शैक्षणिक

सह्याद्री फार्मसीच्या पूल कॅम्पसने तब्ब्ल ८१ विद्यार्थ्यांना दिली नोकरीची संधी

सह्याद्री फार्मसीच्या पूल कॅम्पसने तब्ब्ल ८१ विद्यार्थ्यांना दिली नोकरीची संधी

सांगोला (प्रतिनिधी): सह्याद्री कॉलेज ऑफ फार्मसी, मेथवडे महाविद्यालयाने नुकतेच पूल कॅम्पसचे आयोजन केले होते. या पूल कॅम्पस मध्ये तब्बल ८१ विद्यार्थ्यांची निवड पाच नामांकित फार्मा कंपन्यांमध्ये झाली असून त्यांना उत्तम अशी नोकरीची संधी मिळाली आहे अशी माहिती संस्थेच्या अध्यक्षा अनिता दिलीपकुमार इंगवले व संस्था विश्वस्त विश्वजीत दिलीपकुमार इंगवले यांनी दिली.

या पूल कॅम्पसमध्ये मार्कसन फार्मासुटिकल एलटीडी गोवा, एव्हरसुयर पोलीबॉन्ड इंडिया पीव्हीटी एलटीडी पुणे, दाटवायलर फार्मा पीव्हीटी एलटीडी, पुणे, एमकुयर फार्मासुटिकल एलटीडी, पुणे, निपरो फार्मा पॅकेजिंग पीव्हीटी एलटीडी, खंडाळा सातारा यांनी सहभाग घेतला होता. २६ फार्मसी कॉलेजच्या ५३६ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. उपस्थित नोंदणीकृत विद्यार्थ्यांची प्रथमतः फार्मा व एप्टीट्यूड परीक्षा घेण्यात आली त्यामधून उत्तीर्ण विद्यार्थ्यांची मुलाखत घेऊन अंतिम निवड करण्यात आली. सह्याद्री फार्मसी कॉलेजच्या २६ विद्यार्थ्यांची तर इतर सहभागी कॉलेजच्या ५५ विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. मुलाखतीमध्ये निवड झालेल्या विद्यार्थ्यांना नियुक्ती पत्रांचे वाटप प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले.


अंतिम वर्षात शिक्षण चालू असताना आम्हास उत्तम अशा करियरची संधी या पूल कॅम्पसद्वारे मिळाली त्यामुळे आम्ही संस्था वरिष्ठांचे खूपखूप आभारी आहोत तसेच उपस्थितीत सर्व पालक व विद्यार्थ्यांनी कॉलेजमधील अनुभवी व तज्ञ प्राध्यापक वृंद, अद्यावत प्रयोगशाळा व कलासरूम सुसज्ज ग्रंथालय, सर्व सोईयुक्त वसतिगृह व कॅन्टीन, निसर्गरमय व शिस्तबद्ध शैक्षणिक वातावरण, आधुनिक उपकरणे व मशीन्स यांची स्तुती केली. या कार्यक्रमाची प्रस्थावना व पाहुण्यांची ओळख डॉ.एन.ए.तांबोळी यांनी केली. हे पूल कॅम्पस यशस्वी करण्यासाठी कॉलेज ट्रैनिंग व प्लेसमेंट ऑफिसर प्रा.एस.एस.काळे व प्रा.एस.पी.जोकार, प्रकाश पाटील व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थ्यांचे योगदान लाभले.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!