सामाजिक

खंडागळे मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलकडून वर्धापन दिनानिमित्त अल्पदरात शस्त्रक्रिया व उपचारांची सुवर्णसंधी!

२५ जुलै ते ३१ ऑगस्टदरम्यान विशेष आरोग्य शिबिर; विविध शस्त्रक्रिया माफक दरात

खंडागळे मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलकडून वर्धापन दिनानिमित्त अल्पदरात शस्त्रक्रिया व उपचारांची सुवर्णसंधी!

२५ जुलै ते ३१ ऑगस्टदरम्यान विशेष आरोग्य शिबिर; विविध शस्त्रक्रिया माफक दरात

सांगोला (प्रतिनिधी): ग्रामीण भागातील रुग्णांना दर्जेदार आणि परवडणारी आरोग्यसेवा उपलब्ध करून देणारे खंडागळे मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल, सांगोला हे रुग्णालय आपल्या स्थापनेच्या वर्धापन दिनानिमित्त तसेच वैद्यकीय सेवेला तेरा वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने नागरिकांसाठी विशेष आरोग्य सेवा उपक्रम राबवत आहे. शनिवार दि. २५ जुलै २०२६ ते सोमवार दि. ३१ ऑगस्ट २०२६ या कालावधीत विविध शस्त्रक्रिया व उपचार अत्यंत अल्पदरात उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती डॉ.परेश खंडागळे व डॉ.स्वाती खंडागळे यांनी दिली.

रुग्णांच्या आर्थिक अडचणी लक्षात घेऊन कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया, गर्भाशयाच्या पिशवीवरील शस्त्रक्रिया, अपेंडिक्स, हर्निया, मूळव्याध, फिशर, फिस्टुला तसेच इतर अनेक शस्त्रक्रिया कमी खर्चात करण्यात येणार आहेत. याशिवाय दुर्बिणीद्वारे (लॅप्रोस्कोपिक) शस्त्रक्रियांची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे.

विशेष म्हणजे आयसीयूमध्ये दाखल होणाऱ्या रुग्णांच्या हॉस्पिटल बिलावर ५० टक्के सवलत देण्यात येणार असून इतर आजारांसाठी दाखल रुग्णांनाही बिलामध्ये ५० टक्के सवलत देण्याची घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे सांगोला तालुक्यासह परिसरातील नागरिकांसाठी हा आरोग्य उपक्रम मोठा दिलासादायक ठरणार आहे.

खंडागळे मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये स्त्रीरोग, सर्जरी, मेडिसिन, अस्थिरोग, बालरोग, नेत्ररोग, त्वचारोग तसेच कान-नाक-घसा विभागाच्या सेवा उपलब्ध आहेत. तसेच महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजना, आयुष्यमान भारत योजना, बांधकाम कामगार योजना, मुख्यमंत्री सहायता निधी आणि विविध आरोग्य विमा योजनांअंतर्गत मोफत किंवा सवलतीच्या दरात उपचार व शस्त्रक्रियांची सुविधा दिली जाते.रुग्णालयात २४ तास आपत्कालीन सेवा उपलब्ध असून अनुभवी वैद्यकीय तज्ज्ञ डॉ. परेश खंडागळे व डॉ. स्वाती खंडागळे यांच्या मार्गदर्शनाखाली उपचार केले जातात. ग्रामीण भागातील रुग्णांना अत्याधुनिक वैद्यकीय सुविधा स्थानिक पातळीवर उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येत असल्याचे. डॉ.परेश खंडागळे व डॉ. स्वाती खंडागळे यांनी स्पष्ट केले. या विशेष सवलतीच्या आरोग्य सेवेचा लाभ घेण्यासाठी नागरिकांनी वेळेत नोंदणी करून आरोग्य तपासणी व उपचारांचा लाभ घ्यावा, असे आवाहन खंडागळे मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलतर्फे करण्यात आले आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!