शैक्षणिक

सांगोला तालुक्याचा बारावीचा निकाल ९२.५६ टक्के 

सांगोला तालुक्याचा बारावीचा निकाल ९२.५६ टक्के 

४३८६ पैकी ४०६० विद्यार्थी उत्तीर्ण, ७० विद्यार्थी गैरहजर, ३२६ विद्यार्थी अनुत्तीर्ण

सांगोला (तालुका प्रतिनिधी): माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळ पुणे यांच्या मार्फत फेब्रुवारी २०२६ मध्ये घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल शनिवार २ मे रोजी दु.१ च्या सुमारास ऑनलाईन जाहीर करण्यात आला. या परीक्षेसाठी तालुक्यातून ३२ कनिष्ठ महाविद्यालयातील ४ हजार ३८६ पैकी ४ हजार ०६० विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. तर तालुक्याचा निकाल ९२.५६ टक्के लागला आहे.


सांगोला शहर व तालुक्यातील शाळांचा बारावी परीक्षेचा निकाल पुढीलप्रमाणे, सांगोला विद्यामंदिर ज्यु.कॉलेज शास्त्र शाखा ४५३ पैकी ४४४ उत्तीर्ण (९८.०१ टक्के), कला शाखा १०९ पैकी १०२ उत्तीर्ण (९३.५७ टक्के), वाणिज्य शाखा ११८ पैकी ११७ उत्तीर्ण (९९.१५ टक्के), कै. वत्सलादेवी देसाई विद्यालय आणि कै.आण्णासाहेब घुले ज्यु.कॉलेज जवळे शास्त्र शाखा २०७ पैकी १९७ उत्तीर्ण (९५.१६ टक्के), कला शाखा १२४ पैकी ६२ उत्तीर्ण (५० टक्के), वाणिज्य ४१ पैकी ३५ उत्तीर्ण (८५.३६ टक्के), न्यू.इंग्लिश स्कूल ज्यु.कॉलेज सांगोला, शास्त्र शाखा ५१६ पैकी ४७६ उत्तीर्ण (९२.२४ टक्के), कला शाखा २०६ पैकी १४६ उत्तीर्ण (७०.८७ टक्के), श्रीधर कन्या प्रशाला नाझरे कला शाखा ३५ पैकी ३२ उत्तीर्ण (९१.४२ टक्के), वाणिज्य शाखा ३ पैकी २ (६६.६६ टक्के), श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल ज्यु.कॉलेज वाटंबरे कला शाखा ३९ पैकी ३६ उत्तीर्ण (९२.३० टक्के), मेडशिंगी विद्यालय व ज्यु. कॉलेज मेडशिंगी कला शाखा २७ पैकी २४ उत्तीर्ण (८८.८८ टक्के), कै.सरदार शामराव लिगाडे विद्यालय व ज्यु कॉलेज अकोला (वा) विज्ञान शाखा ५९ पैकी ५८ उत्तीर्ण (९८.३० टक्के), सोनंद हायस्कूल ज्यु.कॉलेज सोनंद, कला शाखा १९ पैकी ११ उत्तीर्ण (५७.८९ टक्के), श्री शिवाजी विद्यालय ज्यु. कॉलेज महूद बु.शास्त्र शाखा ९९ पैकी ९३ उत्तीर्ण (९३.९३ टक्के), कला शाखा ६१ पैकी ४५ उत्तीर्ण (७३.७७ टक्के), कोळा विद्यामंदिर ज्यु. कॉलेज कोळा शास्त्र शाखा ८४ पैकी ८१ उत्तीर्ण (९६.४२ टक्के), कला शाखा ५४ पैकी ५३ उत्तीर्ण (९८.१४ टक्के), सवित्रीबाई फुले प्रशाला ज्यु. कॉलेज सोनंद शास्त्र शाखा ६१ पैकी ५८ उत्तीर्ण (९५.०८ टक्के), कला शाखा २४ पैकी १२ उत्तीर्ण (५० टक्के), नाझरा विद्यामंदिर ज्यु.कॉलेज नाझरे कला शाखा २८ पैकी २७ उत्तीर्ण (९६.४२ टक्के), वाणिज्य २४ पैकी २२ उत्तीर्ण (९१.६६ टक्के), शिवणे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय शिवणे शास्त्र शाखा १२० पैकी ११८ उत्तीर्ण (९८.३३ टक्के), कला शाखा ३७ पैकी ३२ उत्तीर्ण (८६.४८ टक्के), श्रीराम विद्यालय ज्यु.कॉलेज हातीद कला शाखा ३८ पैकी ३८ उत्तीर्ण (१०० टक्के), कै.अभिजीत कदम विद्यालय ज्यु.कॉलेज मेथवडे कला शाखा ३० पैकी २७ उत्तीर्ण (९० टक्के), मॉडर्न हायस्कूल व ज्यु. कॉलेज घेरडी कला शाखा ३२ पैकी १७ उत्तीर्ण (५३.१२ टक्के), वाढेगांव प्रशाला व ज्यु.कॉलेज वाढेगांव कला शाखा ३४ पैकी ३० उत्तीर्ण (८८.२३ टक्के), कै.पांडूरंग आबा भांबुरे ज्यु.कॉलेज आलेगांव शास्त्र शाखा ६२ पैकी ६१ उत्तीर्ण (९८.३८ टक्के), कला शाखा २२ पैकी २० उत्तीर्ण (९०.९० टक्के), विकास विद्यालय ज्यु.कॉलेज अजनाळे शास्त्र शाखा ४० पैकी ४० उत्तीर्ण (१०० टक्के), कला २७ पैकी २२ उत्तीर्ण (८१.४८ टक्के), हलदहिवडी विद्यालय व ज्यु.कॉलेज कला शाखा ३० पैकी २९ उत्तीर्ण (९६.६६ टक्के), न्यू. इंग्लिश स्कूल ज्यु.कॉलेज पाचेगांव बु कला शाखा ६० पैकी ५६ उत्तीर्ण (९३.३३ टक्के), जुनोनी विद्यालय ज्यु.कॉलेज जुनोनी कला शाखा ४७ पैकी ४६ उत्तीर्ण (९७.८७ टक्के), विद्यामंदिर व उच्च माध्यमिक हायस्कूल वाकी-शिवणे शास्त्र शाखा ३१४ पैकी ३१३ उत्तीर्ण (९९.६८ टक्के), विद्यानिकेतन हायस्कूल व ज्यु.कॉलेज गौडवाडी शास्त्र शाखा ७३ पैकी ७३ उत्तीर्ण (१०० टक्के), कला शाखा २४ पैकी २३ उत्तीर्ण (९५.८३ टक्के), बाळासाहेब देसाई विद्यालय व ज्यु. कॉलेज शास्त्र शाखा ८७ पैकी ८७ उत्तीर्ण (१०० टक्के), कला शाखा ४ पैकी ३ उत्तीर्ण (७५ टक्के), विद्यामंदिर हायस्कूल व उच्च माध्यमिक विद्यालय एखतपूर शास्त्र शाखा ५९ पैकी ५८ उत्तीर्ण (९८.३० टक्के), दिपक साळुंखे-पाटील शास्त्र कॉलेज जुनोनी शास्त्र शाखा ५३७ पैकी ५२५ उत्तीर्ण (९७.७६ टक्के), श्री गुरुकुल विद्यापीठ राजुरी शास्त्र शाखा ३६ पैकी ३६ उत्तीर्ण (१०० टक्के), लक्ष्मीदेवी प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यामंदिर सोनंद शास्त्र शाखा ७८ पैकी ७७ उत्तीर्ण (९८.७१ टक्के), फोनिक्स ज्युनिअर कॉलेज शास्त्र शाखा १२७ पैकी १२५ उत्तीर्ण (९८.४२ टक्के), कला शाखा ५ पैकी ५ उत्तीर्ण (१०० टक्के), फॅबटेक पब्लिक स्कूल ज्यू.कॉलेज सांगोला शास्त्र शाखा २९ पैकी २८ उत्तीर्ण (९६.६५ टक्के), न्यू.इंग्लिश स्कूल ज्यु.कॉलेज सांगोला किमान कौशल्य विभाग ४३ पैकी ३८ उत्तीर्ण (८८.३७ टक्के) अशा ३२ कनिष्ठ महाविद्यालयातून ४ हजार ३८६ पैकी ४ हजार ०६० विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून तालुक्याचा निकाल  ९२.५६ टक्के लागला आहे. विशेष प्राविण्य ३९९, प्रथम श्रेणीत १११६, द्वितीय श्रेणीत १९९३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!