“उद्धरली कोटी कुळे, भीमा तुझ्या जन्मामुळे!”
सांगोल्यात ‘जय भीम’च्या जयघोषात महामानवाला अभिवादन

“उद्धरली कोटी कुळे, भीमा तुझ्या जन्मामुळे!”
सांगोल्यात ‘जय भीम’च्या जयघोषात महामानवाला अभिवादन
सांगोला (प्रतिनिधी): भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, सामाजिक समतेचे अध्वर्यू, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त सांगोला शहरासह तालुक्यात अभूतपूर्व उत्साह.आणि जल्लोषाचे चित्र पाहायला मिळाले. ‘जय भीम’च्या गगनभेदी घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. जयंतीनिमित्त गावोगावी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे स्मरण करून सामाजिक एकात्मतेचा संदेश देण्यात आला. प्रतिमा व पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करताना अनुयायांच्या डोळ्यांत अभिमान आणि कृतज्ञतेची भावना स्पष्टपणे दिसून येत होती.

भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून विविध सामाजिक, शैक्षणिक आणि राजकीय संघटनांनी रक्तदान शिबिरे, शैक्षणिक स्पर्धा, तसेच संविधान पुस्तिकांचे मोफत वाटप यांसारखे उपक्रम राबवले. गावोगावी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनकार्यावर आधारित गीत, आणि प्रबोधनपर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. युवकांमध्ये विशेष उत्साह दिसून आला. सांगोला तालुक्यातील चिकमहुद येथे महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. पंचायत समिती सदस्य बाळासाहेब बंडगर, सरपंच शोभा कदम यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. ग्रामपंचायत कार्यालय, विकास सेवा सोसायटी येथे प्रतिमापूजन करून अभिवादन करण्यात आले. ग्रामस्थ आणि जयंती उत्सव मंडळाच्या पदाधिकाऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

सांगोला शहर व तालुक्यात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती पंचशील ध्वजारोहण, पूर्णाकृती पुतळा, अर्धाकृती पुतळा, प्रतिमा पूजन, पुष्पहार अर्पण, संविधान वाटप, रॅली मिरवणुकीद्वारे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना पुष्पहार अर्पण करण्यासाठी हजारोंचा जनसागर लोटला. भीमसैनिकांनी ‘जय भीम’चा नारा दिला तर समता सैनिकांनी मानवंदना देऊन अभिवादन केले. हजारो अनुयायांनी ‘जय भीम’च्या घोषणा देत जल्लोष साजरा केला. सांगोला शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे स्मारक आकर्षक फुलांची सजावट आणि विद्युत रोषणाईने उजळून निघाले होते. सोमवारी मध्यरात्री भीमसैनिकांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पूर्णाकृती पुतळ्याला सामुदायिक पुष्पहार अर्पण केला. मंगळवारी सकाळपासून दिवसभर महामानवाला अभिवादन करण्यासाठी स्मारकाच्या ठिकाणी भीम अनुयायांचा जनसागर लोटला होता.
सांगोला भीमनगर बुद्धविहार येथे आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख, माजी आमदार दीपकआबा साळुंखे पाटील, माजी आमदार शहाजीबापू पाटील, शिक्षण व आरोग्य सभापती चेतनसिंह केदार-सावंत, नगराध्यक्ष आनंदा माने, प्रा. प्रबुद्धचंद्र झपके, तहसीलदार बाळू ताई भागवत, मुख्याधिकारी डॉ. सुधीर गवळी, गटविकास अधिकारी उमेशचंद्र कुलकर्णी, पोलिस निरीक्षक विनोद घुगे, माजी नगराध्यक्ष रफिक नदाफ, माजी नगराध्यक्षा राणी माने, जि. प. सदस्य दादासाहेब लवटे, उपसभापती अजय सरगर, तानाजी पाटील, खरेदी विक्री संघाचे चेअरमन रमेश जाधव, उद्योजक योगेश खटकाळे, बाळासाहेब आसबे, गुंडादादा खटकाळे, सोमेश यावलकर, शिवप्रेमी मंडळ, महात्मा बसवेश्वर युवक संघटना, आपुलकी प्रतिष्ठान, मुस्लीम संघटना पदाधिकारी, धनगर समाजसेवा मंडळ पदाधिकारी, विविध बहुजन समाज संघटना पदाधिकारी, आंबेडकरप्रेमी यांच्यासह आजी माजी नगरसेवक, विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले तसेच पंचशील ध्वजारोहण व प्रतिमापूजन करण्यात आले. तसेच डॉ बाबासाहेबांचा अर्धाकृती पुतळा, तैलचित्र व भगवान गौतम बुद्ध मूर्तीस पुष्पहार अर्पण करण्यात आला.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव मंडळाचे अध्यक्ष ॲड. आनंद बनसोडे, उपाध्यक्ष ॲड. सुरेश बनसोडे, वैभव भोरकडे, विकास बनसोडे, अशोक वाघमारे व राजू माने, सचिव सुभाष बनसोडे, खजिनदार रणजित बनसोडे मंडळाचे पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.
भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार, महामानव, बोधीसत्व, विश्वभूषण भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती सांगोला तालुक्यातील वासूद येथील श्री हनुमान सार्वजनिक वाचनालय येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस माजी नगरसेवक किशोर बनसोडे,सार्वजनिक वाचनालयाचे संस्थापक अध्यक्ष, जय हनुमान शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष तात्यासाहेब केदार-सावंत, दलित मित्र साबळे गुरूजी यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. किशोर बनसोडे यांनी प्रार्थना व स्तवन म्हणून उपस्थित सर्वाना डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याबद्दल मनोगतातून माहितीपूर्ण मार्गदर्शन केले. संस्थापक अध्यक्ष मा.तात्यासाहेब नानासाहेब केदार-सावंत यांनी आपल्या मार्गदर्शनातून सार्वजनिक कार्यक्रमांतून समाजातील सर्व स्तरातील लोकांचे जीवन मान उंचाविण्यासाठी समाजातील लोकांनी एकत्र येऊन जागर करुन समाजातील जागृती घडवून आणावी. शिका संघटित होऊन कार्य सिद्धीस न्यावे. सर्वानीच एकत्र येऊन समाजातील जागर करावा, त्याकरिता आवश्यक ती मदत करेन असे आश्वस्त केले. या कार्यक्रमास शिवदास चंदनशिवे ,दादासाहेब ऐवळे, सदानंद सावंत, अरूण ऐवळे, यश ऐवळे, भास्कर ऐवळे, कुंदन ऐवळे, उदय ऐवळे, रोहन चंदनशिवे, सौरभ चंदनशिवे, समाधान भोसले, आदित्य सावंत, साहिल ऐवळे, भिमराव ऐवळे, नवनाथ ऐवळे, संतोष सावंत, मायाप्पा ऐवळे, आशिष ऐवळे, अक्षय चंदनशिवे, राहुल ऐवळे, अशोक ऐवळे, संतोष ऐवळे, सचिन ऐवळे, दयानंद चंदनशिवे, मृणाल सावंत, कुमार ऐवळे, अतुल चंदनशिवे, आकाश सातपुते, क्रांती सातपुते, मोहन ऐवळे, दगडू ऐवळे, मुकेश ऐवळे, सागर ऐवळे, शैलेश ऐवळे, स्वप्नील ऐवळे, समाधान ऐवळे, शहाजी लांडगे, शिक्षक, ग्रंथालय कर्मचारीवर्ग आणि ग्रामस्थ उपस्थित होते. ग्रंथालय कर्मचारी संतोष मोरे यांनी आभार मानले.



