सांगोल्यात ४२ हजार नागरिकांची रेशन कार्डशी आधार जोडणी रखडली
२३ हजार ६४८ शिधापत्रिका धारकांचा रेशन कार्डला मोबाईल नंबर लिंक नाही

सांगोल्यात ४२ हजार नागरिकांची रेशन कार्डशी आधार जोडणी रखडली
२३ हजार ६४८ शिधापत्रिका धारकांचा रेशन कार्डला मोबाईल नंबर लिंक नाही
सांगोला (प्रतिनिधी): कोणतेही कुटुंब अन्नधान्यापासून वंचित राहू नये यासाठी शासनाकडून स्वस्त धान्य दुकानातून रेशनचे वितरण केले जाते. मात्र, नवीन नियमानुसार रेशन कार्डशी आधार क्रमांक जोडणे आवश्यक आहे. त्यानुसार सांगोला तालुक्यातील ८ हजार ०२७ शिधापत्रिकांवरील ४२ हजार ३५० जणांनी आपले आधार रेशन कार्डशी जोडलेले नाही. त्यामुळे तातडीने आधार क्रमांक रेशन कार्डशी जोडण्याचे आवाहन तहसील प्रशासनाने केले आहे.
गोरगरीब नागरिकांना अन्नधान्य उपलब्ध व्हावे, यासाठी राज्य शासनाच्या वतीने सार्वजनिक वितरण प्रणालीच्या माध्यमातून लाभार्थ्यांना अल्प दरात धान्य पुरवठा केला जातो. यासाठी प्रत्येक लाभार्थ्याच्या रेशन कार्डाला आधार क्रमांक लिंक करणे बंधनकारक आहे. मागील दोन वर्षांपासून तहसील प्रशासनाच्या पुरवठा विभागाकडून ही मोहीम सुरू करण्यात आली आहे.
सांगोला तालुक्यात अंत्योदय योजनेचे २ हजार ९९१ शिधापत्रिकाधारक असून १२ हजार ३३४ युनिट आहेत. अंत्योदय योजनेतील शंभर टक्के लोकांनी रेशनकार्डला आधार क्रमांक लिंक केला आहे. प्राधान्य कुटुंब म्हणजेच पात्र केशरी शिधापत्रिकाधारक योजनेचे ४१ हजार ०९० शिधापत्रिका धारक असून १ लाख ६६ हजार १४४ युनिट आहेत. प्राधान्य कुटुंब म्हणजेच पात्र केशरी शिधापत्रिकाधारक योजनेतील शंभर टक्के लोकांनी रेशनकार्डला आधार क्रमांक लिंक केला आहे. २५ हजार ८२९ अपात्र केशरी शिधापत्रिका धारक असून १ लाख ०१ हजार २६४ युनिट आहेत. त्यापैकी २० हजार ६८५ अपात्र केशरी शिधापत्रिकावरील ७० हजार २९१ लोकांनी रेशनकार्डला आधार क्रमांक लिंक केला आहे. तर ५ हजार १४४ अपात्र केशरी शिधापत्रिकावरील ३० हजार ९७३ लोकांनी रेशन कार्डला आधार क्रमांक लिंक केला नाही. तालुक्यात ६ हजार ८१६ शुभ्र शिधापत्रिकाधारक असून २३ हजार ७१५ युनिट आहेत. त्यापैकी ३ हजार ९३५ अपात्र केशरी शिधापत्रिकावरील १२ हजार ३३८ लोकांनी रेशनकार्डला आधार क्रमांक लिंक केला आहे. तर २ हजार ८८१ शुभ्र रेशनकार्ड वरील ११ हजार ३७७ लोकांनी रेशनकार्डला आधार क्रमांक लिंक केला नाही. सांगोला तालुक्यातील प्राधान्य कुटुंब म्हणजेच अपात्र केशरी शिधापत्रिका धारक आणि शुभ्र शिधापत्रिकाधारकच्या ४२ हजार ३५० सदस्यांची आधार जोडणी रखडलेली आहे. तातडीने आधार जोडणी करण्याचे आवाहन आहे.
रेशनच्या धान्याचा काळाबाजार रोखण्यासाठी पुरवठा विभागाने चोख उपाययोजना करण्यासाठी रेशन कार्डला मोबाईल नंबर लिंक करण्याच्या सूचना शिधापत्रिका धारकांना दिले आहेत. रेशन दुकानांवर धान्य आल्याचा व दुकानावरून धान्य घेतल्याचा मेसेज संबंधित लाभार्थ्याच्या मोबाइलवर येणार आहे. त्यासाठी रेशन दुकानात आधारकार्ड आणि मोबाइल क्रमांकाची नोंदणी करणे आवश्यक आहे. सोबतच रेशन दुकानांमध्ये बायोमेट्रिक यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली असून, कोणत्या गोदामातून रेशन दुकानात किती धान्य पाठविले, तसेच दुकानातून किती आणि कधी धान्य उचलले, याची माहिती रेशनकार्ड धारकांच्या मोबाइलवर एसएमएसने देण्यात येणार आहे.
सांगोला तालुक्यातील २ हजार ९९१ अंत्योदय शिधापत्रिका धारकांपैकी २ हजार २४३ शिधापत्रका धारकांनी रेशन कार्डला मोबाईल नंबर लिंक केला आहे. ४१ हजार ०९० प्राधान्य कुटुंब म्हणजेच पात्र केशरी शिधापत्रिकाधारकांपैकी ३३ हजार ४२९ शिधापत्रिका धारकांनी रेशन कार्डला मोबाईल नंबर लिंक केला आहे. २५ हजार ८२९ अपात्र केशरी शिधापत्रिका धारकांपैकी १५ हजार ३९९ शिधापत्रिका धारकांनी रेशन कार्डला मोबाईल नंबर लिंक केला आहे. ६ हजार ८१६ शुभ्र शिधापत्रिका धारकांपैकी २ हजार ००९ शिधापत्रिका धारकांनी रेशनकार्डला मोबाईल नंबर लिंक केला आहे. एकूणच सांगोला तालुक्यातील ७६ हजार ७२८ शिधापत्रिका धारकांपैकी ५३ हजार ०८० शिधापत्रिका धारकांनी रेशन कार्डला मोबाईल नंबर लिंक केला आहे. तर २३ हजार ६४८ शिधापत्रिका धारकांनी रेशन कार्डला मोबाईल नंबर लिंक केला नाही.



