सोलापूर महानगरपालिकेसह १७ नगरपरिषदांना ४२ कोटी ४५ लाखांचा निधी
सांगोला नगरपालिकेला १ कोटी ८४ लाख १० हजार ९५३ रुपयांचा निधी मंजूर

सोलापूर महानगरपालिकेसह १७ नगरपरिषदांना ४२ कोटी ४५ लाखांचा निधी
सांगोला नगरपालिकेला १ कोटी ८४ लाख १० हजार ९५३ रुपयांचा निधी मंजूर
सांगोला (प्रतिनिधी): १५ व्या केंद्रीय वित्त आयोगाच्या शिफारशीनुसार सन २०२४-२०२५ वर्षातील अबंधनकारक अनुदानाचा दुसरा हप्ता तसेच १५ व्या केंद्रीय वित्त आयोगाच्या शिफारशीनुसार सन २०२४-२०२५ वर्षातील पिण्याचे पाणी (पावसाच्या पाण्याची साठवण व पुर्नवापरासह) व घनकचरा व्यवस्थापनसाठी बंधनकारक अनुदानाचा दुसरा हप्ता वितरीत करण्याचे आदेश राज्याच्या नगरविकास विभागाने दिले आहेत. त्यानुसार सोलापूर महानगरपालिका आणि जिल्ह्यातील १७ नगरपरिषद , नगरपंचायतीना २२ कोटी १८ लाख ३४ हजार ०२७ आणि १४ कोटी ७६ लाख ८९ हजार ३५१ रुपये असा ३६ कोटी ९५ लाख २३ हजार ३७८ रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे. तसेच एक टक्का मुद्रांक शुल्कापोटी जमा होणाऱ्या रकमा वितरीत करण्यात येणार असून जिल्ह्यातील १७ नगरपरिषदांना मिळून ५ कोटी ४९ लाख ८० हजार ५२४ रुपये निधी मिळणे अपेक्षित आहे. मात्र, नागरी पायाभूत सुविधा विकास निधी योजनेंतर्गत बार्शी नगरपालिकेची ४६ लाख ६६ हजार ७९४ रुपये व्याजाची रक्कम वजा करून उर्वरित ५ कोटी ३ लाख १३ हजार ७३० रुपयांचा निधी उपलब्ध होणार आहे.
१५ व्या वित्त आयोगाच्या शिफारशीनुसार केंद्र शासनाकडून २०२४-२०२५ वर्षाच्या अबंधनकारक अनुदानाचा दुसरा हप्ता स्थानिक स्वराज्य संस्थांना वितरीत करण्यास मान्यता देण्यात आली आहे. २०२१-२२ ते २०२५ २६ या वर्षासाठी १५ वा वित्त आयोग गठीत झाला असून १३ मार्च २०२६ च्या आदेशान्वये १५ व्या वित्त आयोगाअंतर्गत नागरी स्थानिक स्वराज्य संस्थाकरीता सन २०२४-२५ या वर्षाच्या अबंधनकारक अनुदानाचा दुसरा हप्ता प्राप्त झाला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांना लोकसंख्या व क्षेत्रफळ या निकषा आधारे सोबतच्या परिशिष्टात दर्शविल्याप्रमाणे वितरीत करण्यास मान्यता देण्यात आली आहे.
१५ व्या केंद्रीय वित्त आयोगाच्या शिफारशीनुसार २९२४-२५ वर्षातील पिण्याचे पाणी (पावसाच्या पाण्याची साठवण व पुर्नवापरासह) व घनकचरा व्यवस्थापन अनुदानाचा दुसरा हप्ता पुढील नगरपरिषदांना वितरीत करण्याचा आदेश देण्यात आला आहे. बार्शी नगरपरिषद १ कोटी ७० लाख ३७ हजार ११९, अक्कलकोट नगरपरिषद ५४ लाख ६३ हजार २९५, अकलूज नगरपरिषद ६५ लाख ९८ हजार ७४५, पंढरपूर नगरपरिषद १ कोटी ३७ लाख १४ हजार ०३०, दुधनी नगरपरिषद १५ लाख ३९ हजार ७७४, करमाळा नगरपरिषद ३२ लाख ४१ हजार ७७३, कुर्डूवाडी नगरपरिषद ३२ लाख ०९ हजार ३५६, मैंदर्गी नगरपरिषद १७ लाख ०५ हजार ७४३, मंगळवेढा नगरपरिषद २९ लाख ३० हजार ०७३, सांगोले नगरपरिषद ७० लाख ९८ हजार ७१२, सोलापूर महानगरपालिका १३ कोटी २३ लाख ७७ हजार ८५०, अनगर नगरपंचायत ४० लाख २२ हजार ६४६, माढा नगरपंचायत २४ लाख ८९ हजार ३४३, महाळुंग श्रीपूर नगरपंचायत ४० लाख ३२ हजार ३५१, माळशिरस नगरपंचायत ४२ लाख २१ हजार ८१६, मोहोळ नगरपरिषद ५४ लाख ३४ हजार १२०, नातेपुते नगरपंचायत ३४ लाख १० हजार ३४५, वैराग नगरपंचायत ३३ लाख ०६ हजार ९३६ असा २२ कोटी १८ लाख ३४ हजार ०२७ इतका निधी उपलब्ध झाला आहे.
१५ व्या केंद्रीय वित्त आयोगाच्या शिफारशीनुसार पुढील नगरपरिषदांना अनुदानाचा दुसरा हप्ता वितरीत करण्यात आला आहे. बार्शी नगरपरिषद १ कोटी १३ लाख ५८ हजार ०८०, अक्कलकोट नगरपरिषद ३६ लाख ४२ हजार १९७, अकलूज नगरपरिषद ४३ लाख ९९ हजार १६३, पंढरपूर नगरपरिषद ९१ लाख ४२ हजार ६८६, दुधनी नगरपरिषद १० लाख २६ हजार ५१६, करमाळा नगरपरिषद २१ लाख ६१ हजार १८२, कुर्डूवाडी नगरपरिषद २१ लाख ३९ हजार ५७१, मैंदर्गी नगरपरिषद, ११ लाख ३७ हजार १६२, मंगळवेढा नगरपरिषद, १९ लाख ५३ हजार ३८२, सांगोले नगरपरिषद ४७ लाख ३२ हजार ४७५, सोलापूर महानगरपालिका ८ कोटी ८२ लाख ५१ हजार ९००, अनगर नगरपंचायत २६ लाख ८१ हजार ७६४, माढा नगरपंचायत १६ लाख ५९ हजार ५६२, महाळुंग श्रीपूर नगरपंचायत २६ लाख ८८ हजार २३४, माळशिरस नगरपंचायत २८ लाख १४ हजार ५४४, मोहोळ नगरपरिषद ३६ लाख २२ हजार ७४६, नातेपुते नगरपंचायत २२ लाख ७३ हजार ५६३, वैराग नगरपंचायत २२ लाख ०४ हजार ६२४ असा मिळून १४ कोटी ७६ लाख ८९ हजार ३५१ रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे.
महाराष्ट्र नगरपरिषदा व औद्योगिक नगरी अधिनियम १९६५ चे कलम १४७-क (१) अन्वये नगरपालिका क्षेत्रात मालमत्तेच्या विक्रीच्या किंवा दानाच्या बाबतीत त्या लेखाद्वारे प्रतिभूत केलेल्या रकमेवर १ टक्के अधिभार शुल्क आकारले जाते. यातील पोटकलम (३) अन्वये असा अधिभार म्हणून वसूल करण्यात आलेल्या अतिरिक्त शुल्काच्या रकमेएवढी रक्कम सहायक अनुदान म्हणून संबंधीत नगरपरिषदांना वितरीत करण्याची तरतूद आहे.
सन २०१४-१५ ते सन २०२४-२५ या वित्तीय वर्षासाठी नगरपरिषद, नगरपंचायतींना थकबाकीपोटी देय असलेली सहाय्यक अनुदानाची रक्कम वितरित करण्यास मंजूरी देण्यात आली आहे. अक्कलकोट ८ लाख ८१ हजार ८४७, मैंदर्गी ६६ हजार ७९६, दुधनी १ लाख ३१ हजार ५३८, बार्शी १ कोटी ७६ लाख ८६ हजार ३४८, करमाळा, १३ लाख ९१ हजार ५८३, कुर्डूवाडी ६ लाख ७१ हजार ३१८, मंगळवेढा १२ लाख ४२ हजार ८१२, पंढरपूर १ कोटी २६ लाख ०२ हजार ०१६, सांगोला ६५ लाख ७९ हजार ७६६, मोहोळ ४१ लाख ९९ हजार ३३८, माळशिरस १० लाख ३३ हजार ६६१, माढा १३ लाख ७३ हजार १२८, अकलूज ४३ लाख १६ हजार ८७२, नातेपुते १० लाख ०२ हजार ५६२, महाळुंग ५ लाख ६३ हजार ८३६, वैराग १० लाख १२ हजार २९४, अनगर २ लाख २४ हजार ८०९ असा एकूण ५ कोटी ४९ लाख ८० हजार ५२४ निधी मंजूर झाला आहे.



