सामाजिक

उद्योजक अनिलभाऊ इंगवले यांचे वाढदिवसानिमित्त रक्तदान सप्ताहाचे आयोजन

दोन राज्यांमधील विविध शाखांवरती शेकडो रक्तदात्यांचा उत्स्फूर्त सहभाग

उद्योजक अनिलभाऊ इंगवले यांचे वाढदिवसानिमित्त रक्तदान सप्ताहाचे आयोजन

दोन राज्यांमधील विविध शाखांवरती शेकडो रक्तदात्यांचा उत्स्फूर्त सहभाग

सांगोला (प्रतिनिधी): सूर्योदय उद्योग समूहाच्या माध्यमातून महाराष्ट्र आणि कर्नाटक अशा दोन राज्यांमधील शेकडो तरुणांच्या हाताला काम उपलब्ध करून देणारे आणि एल के पी मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी तसेच सूर्योदय अर्बन या संस्थांच्या माध्यमातून अनेक शेतकरी, नोकरदार आणि व्यवसायिकांना मदतीचा हात देणारे उद्योजक अनिलभाऊ इंगवले यांचा वाढदिवस 11 जून रोजी विविध उपक्रमांनी संपन्न होत असून वाढदिवसाचे विशेष औचित्य साधून यावर्षी भव्य अशा रक्तदान सप्ताहाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती सूर्योदय दूध विभागाचे चेअरमन डॉ बंडोपंत लवटे यांनी दिली.

सूर्योदय ग्रुपच्या माध्यमातून अत्याधुनिक खरेदी दालन असलेले सूर्योदय मॉल त्याचबरोबर सूर्योदय दूध विभाग आणि सर्व दूर पसरलेल्या विविध प्रकारच्या वित्तीय संस्था या माध्यमातून यशस्वीपणे औद्योगिक वाटचाल सुरू असून ज्या समाजाच्या आणि ग्राहकांच्या आशीर्वादावर औद्योगिक यश मिळत असताना त्या समाजाप्रती ऋणनिर्देश म्हणून व्यापक स्वरूपात सामाजिक बांधिलकी सातत्याने सूर्योदय परिवाराने जपलेली आहे. अनेकविध प्रकारचे सामाजिक उपक्रम सुरुवातीपासून सुरू असून सूर्योदय ग्रुप मधील सर्व संस्थांचे संस्थापक असलेले, सूर्योदय परिवाराचे कुटुंबप्रमुख आणि एल के पी मल्टीस्टेटचे चेअरमन अनिलभाऊ इंगवले यांच्या वाढदिवसानिमित्त अनेक वर्षांपासून दरवर्षी व्यापक स्वरूपात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येते. सप्ताहाच्या सुरुवातीलाच 6 जून रोजी सांगोला शहरांमध्ये रक्तदान शिबिर संपन्न झाले असून त्यामध्ये 110 रक्तदात्यांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान केले.

रविवार दिनांक 7 जून रोजी डफळापूर क्लस्टर आणि अथणी शाखेच्या वतीने कर्नाटकातील जंबगी येथे रक्तदान शिबिर संपन्न झाले असून तिथेही सुमारे 101 रक्तदात्यांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान केले. सोलापूर शहरातील विजापूर रोड परिसरामधील कुबेर चेंबर या ठिकाणी देखील व्यापक स्वरूपात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले असून सूर्योदय अर्बन आणि एलकेपी मल्टीस्टेटच्या विविध शाखा पातळीवर रक्तदान सप्ताह उत्साहात संपन्न होत आहे. रक्तदान हे गरजू व्यक्तींसाठी जीवनदान असून 21 व्या शतकामध्ये देखील प्रगतीचा एक एक टप्पा गाठणाऱ्या मानव जातीला अद्याप पर्यंत कृत्रिम रक्त मात्र तयार करता आले नाही. केवळ अशा प्रकारच्या शिबिरांमधूनच ते उपलब्ध होते. हा फक्त राष्ट्रीय कार्याचा भाग नसून सबंध मानव जातीसाठी केलेले पवित्र कार्य आहे.

एखाद्या उद्योजकाच्या वाढदिवसानिमित्त अनेक ठिकाणी व्यापक स्वरूपात रक्तदान शिबिरांच्या सप्ताहाचे आयोजन हे बहुदा प्रथमच घडत असावे. या शिबिरांचे डॉ सोमेश यावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली रेवनिल ब्लड बँक ग्रुपने उत्तम नियोजन केले. ठीक ठिकाणी संपन्न होणाऱ्या रक्तदान शिबिरासाठी रक्तदात्यांनी उत्स्फूर्त सहभाग घ्यावा असे आवाहन यावेळी सूर्योदय उद्योग समूहाचे सहसंस्थापक जगन्नाथ भगत गुरुजी आणि एल के पी मल्टीस्टेटचे व्हा. चेअरमन सुभाष दिघे गुरुजी यांनी केले आहे. दिनांक अकरा रोजी सांगोला शहरातील सूर्योदय बँक्वेट हॉल येथे वाढदिवसानिमित्त अनिलभाऊ इंगवले यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!