स्वामी ब्रह्मचैतन्यजी यांच्या हस्ते समृद्धी कलेक्शन या रेडीमेड कापड दुकानाचा थाटात शुभारंभ

स्वामी ब्रह्मचैतन्यजी यांच्या हस्ते समृद्धी कलेक्शन या रेडीमेड कापड दुकानाचा थाटात शुभारंभ
सांगोला (प्रतिनिधी): ग्राहकांच्या फॅशनविषयक गरजा लक्षात घेऊन दर्जेदार व ट्रेंडी कपड्यांचा नवा पर्याय उपलब्ध करून देणाऱ्या कृष्णाई परिवाराच्या ‘समृद्धी कलेक्शन’ या रेडीमेड कापड दुकानाचा शुभारंभ दि आर्ट ऑफ लिव्हिंगचे प्रणेते परमपूज्य श्री श्री श्री रविशंकरजी (गुरुजी) यांचे परमशिष्य स्वामी ब्रह्मचैतन्यजी यांच्या करण्यात आले. शहरात ग्राहकांसाठी दर्जेदार व फॅशनेबल कपड्यांचा नवा पर्याय उपलब्ध करून देणाऱ्या “समृद्धी कलेक्शन” या रेडीमेड कापड दुकानाचा शुभारंभ उत्साहात पार पडला.
सांगोला शहरातील कचेरी रोडवरील समृद्धी कलेक्शनमध्ये पुरुष, महिला तसेच लहान मुलांसाठी आधुनिक व पारंपरिक अशा विविध प्रकारच्या रेडीमेड कपड्यांची आकर्षक श्रेणी उपलब्ध आहे. वाजवी दरात दर्जेदार कपडे उपलब्ध करून देण्यावर विशेष भर देण्यात आला असून ग्राहकांना एकाच ठिकाणी सर्व प्रकारचे पर्याय मिळणार आहेत.

शुभारंभप्रसंगी उपस्थित मान्यवरांनी या उपक्रमाचे कौतुक करत कृष्णाई परिवाराच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. या दुकानामुळे परिसरातील ग्राहकांना मोठ्या शहरात जाण्याची गरज भासणार नसून स्थानिक पातळीवरच उत्तम खरेदीचा अनुभव मिळणार असल्याचे मत व्यक्त करण्यात आले. समृद्धी कलेक्शनच्या माध्यमातून ग्राहकसेवेला प्राधान्य देत नवनवीन डिझाईन्स, दर्जा आणि विश्वासार्हता जपण्याचा संकल्प कृष्णाई परिवाराने व्यक्त केला.
सांगोला शहरातील कचेरी रोडवर कृष्णाई परिवाराच्या समृद्धी कलेक्शन या फर्मचे उद्घाटन दि आर्ट ऑफ लिव्हिंगचे प्रणेते परमपूज्य श्री श्री श्री रविशंकरजी (गुरुजी) यांचे परमशिष्य स्वामी ब्रह्मचैतन्यजी यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रम प्रसंगी कृष्णाई अर्बन बँकेचे संस्थापक साहेबराव पोळ, सहसंस्थापक नितीनजी खटकाळे, नंदकुमार बाबर सर, पांडुरंग (भाऊ) बाबर, समाधान खटकाळे, गंगाई दूध डेअरीचे चेअरमन अरुण सुरवसे, राजुभाऊ जालगिरे, माणगंगा डेअरीचे सर्वेसर्वा सचिनभाऊ इंगोले, अर्जुन पुजारी, पत्रकार हमीद इनामदार, श्रीजी ज्वेलर्सचे सुनील केदार, पत्रकार दिलीप घुले, कृष्णाई परिवाराचे व्यवस्थापक सचिन अनुसे, सहव्यवस्थापक करण इंगोले, धनंजय गायकवाड, विनोद बुंजकर, संतोष घाडगे, जिजाऊ अर्बनचे संस्थापक अध्यक्ष दीपक पाटील, सोमनाथ शिंदे, सुनील बाबर, नितीन बाबर, महेश बाबर, सिद्धनाथ प्रिंटिंग प्रेसचे बाळासाहेब बाबर, राम बाबर, अमोल गायकवाड सर, संग्राम शिंदे, महेश लोकरे, पाटबंधारे विभागाचे तुषार यादव, गुंडोजी नाईक, शिवाजी बाबर सर, अजय बाबर सर, स्वप्निल बाबर, सुशांत बाबर, सोमनाथ क्षीरसागर, भाऊसाहेब पवार सर, अनिल पाटील, सयाजी घाडगे, अनिल बाबर, तालुका शिक्षक शंकरराव खटकाळे, बंडू म्हमाणे, राम कुलकर्णी, गौरी कुलकर्णी, राधिका कुलकर्णी, जनकल्याण मेडिकलचे सिद्धनाथ हजारे, बिल्डर प्रवीण पाटील, जिल्हा परिषदेचे अधिकारी राहुल घाडगे, इंजी.नवनाथ इंगोले, ॲड.दत्तात्रय माने, अमोल माने, संतोष बाबर, संभाजी जाधव, सौदागर दिघे, संभाजी चव्हाण, महादेव इंगोले, अनिल पाटील मेजर, कुमार पोळ, विठ्ठल पोळ, वैष्णवी अर्बनचे चेअरमन धनंजय शिंदे, भक्ती मेडिकलचे अनिल फाळके, नगरपालिकेचे सहाय्यक अभियंता मोईन इनामदार, गुरुप्रसाद चिलिंग सेंटरचे गोरख लेंडवे पाटील यांच्यासह महिलासंह अनेकांनी उपस्थित राहून कृष्णाई परिवाराच्या समृद्धी कलेक्शन या रेडीमेड कापड दुकानाच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.



