरपूर तालुक्यांमध्ये रांजणी तसेच मोहोळ तालुक्यातील टाकळी सिकंदर इत्यादी ठिकाणी या संस्थेच्या शाखा उत्कृष्टपणे सेवा देत असून नजीकच्या कालावधीमध्ये जूळे सोलापूर, पुणे नाका सोलापूर, पंढरपूर, सलगर, घेरडी, कोळा आणि मंद्रूप इत्यादी ठिकाणी शाखा उभारणी सुरू असल्याची माहितीही यावेळी संस्थेच्या चेअरमन सौ अर्चना इंगवले यांनी दिली. सर्व शाखांमध्ये कार्यतत्पर आणि सेवाभावी कर्मचारी वृंद, सर्व प्रकारच्या बँकिंग सुविधा आणि सेफ लॉकर्सची उपलब्धता ही या संस्थेची विशेष ओळख आहे. सदर शाखांचे उद्घाटन यशस्वी करण्यासाठी संस्थेतील सर्व कर्मचारी वृंदांनी अथक परिश्रम घेतले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!