सांगोला तालुक्यात अटीतटीची निवडणूक लढत; प्रचारात आरोप-प्रत्यारोपांची धग
२७४ बूथवर २ लाख ६२ हजार ३६७ मतदार बजावणार मतदानाचा हक्क

सांगोला तालुक्यात अटीतटीची निवडणूक लढत; प्रचारात आरोप-प्रत्यारोपांची धग
२७४ बूथवर २ लाख ६२ हजार ३६७ मतदार बजावणार मतदानाचा हक्क
सांगोला (प्रतिनिधी) :जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी २७४ मतदान केंद्रावर सांगोला तालुक्यातील २ लाख ६२ हजार ३६७ मतदार मतदानाचा हक्क बजावण्यासाठी सज्ज झाले असून, यंदाची निवडणूक चुरशीची ठरणार हे स्पष्ट झाले आहे. भाजप-शिवसेना- आरपीआय यांची महायुती आणि शेकाप व दीपकआबा साळुंखे पाटील यांच्या नेतृत्वाखालील सांगोला तालुका विकास आघाडी यांच्यात अटीतटीची लढत रंगली. प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात आरोप-प्रत्यारोपांमुळे वातावरण चांगलेच तापले.
महायुतीकडून गेल्या काही वर्षांत तालुक्यात झालेल्या विकासकामांचा पाढा वाचला जात असून, पाणी, रस्ते, वीज, आरोग्य आणि शासकीय योजनांचा थेट लाभ जनतेपर्यंत पोहोचवण्यात आपण यशस्वी ठरलो, असा दावा करण्यात येत आहे. तर दुसरीकडे विकास आघाडीकडून देखील आरोप प्रत्यारोप झाले. प्रचारसभांमधून एकमेकांवर टीकेची झोड उठवत, वैयक्तिक आरोपांपर्यंत काही ठिकाणी मजल गेल्याचे चित्र आहे. यामुळेच ग्रामीण भागातील चौक, चावडी, चहाची टपरी आणि सोशल मीडियावरही राजकीय चर्चांना उधाण आले आहे. कोण विकास करतोय, कोण फक्त आश्वासनांवर राजकारण करत आहे, यावरून मतदारांमध्ये जोरदार चर्चा रंगत आहे. तरुण मतदार, महिला आणि शेतकरी हा यंदाच्या निवडणुकीतील निर्णायक घटक मानला जात आहे. शेतीला पाणी, दुष्काळी प्रश्न, रोजगार, महिलांसाठीच्या योजना आणि गावपातळीवरील मूलभूत सुविधा या मुद्द्यांवर मतदारांचा कल ठरणार असल्याचे राजकीय जाणकारांचे मत आहे. प्रचाराच्या अखेरच्या टप्प्यात प्रत्येक उमेदवार ‘आपणच खरे विकासाचे प्रतिनिधी’ असल्याचा दावा करत मतदारांना आकर्षित करण्याचा आटोकाट प्रयत्न करत आहे. त्यामुळे सांगोला तालुक्यातील ही निवडणूक केवळ सत्तेची नाही, तर विश्वास, विकास आणि भविष्यातील दिशेची कसोटी ठरणार आहे. आता सर्वांचे लक्ष मतदानाच्या दिवशी मतदारराजा कोणाच्या पारड्यात कौल देतो, याकडे लागले असून, निकालाने तालुक्याच्या राजकारणाची पुढील दिशा ठरणार आहे.
पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर सभागृहात निवडणूक निरीक्षक अरुण आनंदकर, निवडणूक निर्णय अधिकारी बी. आर. माळी व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी बाळूताई भागवत यांनी 14 टेबलद्वारे 274 केंद्रावर मतदानासाठी लागणारे सर्व साहित्य वाटप केले असल्याची माहिती मीडिया नोडल अधिकारी मिलिंद सावंत यांनी दिली आहे. १३७० कर्मचारी बुथवर रवाना झाले असून वाहतूक नोडल अधिकारी महेश जाधव यांनी 42 एसटी बस व दोन जीप द्वारे सर्व कर्मचारी बुथवर पोलीस पाटील यांचे मार्फत पोहोच झाल्याची माहिती सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी बाळूताई भागवत तथा तहसीलदार सांगोला यांनी दिली.
सांगोला तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निहाय मतदार संख्या पुढीलप्रमाणे…
महूद जिल्हा परिषद गट
पुरुष मतदार १९ हजार ९०६
महिला मतदार १८ हजार १९६
एकूण मतदार ३८ हजार १०२
महूद पंचायत समिती गण मतदार
पुरुष मतदार १० हजार ०७५
महिला मतदार ९ हजार १८३
एकूण मतदार १९ हजार २५८
चिकमहूद पंचायत समिती गण
पुरुष मतदार ९ हजार ८३१
महिला मतदार ९ हजार ०१३
एकूण मतदार १८ हजार ८४४
एखतपूर जिल्हा परिषद गट
पुरुष मतदार १८ हजार ९९५
महिला मतदार १७ हजार ४९५
एकूण मतदार ३६ हजार ४९०
वाकी शिवणे पंचायत समिती गण
पुरुष मतदार ८ हजार ६९९
महिला मतदार ७ हजार ९२७
एकूण मतदार १६ हजार ६२६
एखतपूर पंचायत समिती गण
पुरुष मतदार १० हजार २९६
महिला मतदार ९ हजार ५६८
एकूण मतदार १९ हजार ८६४
जवळा जिल्हा परिषद गट
पुरुष मतदार २० हजार ४४६
महिला मतदार १९ हजार ०६८
एकूण मतदार ३९ हजार ५१४
वाढेगाव पंचायत समिती गण
पुरुष मतदार ९ हजार ९०३
महिला मतदार ९ हजार १९३
एकूण मतदार १९ हजार ०९६
जवळा पंचायत समिती गण
पुरुष मतदार १० हजार ९६०
महिला मतदार १० हजार ३०१
एकूण मतदार २१ हजार २६१
कडलास जिल्हा परिषद
पुरुष मतदार १७ हजार ९६७
महिला मतदार १७ हजार ३५१
एकूण मतदार ३५ हजार ३१८
कडलास पंचायत समिती गण
पुरुष मतदार ९ हजार ८४२
महिला मतदार ९ हजार ४३१
एकूण मतदार १९ हजार २७३
अजनाळे पंचायत समिती गण
पुरुष मतदार ८ हजार १२५
महिला मतदार ७ हजार ९२०
एकूण मतदार १६ हजार ०४५
चोपडी जिल्हा परिषद गट
पुरुष मतदार १७ हजार ९०२
महिला मतदार १६ हजार ९५४
एकूण मतदार ३४ हजार ८५६
राजुरी पंचायत समिती गण
पुरुष मतदार ८ हजार ६०५
महिला मतदार ८ हजार १४९
एकूण मतदार १६ हजार ७५४
चोपडी पंचायत समिती गण
पुरुष मतदार ९ हजार २९७
महिला मतदार ८ हजार ८०५
एकूण मतदार १८ हजार १०२
कोळा जिल्हा परिषद गट
पुरुष मतदार १९ हजार ७२८
महिला मतदार १७ हजार ८२६
एकूण मतदार ३७ हजार ५५४
कोळा पंचायत समिती गण
पुरुष मतदार १० हजार ०२४
महिला मतदार ९ हजार ०२१
एकूण मतदार १९ हजार ०४५
हातीद पंचायत समिती गण
पुरुष मतदार ९ हजार ७०४
महिला मतदार ८ हजार ८०५
एकूण मतदार १८ हजार ५०९
घेरडी जिल्हा परिषद
पुरुष मतदार २० हजार ५६२
महिला मतदार १९ हजार १२४
एकूण मतदार ३९ हजार ६८६
सोनंद पंचायत समिती गण
पुरुष मतदार ९ हजार ५७६
महिला मतदार ९ हजार ०९६
एकूण मतदार १८ हजार ६७२
घेरडी पंचायत समिती गण
पुरुष मतदार १० हजार ९८६
महिला मतदार १० हजार ०२८
एकूण मतदार २१ हजार ०१४
पुरुष मतदार १ लाख ३५ हजार ९२३ व महिला मतदार १ लाख २६ हजार ४४० व इतर ४ असे एकूण २ लाख ६२ हजार ३६७ इतके मतदार आहेत.



