शैक्षणिक

सह्याद्री फार्मसीमध्ये लाइव्ह म्युझिकल बॅण्ड शोमुळे निरोप समारंभ जल्लोषात साजरा

सह्याद्री फार्मसीमध्ये लाइव्ह म्युझिकल बॅण्ड शोमुळे निरोप समारंभ जल्लोषात साजरा

सांगोला (प्रतिनिधी): सह्याद्री कॉलेज ऑफ फार्मसी, मेथवडे महाविद्यालयात ४ जुन २०२६ रोजी अंतिम वर्ष बी.फार्मसी व एम.फार्मसीच्या विद्यार्थ्यांच्या निरोप समारंभानिमित्त सुप्रसिद्ध गायक व सावर द बँडचे मंदार जोशी यांचा गायनाचा व म्युझिकल बॅण्डचा लाइव्ह शोचे आयोजन करण्यात आले होते. त्यास विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभून निरोप समारंभ जल्लोषात साजरा झाल्याची माहिती संस्था विश्वस्त विश्वजीत दिलीपकुमार इंगवले यांनी दिली.
या निरोपसमारंभ कार्यक्रमाचे उदघाटन प्रमुख पाहुणे संस्थेच्या अध्यक्षा अनिता दिलीपकुमार इंगवले, संस्था सचिवा सुवर्णा दिलीपकुमार इंगवले, संस्था विश्वस्त विश्वजीत दिलीपकुमार इंगवले, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.मनोजकुमार पाटील, डॉ.एस.एम.मोरे यांच्या हस्ते सरस्वतीमातेच्या फोटोचे पूजन व दीपप्रज्वलन करून झाले.

यानंतर प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते गुलाब पुष्प, भेटवस्तू देऊन बी.फार्मसी, एम.फार्मसी अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच शैक्षणिक वर्षांमध्ये विविध स्पर्धा कला कार्यक्रमात, परीक्षा मधील विजेत्यांचा सन्मान करण्यात आला. स्वप्नील गायकवाड व प्राची पाटील या विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतात सह्याद्रीमधील शैक्षणिक प्रवासाची माहिती देत असताना संस्थेचे उत्कृष्ट नियोजन व व्यवस्थापन, कॉलेजमधील तंज्ञ प्राध्यापक वृंद, मुलींना असणारी मोफत शिक्षण सुविधा, शासनमान्य असणाऱ्या सर्व स्कॉलरशिपची सुविधा, डिजिटल कलासरूम, अद्यावत प्रयोगशाळा व सुसज्ज ग्रंथालय, सर्व सोईयुक्त वसतिगृह व कॅन्टीन, निसर्गरमय व शिस्तबद्ध शैक्षणिक वातावरण, पदवीशिक्षण पूर्ण होण्याअगोदर असलेली कॅम्पसची सुविधा, आधुनिक उपकरणे व मशीन्स यांची स्तुती करून यांचा आमच्या यशात मोलाचे योगदान असून पुढील उच्चशिक्षणसुद्धा सह्याद्रीमध्येच करणार असल्याचे मनोगतात सांगितले.

या कार्यक्रमानंतर सुप्रसिद्ध गायक व सावर द बँडचे मंदार जोशी त्यांच्या म्युझिकल बॅण्डचा लाइव्ह परफॉर्मन्स शो झाला. यामध्ये त्यांनी लोकप्रिय मराठी व हिंदी गाणे आपल्या म्युझिकल बॅण्ड बरोबर अतिशय सुरेल आवाजात गाऊन उपस्थितांची मने जिकंली तसेच उपस्थितीत सर्व विद्यार्थी या गाण्यावर थिरकले. आधुनिक म्युझिकल साऊंड सिस्टीम, रेखीव असे सजवलेले व्यासपीठ, विविध रंगाचे मनमोहक लायटिंग इफेक्टस, कॉलेजने केलेली रुचकर अश्या भोजनाची उपस्थितांनी स्तुती केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन डॉ. एन.ए.तांबोळी यांनी तर आभारप्रदर्शन प्रा.एस.पी.जोकार यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!